अन्नछत्राचा इतिहास

अक्कलकोट हे शहर महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात येते. हे तालुक्याचे ठिकाण असून महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवर वसले आहे. अक्कलकोटला एस. टी. बसने व रेल्वेने येता येते. सोलापूर, नळदुर्ग, गुलबर्गा, गाणगापूर, अफजलपूर या मार्गाने येता येते. अक्कलकोटचे ऐतिहासिक महत्व असून हे पूर्वी संस्थान होते. येते राजघराण्याची गादी असुन भोसले हे संस्थानिक आहेत. श्रीमंत फत्तेसिंहराजे भोसले, पहिले शहाजीराजे, मालोजीराजे, फत्तेसिंहराजे तिसरे व श्रीमंत विजयसिंहराजे भोसले असे पराक्रमी व कर्तबगार राजेहोऊन गेले.अक्कलकोट शहराची ख्याती सबंध महाराष्ट्रभर आणि देशभर पसरली ती म्हणजे दत्तावतारी ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज यांचेमुळे. श्री स्वामी समर्थाचा हा अवतार श्रीमंत मालोजीराजे भोसले यांचे कारकीर्दीत झाला. श्रीमंत मालोजीराजे भोसले हे स्वामी भक्त होते. अक्कलकोट मधील २२ वर्षांच्या वास्तव्यात श्री स्वामी समर्थ महाराजांनी अनेक चमत्कार करून यांची महती सर्व महाराष्ट्रभर पसरली.
अन्नछत्राची कल्पना व प्रेरणा
दत्तस्थान औदुंबर येथुन काही साधुमंडळी स्वामी दर्शनासाठी अक्कलकोट येथे मंदिरात आले. दर्शना नंतर दुपारी भोजनाकरिता त्यांनी प.पु. मोहन पुजारी आणि श्री. जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांना विचारले. तेव्हा या साधुमंडळीची मोहन पुजारी जन्मेजयराजे भोसले महाराज यांनी भोजन व्यवस्था केली. पण अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र असुन सुद्धा परगांवच्या भाविकांसाठी मोफत महाप्रसादासाठी अन्नछत्र नाही. ही खंत जन्मेजयराजे भोसले महाराज यांना लागुन राहिली. काही दिवसांनी मंदिरामध्ये श्री दत्त आणि श्री जगदंबा भवानी मातेचे फोटो पेंटीग चालले होते. जगदंबेचे पेटींग पहात प.पु. मोहन पुजारी गुरुजी यांनी साक्षात दत्तावतारी श्री. स्वामी समर्थाच्या या पावननगरी मध्ये अन्नछत्र असावे ही कल्पना त्यांनी सन्मा. जन्मेजयराजे भोसले महाराजांना बोलुन दाखवली आणि ही प्रेरणा कल्पना सन्मा. जन्मेजयराजे भोसले महाराजांनी उचलुन धरली व त्याबाबत तेथे उपस्थित भाविकांशी चर्चा केली.

अन्नछत्राची स्थापना

थोडयाच दिवसात श्री. गुरुपौर्णिमा उत्सव असल्याने श्री. गुरुपौर्णिमा शुभ मुहर्तावर अन्नछत्र सुरु करावे हे भोसले महाराजांनी मनोमन ठरविले. भोसले राजघराण्यावर श्री स्वामी समर्थाची असीम कृपा दृष्टी होतीच त्यामुळे अन्नदानाचे पुण्यकार्य श्री स्वामी समर्थांनी श्री.जन्मेजयराजे भोसले महाराज यांचेकडून घेतले. अन्नछत्राची व्यवस्थित आखणी करूनश्री. गुरुपोर्णिमा दिवशी सकाळी कांही उत्साही तरुणांना हाताशी धरून श्री. स्वामी समर्थ चरित्र सारामृताचे सामुदायिक पारायण करून मंदिर परिसरातील ४५घरी सन्मा. जन्मेजयराजे भोसले महाराजांनी माधुकरी भिक्षा मागितली, ह्या भिक्षेतून मिळालेल्या ३ किलो तांदुळाचा भात शिजवुन त्यांनी श्री. स्वामी समर्थांना महानैवेध दाखविला आणि तेथेच मंदिरात पाच पन्नास स्वामी भक्तांना “महाप्रसाद” वाढला. अशा तऱ्हेने अन्नछत्राची गुरुपोर्णिमा शुभमुहूर्तावर मुहूर्तमेढ रोवली गेली.
