परगावच्या स्वामीभक्तांसाठी निवासव्यवस्था

परगावच्या स्वामीभक्तांची महाप्रसादाची सोय झाली. परंतु हजारोंच्या संख्येने येणाऱ्या स्वामी भक्तांची निवासव्यवस्था नसल्याने त्यांना मनापासुन स्वामी सेवा रूजु करता येत नव्हती, त्यामुळे अन्नछत्र मंडळाने सुमारे १५ कोटींचा बांधकाम प्रकल्प हाती घेतला आणि सर्वप्रथम भाविकांच्या निवासासाठी यात्री निवास बांधण्याचे निश्चित झाले.

  • रू.३९०००/ खोली बांधकाम देणगीदार सदर योजना ही यात्री निवास १ हया भव्य वास्तुत असुन ही योजना अगदीच मर्यादीत असल्याने सदरची योजना पुर्ण झाली आहे. हया इमारतीमध्ये ६६ खोल्या असुन त्या खोल्यापैकी एका खोलीकरिता रू.३९०००/- असा कमीत कमी निधी घेऊन सदर भक्तांचे नांव संबंधित खोलीस लावले आहे.
  • रू.५१०००/- खोली बांधकाम देणगीदार सदरची योजना पूर्ण झाली असुन यात्रीभुवन २ हि भव्य इमारत सुद्धा भक्तांच्या सेवेत कार्यरत आहे.
अन्नछत्रात यात्रेकरूंच्या निवासाची बुकींग व्यवस्था

संस्थानच्या यात्रीनिवास १ आणि यात्रीभुवन २ हया यात्रेकरूंच्या निवासाच्या इमारतीतील निवासासाठी करण्यात येणारी अॅडव्हान्स बुकींग व्यवस्था ही सहज व सुलभ आहे. परगांवच्या दर्शन / प्रसादानिमित्त अक्कलकोट मुक्कामी अन्नछत्रात निवासाकरिता यावयाचे असेल तर ०२१८१/२२२५५५, ९०६७३००५५५ यात्री निवास १ आणि ०२१८१/२२२५८७, ९०६७६७०५८७ , ७४४८१२०४४४ हया फोन वर फोन करून अॅडव्हान्स बुकींग करता येते. अॅडव्हान्स बुकींगला कसल्याच प्रकाराचे देणगी शुल्क आकारले जात नाही. त्याचप्रमाणे अॅडव्हान्स बुकींग न करता एखादा भक्त अन्नछत्रात येऊन थेट बुकींग करिता सदर इमारतीत गेला तर त्यांना बुकींग होऊन सहज खोली मिळू शकते; कारण या दोन्ही इमारती मोठया असल्याने खोली मिळाली नाही असे कधीच होत नाही.

श्री शमिविघ्नेश गणेश मंदिर व सभा मंडप

गणेशमंदिर निवासी खोल्या व परिसरातील इतर बांधकामे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ परिसरात सदर जागा घेतल्यानंतर हया जागेचे सपाटीकरण करतेवेळेस शमीवृक्ष हया जागेच्या मध्यावर आढळून आल्याने त्याठिकाणी १९९४ साली या झाडाखाली श्री गणेशाची स्थापना करून त्याचे छोटे मंदिर बांधण्यात आले. कालांतराने हया गणेशाची बऱ्याच भाविकांना प्रचिती येऊ लागल्याने नवसास पावणारा गणपती अशी सर्वत्र ख्याती झाल्याने हया गणेशाचे ” शमिविघ्नेश गणेश ” असे नामकरण करण्यात आले. दर्शनासाठी भक्तांची दररोज गर्दी वाढत चालल्याने सदर मंदिराचा जिर्णोध्दार करण्याचे व त्यासमोर सुदंर असा ४२’×३०’ आकाराचे सभामंडप बांधण्याचे निश्चीत झाले. तसेच या गणेश मंदिराचे पिछाडीस लगतच निवासासाठी १२’×१५’ हया आकाराच्या मोठया अशा ८ खोल्या संडास बाथरूमसहित दोन मजल्यामध्ये बांधण्यात आल्या. सभा मंडपाचे बांधकाम करण्यात आले. या गणेश मंदिरा लगतच श्री हनुमानाचे छोटे मंदिर व त्यापुढे पत्र्याचे मोठे शेड उभारण्यात आले. या दोन्ही मंदिरामध्ये शिवस्माराकाची उभारणी करण्यात आली आहे.

इतर बांधकामे

प्रतिक्षागृह सदरचे बांधकाम हे २००१ या वर्षी करण्यात आले आहे. महाप्रसादासाठी स्वामीभक्तांची दिवसेंदिवस गर्दी वाढत चालल्याने त्यांना महाप्रसादासाठी व्यवस्थीत रांगेत सोडणे तसेच पंगत उठेपर्यंत अर्धा एकतास त्यांना ताटकळत उभे राहवे लागते हे सर्व लक्षात घेऊन संस्थानने यात्री निवास एक हया इमारतीलगतच कुंपण भिंतीस लागुन १००’×२०’ हया आकाराचे प्रतिक्षा हॉल बांधले आहे. हया शेड मध्ये १ हजार स्वामीभक्त प्रतिक्षेत बसु शकतात. तेथुनच रांगेने भक्तांना महाप्रसादगॄहात सोडले जाते.

