गणेश वंदना, श्री स्वामी समर्थ, दूरच्या रानात केळीच्या बनात, देशभक्तीपर गीते, भक्तीगीते, भावगीते व नृत्याने ‘भक्तीरंग’ सादरकर्ते सिने अभिनेत्री संस्कृती बालगुडे आणि सहकलाकार पुणे यांच्या कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्सपुर्त प्रतिसाद मिळाला.
श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाचा ३७ वा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा उत्सवनिमित्त धर्मसंकिर्तन व सांस्कृतिक कार्यक्रम न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत व न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी सायंकाळी ७ वा. ‘भक्तिरंग’ भक्तिगीते, भावगीते व नृत्य सादरकर्ते संस्कृती बालगुडे आणि सहकलाकार पुणे यांचा ह्या कार्यक्रमाने ९ वे पुष्प संपन्न झाले.
दरम्यान कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन कॉंग्रेसच्या युवा नेत्या शीतलताई म्हेत्रे, उद्योजक शैलेश पिसे, न्यासाचे विश्वस्त राजेंद्र लिंबीतोटे, लाला राठोड, फैजअहमद उर्फ नन्नु कोरबू, अक्कलकोट कृषी उत्पन्न बजार समितीचे उपसभापती अप्पासाहेब पाटील, सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर मडीखांबे, अंकुश चौगुले, माजी नगरसेवक सद्दाम शेरीकर, सुनील खवळे, लखन झंपले, ऋतुराज उर्फ बंटी राठोड, विठ्ठल तेली, पत्रकार विजयकुमार देशपांडे, विठ्ठलराव खेळगी, अभिजित पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान श्रींची प्रतिमा, नटराज व स्वर्गीय लतादीदी मंगेशकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी व संजय कुलकर्णी यांच्या हस्ते मंत्र पठणाने पूजन संपन्न झाले.