अधिक माहिती ...
२९ जुलै १९८८ श्री गुरुपोर्णिमेच्या मुहूर्तावर हे अन्नछत्र सुरु झाले. या अन्नछत्राचे “श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट” असे नामकरण करण्यात आले. शासनदरबारी मान्यता असावी हया उदेशाने हया अन्नछत्र मंडळाचे सुरुवातीस सोसायटी रजिस्ट्रेशन करण्यात आले. रेजिस्ट्रेशन नं. २०९४ सोलापूर. हया अन्नछत्राचा विस्तार व्हायला लागला. अन्नदानासाठी परगांवच्या भक्तांच्या देणग्या यायला लागल्याने ट्रस्ट स्थापनाची आवश्यकता भासु लागली. त्यामुळे सन्मा. जन्मेजयराजे भोसले महाराजांनी आपले निकटवर्तीयसंबधीत व सहकारी असलेल्या स्वामीभक्तांना सभासद करून घेऊन पब्लिक ट्रस्ट (सार्वजनिकन्यास) ची नोंदणी केली. (पब्लिक ट्रस्ट नं एफ / २२७९ / सोलापुर दि. २९/११/१९८९). त्या वेळेस या सर्वांनी सन्मा.जन्मेजयराजे भोसले महाराजांना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष केले व त्यांच्या मार्गदर्शनाखाली श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट), अक्कलकोट ह्या नावाने हे धर्मदाय संस्थान कार्यरत झाले. सुरूवातीस दर गुरूवारी अन्नदान सुरू झाले. अल्पावधित दर गुरूवारी व दर रविवारी अन्नदान सुरू झाले. या अन्नछत्राच्या स्वामी कार्यासाठी तसेच परगांवच्या स्वामी भक्तांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन सन्मा. जन्मेजय भोसले महाराजांनी देवस्थानच्या उत्तर महाद्वारालगत असलेल्या जागेत अन्नछत्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. यासाठी थोर साध्वी मातोश्री. अंबुतार्इ खंडेराव सरदेशमुख यांनी या पुण्यकर्मासाठी आपली स्वत:ची जागा अन्नछत्रास देऊ करून अन्नछत्रास मायेच्या ममतेने दिलासा दिला आणि अन्नदानाचे स्वामी कार्य दुप्पट जोराने सुरू झाले. गांवातील स्वामीभक्त असलेल्या कांही मंडळींनी मदतीसाठी हात पुढे केला. त्यामुळे त्यांच्या मदतीने व स्वामी भक्तांच्या मिळालेल्या देणग्यांमधुन ह्या ठिकाणी अन्नछत्रासठी २०० स्वामी भक्त बसतील एवढे मोठे पत्र्याचे शेड उभे करण्यात आले. जानेवारी १९८९ पासुन दैनंदिन एक वेळ अन्नछत्र सुरू झाले, अल्पवधीतच स्वामी भक्तांचा वाढता प्रतिसाद पाहुन दैनंदिन दोन्ही वेळेस अन्नछत्र सुरू झाले.