महाप्रसादासाठी लागणारे धान्य व्यवस्थित व सुरक्षित ठेवण्याकरिता ४०’×२०’ हया आकाराचे धान्य गोदाम बांधण्यात आले आहे. हया धान्य गोदामामध्ये सर्व प्रकारचे लागणारे धान्य साठवुन ठेवले असुन हया गोदामाची क्षमता ५०० क्विंटल धान्य पोती इतकी आहे.

सदरचे शेड हे २५’×१२’ इतके असुन हया शेड मध्ये संस्थानचा श्री स्वामी समर्थांचा रथ ठेवण्यात आला आहे. सदर रथ हा मौल्यवान असुन हयाचे सर्व काम सागवाणी लाकडातुन तयार झाले आहे. अत्यंत कलाकुसर असलेला रथ संस्थानचे संस्थापक अध्यक्ष सन्मा. जन्मेजय विजयसिंहराजे भोसले यांनी त्यांच्या आदरंणीय पिताजी अक्कलकोट नरेश श्रीमंत. विजयसिंहराजे भोसले यांचे स्मरणार्थ अन्नछत्रास श्रीं च्या चरणी अर्पण केला आहे. सदरचा रथ श्री. स्वामी समर्थ महाराजांचे पुण्यतिथी उत्सवानिमित्त ७ दिवस पहाटे नगर प्रदक्षिणेस निघत असतो. तसेच संस्थानच्या श्री गुरूपोर्णिमा व वर्धापन दिना निमित्त निघणाऱ्या भव्य मिरवणुकीत हा रथ सर्वांचे आकर्षणाचा केंद्रबिंदु असतो. या रथाची जपणुक व्यवस्थित व्हावी यासाठी रथशेड उभारण्यात आले आहे.

अन्नछत्रात महाप्रसादासाठी व सदिच्छा भेटीस आलेल्या मान्यवर अतिथीकरिता सदर हॉल चे बांधकाम करण्यात आले आहे. हा हॉल अतिशय सुंदर असुन व्यवस्थित सजविण्यात आला आहे. येथे बैठक व्यवस्था असुन येथे ३० अतिथी आरामात बसु शकतात.

महाप्रसादगृहासमोरच आणि अतिथीकक्षा लगत मा. संस्थापक अध्यक्ष यांचे कार्यालयासाठी ही इमारत असुन १२’×१२’ खोली आणि या खोलीलगतच १२’× ८’ चे अॅन्टी चेंबर अशी एकंदरित रचना आहे. कार्यालयात संस्थापक अध्यक्षांचे अर्धगोलाकार टेबल आणि सुंदर कलाकुसर केलेले सिंहासन आहे व त्यासमोर सोफा व कोच अतिथींना बसण्यासाठी ठेवण्यात आले आहेत.

पञव्यवहार, पोष्टाने अंगारा व प्रसाद पाठविणे, देणगीदारांशी पञव्यवहार तसेच इतर कामकाजासाठी ही इमारत आलिकडेच बांधली आहे. येथे लिपीक वरिष्ठ लिपीक व कार्यालयीन अधिक्षक कार्यरत आहेत. याच इमारतीत संगणक कक्ष असुन येथे ऑपरेटर देणगीदारांची नांवे व त्यांचे पत्ते अभिप्राय तसेच दैनंदीन जमाखर्चाचा हिशोब करण्याचे काम करित असतात. तसेच नव्याने महाप्रसादगृहालगत देणगीकक्ष बांधला आहे.

ozototo https://nongkiplay.com/ samson88 samson88 samson88 kingbokep jenongplay samson88 dausbet dausbet cagurbet samson88 dausbet slot777 cagurbet slot mpo dausbet cagurbet samson88 dausbet https://www.chabad.com/videos/ cagurbet bintang4d samson88 karinbet cagurbet samson88 samson88 karinbet samson88 samson88 samson88 samson88 dausbet cagurbet dausbet cagurbet samson88 karinbet cagurbet dausbet cariwd88 samson88 cagurbet jamur4d cariwd88 basarnasbogor.com cagurbet cariwd88 dausbet samson88 samson88 samson88 karinbet samson88 cagurbet karinbet karinbet cariwd88 dausbet cagurbet surga 898 lobi89 lobi89 akun pro thailand cagurbet cagurbet samson88 cariwd88 cariwd88 cariwd88 cagurbet cariwd88 cariwd88 apk slot cagurbet samson88 slot terpercaya situs slot apk slot APK SLOT slot thailand bolang 588 cariwd88 cagurbet cagurbet samson88 cagurbet cagurbet cagurbet dausbet dausbet samson88 cariwd88 cagurbet cariwd88 cariwd88 cagurbet samson88 samson88 cariwd88 dausbet cagurbet macan238 cariwd88
apk slot gacor apk slot slot thailand scatter hitam slot deposit dana samson88 slot thailand slot thailand apk slot slot demo slot qris slot thailand apk slot apk slot apk slot slot online apk slot gacor apk slot apk slot