अन्नछत्राचे नवीन जागेत स्थलांतर
दिवसेंदिवस अन्नछत्राची व्याप्ती वाढु लागली, परगांवच्या भाविकांचा वाढता प्रतिसाद यामुळे स्वामी भक्तांची गर्दी वाढतच चालली त्यामुळे सध्याची असलेली अन्नछत्राची जागा अपुरी पडु लागली. यामुळे देवस्थानचे दक्षिणेस मैंदर्गी गाणगापूर रस्त्यालगत श्री वीरभद्र कोकळे यांची १६ एकर जमिन नाममात्र किमतीत खरेदी करण्यात आली. वास्तविक, श्री. कोकळे यांना सदर जमिन द्यावयाची नव्हती पण ही जमीन संस्थानकाळी श्रीमंत विजयसिंहराजे भोसले महाराज यांचे कडुन कोकळे यांना मिळाली होती आणि अन्नछत्राचे महान अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले यांचे सुपुत्र सन्मा.जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले हे करित आहेत, हे समजल्यावरून त्यांनी सदरच्या कार्यासाठी देऊ केली. जमिन ताब्यात घेऊन जमिनीचे सपाटीकरण करण्यात आले. याठिकाणी सध्याचे असलेले महाप्रसादगृहाचे पत्र्याचे भव्य कायमस्वरूपी शेड सोलापुरचे उद्योगपती सन्मा. दत्ताआण्णा सुरवसे यांनी उभारून दिले. या ठिकाणी एकावेळेस १००० स्वामी भक्त महाप्रसादाचा लाभ घेऊ शकतात. ह्या महाप्रसादगृहात स्वंयपाकगृह कोठी खोली, ताट ग्लास वाटया विसळण्याची जागा, हातधुण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था, पीठगिरणी, शेंगाकुट, कणीकतिंबणे, मिरची तिखट करणे, देणगीकांऊटर इ. सोयी निर्माण करण्यात आल्या.

कोरोना संसर्ग प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन कालावधीतील न्यासाचे कार्य

१५ मार्च २०२० रोजी कोरोन विषाणुच्या महामारीमुळे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातील अन्नदान सेवा स्थगित करण्यात आली. अन्नछत्रातील अन्नदान सेवा जरी थांबली असली तरी ह्या न्यासाने सलग ६ महिने दररोज शहरातील गरीब, गरजू भिकारी, निराधार व परप्रांतीयांना त्यांना जागेवर जेवण देण्याचे कार्य केले, दररोज १००० जणांना जेवण वाटप केले. अन्नछत्राची यात्रीनिवास ही निवासी इमारत शासनाने अधिग्रहीत करून याठिकाणी कोविड सेंटर सुरु केले. येथील रुग्णांना दररोज नाष्टा, चहा आणि दोनवेळचे जेवण सलग ५ महिने सुमारे २०० जणांना देण्याचे कार्य केले आहे. परिसरातील रहिवाशांच्या तक्रारीमुळे सदर कोविड सेंटर अन्यत्र हलविले आणि यासाठी शासनाच्या मागणीप्रमाणे न्यासाने ५० बेड, गाद्या, उशा, बेडशीट इ. पुरवठा केले आहे. तसेच ससून हॉस्पिटल, पुणे यांना २ लाख रुपये व्हेंटीलेटर्ससाठी दिले आहे. त्याचप्रमाणे नागरिक व स्वामी भक्तांना मोफत मास्क व सॅनिटायझर्स वाटप करीत आहे. शहर व खेडेगावामध्ये न्यासाचे वतीने निर्जंतुकीकरणासाठी औषध फवरणीचे कार्य सुरु आहे.
महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख
सन्माननीय सौ.वैशालीताई दत्तात्रय सामंत, पार्श्वगायिका मुंबई यांना श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट) एफ/२२७९, अक्कलकोट या न्यासाच्या महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख पदी अधिकृत मान्यता दिली आहे.

अन्नछत्रातील सेवेकरी वर्ग

अन्नछत्राची स्थापना झाल्यापासुन आजतागायत अन्नछत्रात मनापासुन सेवा करणारे नंतर अन्नछत्र कांहीवर्षानंतर व्यवस्थित जम बसल्यानंतर नाममात्र मानधनावर काम करणारे श्री. एस. के. स्वामी कॅशियर, श्री. धानप्पा काडप्पा उमदी मुख्य आचारी, श्री. शहाजी शिवाजी यादव व्यवस्थापक, श्री. प्रकाश शेकप्पा गायकवाड व्यवस्थापक, सौ. मथुराबार्इ पाटील महाप्रसाद महिला प्रमुख, सौ.गोदावरी जगन्नाथ भोसले भाजीपाला महिला प्रमुख, श्रीमती. गौराबार्इ भुसनुरे स्वंयपाक महिला प्रमुख यांचा येथे आवर्जुन उल्लेख करावा लागेल, कारण यांनी सुरूवातीच्या काळापासुन अन्नछत्राच्या सेवेत स्वत:ला वाहुन घेतले आहे.
अधिक माहिती ...
अन्नछत्राची व्याप्ती वाढल्याने आजमितीस येथे क्लार्क स्टाफ, आचारी, वाढपी,चपाती करण्याया, भाजी निवडणाया, धान्य निवडणाया व ताट वाटया धुणाया महिला, सफार्इकामगार, सुरक्षा रक्षक, यात्री निवास व यात्री भुवन मधील या सर्व सेवेकर्यांची संख्या २५० इतकी आहे. या सर्वांना त्यांच्या कामाच्या स्वरूपाप्रमाणे मानधन देण्यात येते. त्याचप्रमाणे कांहीजण स्वामी सेवक म्हणुन मानधन न घेता सेवा करतात. हे सर्व सेवेकरी अहोरात्रा निस्व:र्थी वॄत्तीने व विनम्रपणे अन्नछत्रात कष्ट करतात आणि त्यामुळे अल्पावधीत या अन्नछत्राच्या रोपटयाचे प्रचंड वटवृक्षात रूपांतर झाले आहे.
सुरुवातीच्या काळात एस.टी. चा सहभाग
१९८८ ला अन्नछत्रत्र सुरू झाले आणि अन्नछत्रास भक्तांचा वाढता प्रतिसाद यामुळे १९८९ ला अन्नछत्रास सार्वजनिक न्यास नोंदणी क्रमांक मिळाला. या प्रारंभीच्या काळात अन्नछत्र ही कल्पना राबविंण्यासठी आणि अन्नदान कार्य नेटाने सुरू करण्यासाठी त्यावेळीस राज्य परिवहन कर्मचारी अधिकारी यांनी भरीव असे सहकार्य केले. अन्नछत्राचे संस्थापक अध्यक्ष मा.जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले हे या अगोदर सोलापुरच्या एस.टी. विभागीय कार्यालयातील लेखा शाखेत कार्यरत होते. त्यामुळे त्याचा मोठा फायदा अन्नछत्रास झाला. सोलापुरचे विभागीय कार्यालय,अक्कलकोट डेपो व अन्य डेपो कर्मचाऱ्यांसाठी जवळपास अडीचलाख रूपयापर्यंत अन्नदान निधी देणगी स्वरूपात देऊन अन्नछत्राच्या उभारणीत मोठे योगदान दिले आहे. त्याची जाणिवअन्नछत्राने ठेवली आहे. सद्यस्थितीत महाराष्ट्रातील कानाकोपयातुन दररोज ३० ते ३५ एस.टी. बसगाडया रात्री मुक्कामास अन्नछत्रात येतात. त्या चालक व वाहकांच्या महाप्रसादाची व निवासाची व्यवस्था अन्नछत्रामार्फत केली जाते.

संचालक मंडळ
नांव | पद | |
---|---|---|
1 | मा.श्री. जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले | संस्थापक अध्यक्ष |
2 | मा.श्री. विजय जन्मेजयराजे भोसले | प्रमुख कार्यकारी विश्वस्त |
3 | मा.श्री. अभय गुणधर खोबरे | उपाध्यक्ष |
4 | मा.श्री. स्वामीराव शिवराम मोरे | सचिव |
5 | मा.श्री संजय लखनलाल राठोड | खजिनदार |
6 | मा.सौ. अलका जन्मेजयराजे भोसले (महिला प्रतिनिधी) | विश्वस्त |
7 | मा.सौ. अनिता अभय खोबरे (महिला प्रतिनिधी) | विश्वस्त |
8 | मा.श्री जनार्दन गणपत थोरात (पुणे) | विश्वस्त |
9 | मा.श्री.चंद्रकांत भानुदासराव कापसे | विश्वस्त |
10 | मा.श्री. राजेंद्र शिवशंकर लिंबीतोटे | विश्वस्त |
11 | मा.श्री. मयुरेश सतीश पै (मुंबई) | विश्वस्त |
12 | मा.श्री. लक्ष्मण विठ्ठलराव पाटील (सेवेकरी प्रतिनिधी) | विश्वस्त |
13 | मा.श्री. संतोष जगन्नाथ भोसले (सेवेकरी प्रतिनिधी) | विश्वस्त |
14 | मा.सौ. अर्पिता विजय भोसले (महिला प्रतिनिधी) | विश्वस्त |
15 | मा.सौ. अनुया संदीप फुगे (महिला प्रतिनिधी) (पुणे) | विश्वस्त |
अन्नछत्रास महाराष्ट्रातील मान्यवरांची सदिच्छा भेट
१९८८ जुलै पासुन (गुरूपोर्णिमा) अन्नछत्रास प्रारंभ होऊन दिवसेंदिवस अन्नछत्र मंडळाची व्याप्ती वाढु लागली अल्पावधीत आदर्शवत एकमेव संस्थान म्हणुन ओळखले जाऊ लागले. तसेच श्री स्वामी समर्थांच्या भक्तीचा प्रसार झाल्याने मोठमोठे मान्यवर श्री च्यां दर्शना करिता व महाप्रसादाकरिता येऊ लागले. अन्नछत्रात येऊन श्री. स्वामीचां महाप्रसाद घेऊन तृप्त झाले. राजकीय नेत्यांपैकी सन्मा. सुशिलकुमारजी शिंदे मा.केंद्रीय उर्जा मंत्री, सन्मा. ना. शिवराज पाटील चाकुरकर मा.केंद्रीय गृहमंत्री, कै. सन्मा. शंकररावजी चव्हाण, सन्मा. श्री. अनंतकुमार केंद्रिय मंत्री, आंध्र प्रदेश व कर्नाटकातील मंत्रीगण, सन्मा.कै. विलासरावजी देशमुख, सन्मा. श्री.विजयदादा मोहितेपाटील, सन्मा. कै.प्रतापसिंहजी मोहितेपाटील, सन्मा. श्री.रणजीतसिंहजी मोहितेपाटील, सन्मा.श्री.छगनराव भुजबळ मा. मंत्री, सन्मा. श्री. हांडोरे साहेब, मा.मंत्री.सन्मा.श्री.सुनिलजी तटकरेसाहेब मा.मंत्री,सन्मा.कै.डावखरेसाहेब, सन्मा.श्री. सचीनजी आहिरसाहेब मा.मंत्री, सन्मा. कांतातार्इ नलावडे, श्रीमती पुष्पातार्इ हिरे‚ सन्मा.वामनराव महाडिक‚ सन्मा.श्री. भार्इ जगताप‚ सन्मा. आ. उल्हास पवार‚ सन्मा.श्री.आण्णा थोरात‚ सन्मा.श्री.नारायणराव राणे‚ सन्मा. फुंडकर‚ सन्मा.कै.गोपीनाथजी मुंडे‚ मा.श्री. बबनराव पाचपुते मा.वनमंत्री, मा.श्री. विनयजी कोरे, मा.श्री. आनंदराव देवकते, मा.श्री.सुधाकरपंत परिचारक, मा. श्री. दिग्विजयसिंह , मा. मुख्यमंत्री. म. प्र. मा. श्री. धैर्यशील मोहिते पाटील, सन्मा. ना. स. फरांदे‚ सन्मा.श्री. हसन मुश्रीफ‚ खा. चंद्रकांत खैरे तसेच बयाच दिग्गज मंडळीनी अन्नछत्राचे कार्य पाहुन समाधान व्यक्त केले. त्याच प्रमाणे मा. वासुदेवन‚ मा. प्रविणसिंह परदेशी‚ मा. श्री. दिपक कपूर‚ मा. श्री. अपुर्वचंद्रा मा. श्री. अरूण बोंगिरवार‚ मा. श्री जगदिश पाटील‚ अनिल डिग्गीवार, भगवंतराव मोरे, धंनजयराव जाधव‚ भुजंगराव मोहिते, अरविंद इनामदार, मा. रेड्रडी, श्रीनिवासन, इत्यादी, मा.आ.सिद्धराम म्हेत्रे, मा.मंत्री श्री.रणजीतकुमार, डॉ.राजेंद्र भोसले,जिल्हाअधिकारी, श्री.विद्याधर अनास्कर, अर्थ तज्ञ,पुणे,राजेंद्र भारुड, मा.ना.सुभाष बापू देशमुख, मा.ना.विजय देशमुख,मा.श्री.आशिषजी फडणवीस, उद्योगपती,नागपूर, प्रा.व्यंकटेश आबदेव,वि.हिं.प., मा.श्री.प्रवीण तोगडिया, वि.हिं.प., प.पु.योग गुरु स्वामी रामदेव बाबा, मा.श्री.महेशजी राबडे, पी.ए. टू. लतादीदी मंगेशकर, मा.विश्वासराव नांगरे पाटील, विशेष पोलीस महा.निरीक्षक, मा. ना.दिवाकर रावते,परिवहन मंत्री,मा.आ.बबनदादा शिंदे, मा.आ.राजन पाटील, मा.आ.अजितदादा पवार, मा.उप-मुख्यमंत्री, मा.श्री.वीरेश प्रभू,पोलीस अधीक्षक, मा.ना.अनंत कुमार, केंद्रीय मंत्री, मा.ना.श्रीपाद नाईक, केंद्रीय मंत्री, मा.श्री.एकनाथ खडसे, मा.मंत्री, मा.सौ.चित्रा वाघ, मा.सौ. यशोमती ठाकूर, मा.आ.सचिन आहिर, मा.मंत्री, मा.श्री.बाळासाहेब दाभेकर,पुणे, मा.सौ.नीलम गोऱ्हे,मुंबई, मा.श्री.दिलीप वेंगसरकर, क्रिकेटपटू, मा.श्री.अमित देशमुख,लातूर, मा.ना.सौ.विद्या ठाकूर,मंत्री, मा.श्री.अशोकराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री, मा.श्री.व सौ. प्रकाश आमटे, डॉ. तात्याराव लहाने,नेत्र तज्ञ, मा.श्री.सहारिया,निवडणूक आयुक्त, मा.श्री.हणमंतराव गायकवाड, बी.व्ही.जी. ग्रुप, मा.श्री.सुधीर गाडगीळ,मा.अॅड.श्री.उज्वल निकम, मा.खा.संजय (नाना) काकडे,मा.श्री.वीरेंद्र किराड,पुणे, इत्यादी व त्याचप्रमाणे आदरणीय प. पु.भैय्युमहाराज,इंदोर. प.पु.१००८ चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी, ज्ञानपीठ काशी, प.पु.आण्णा महाराज वार्इकर‚ प.पु.काटकर महाराज‚ प.पु.दिघे मावशी‚ तोडकर महाराज‚ मुंगळे महाराज‚ प.पु.झुरळे महाराज , प.पु.भाऊ थावरे या थोर महात्म्यांनी अन्नछत्राचे कार्य पाहुन समाधान व्यक्त करून आशिर्वाद दिले आहेत.
अन्नछत्रास भरीव सहकार्य
अन्नछत्राच्या कायदेविषयक बाबींच्या पुर्ततेसाठी अॅडव्होकेट नितीन विष्णूसा हबीब हे अन्नछत्राचे पाठीशी खंबीरपणे निरपेक्ष भावनेने उभे राहिले. तसेच सद्या अन्नछत्राचे कायदेविषयक सल्लागार म्हणुन पुणे येथील विधीज्ञ. सन्मा. अॅड. सुरेशचंद्रजी भोसले हे असुन विधीज्ञ सन्मा.अॅडव्होकेट नितीनजी हबीब सोलापुर हे अन्नछत्राचे कायदेविषयक सल्लागार म्हणुन काम पाहतात. स्थानिक पातळीवर अॅड. संतोष खोबरे हे आहेत. यांचे अन्नछत्राचे कार्यात मोलाचे सहकार्य लाभत आहे.संस्थेच्या प्रारंभापासुन आजतागायत अन्नछत्राच्या देणग्यांचा जमाखर्चाचा हिशोब व त्याचे लेखा परिक्षण करण्याचे काम सन्मा. गावस्कर सर, चार्टड अकौंटंट पुणे हे पाहतात. केवळ नाममात्र मानधनावर स्वामी सेवा म्हणुन हे कार्य करतात. लेखा परिक्षणाबाबत त्यांचे वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे व लाभत आहे. आणि स्थानिक पातळीवर श्री.ओंकारेश्वर उटगे, सी-ए- हे लेखा परीक्षणाचे काम करतात. तसेच या बाबत पुण्याचे मा.श्री.विद्याधर अनास्कर साहेब, अर्थ तज्ञ व रिजर्व बँकेचे अर्थ विषयक सल्लागार हे सुद्धा या बाबत वेळोवेळी मार्गदर्शन करीत असतात.
• वरील सन्माननियांच्या खंबीर पाठींब्यामुळे श्री. स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची नेत्र दीपक प्रगती झाली आहे.
कै. शिवाजीराव पिसे (महाराज) व कै. बाळासाहेब शिंदे यांचे योगदान
सोलापुरचे सन्मा.कै.शिवाजीराव पिसे महाराज व कै. बाळासाहेब शिंदे यांचे अन्नछत्राच्या स्थापनेपासुन उभारणीच्या कार्यात मोलाचे सहकार्य लाभले आहे. तसेच त्यांच्या अन्नछत्राचे कार्यास मोलाचे मार्गदर्शन आणि भक्कम पाठिंबा मिळाला आहे. अन्नछत्राच्या प्रतिकूल परिस्थितीत या दोघांनी मा.जन्मेजयराजे यांना भक्कम पाठबळ देऊन मनोबल वाढविले.
संस्थेस शेतजमिन दान केलेले देणगीदार
अन्नछत्राच्या अन्नदान कार्याने प्रभावित होऊन अन्नछत्र मंडळास जमिन दान करून स्वामी चरणी सेवा रूजु केलेले सन्माननीय देणगीदार पुढील प्रमाणे :
• कै. बाबासाहेब गोविंदराव देशमुख , रा. इंगळगी, यांनी आपली ३७ एकर बागायत जमीन दानपत्राद्वारे अर्पण केली.
• कै.विरप्पा पिरप्पा बिरादार, मु. पो. बासलेगांव ता. अक्कलकोट यांनी आपली १९ एकर बागायत जमीन दानपत्राद्वारे अर्पण केली.
• कै.आनंदराव मोरे, रा. आबावाडी अक्कलकोट यांनी आपली अडीच एकर शेतजमिन अन्नछत्रास अर्पण करून आपल्या मनाची श्रीमंती दाखवली आहे.
• कै. वसुदेव बंडोबा कदम, रा. तांबोळे ता. मोहोळ यांनी आपल्या मालकीची २४ एकर शेत जमीन दानपत्राद्वारे अन्नछत्र मंडळास अर्पण केली. यांचे दातृत्व हे समर्थ भक्तांचे श्रद्धा व प्रेरणास्थान बनेल यात शंका नाही.सन्माननियांना कोटी कोटी प्रणाम.
• श्री. पोतदार अक्कलकोट यांनी आपल्या मालकीची मौजे गौडगांव येथील अडीच एकर शेतजमिन अन्नछत्रास स्वामी चरणी अर्पण केली.
• श्री. कुंभार अक्कलकोट अन्नछत्राच्या मैंदर्गी रस्त्यालगत ५ १ २ एकर शेतजमीन अन्नछत्राने आपल्या भविष्यातील योजंनासाठी श्री. कुंभार यांचेकडुन नाममात्र किमतीत विकत घेतली आहे.
• अन्नछत्रच्या विविध विकास कामासाठी तसेच भविष्यात शैक्षणिक कार्यासाठी मैंदर्गी-गाणगापूर रस्त्या लगत ५ एकर एन.ए. जागा ७२ खोली बांधकामासह विकत घेतली आहे.