श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासकडून दैनंदिन येणाऱ्या स्वामी भक्तांची सेवा ही उल्लेखनीय असून, परिसरातील स्वच्छता, नम्र सेवा व पर्यावरणाची जपणूक केले जात असल्याचे मनोगत भाजपाचे प्रदेश अध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.
ते तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आले असता न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. त्यांच्या समवेत आमदार सुभाष देशमुख, आमदार राजेंद्र राऊत, आमदार सचिन कल्याणशेट्टी, पुणेचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, शहाजी पवार यांच्या देखील सत्कार न्यासाच्या वतीने करण्यात आला.
याप्रसंगी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरिस रुपये ३६८ कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल न्यासाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी महेश हिंडोळे, चेतनसिंह केदार, प्रा. चांगदेव कांबळे, दयानंद बिडवे, प्रकाश पाटील, रवी बिराजदार, बप्पा उमराणीकर, सचिन कलबुर्गी, विशाल कलबुर्गी, लखन झंपले, नन्नू कोरबू, रवींद्र वाघमोडे, निजप्पा गायकवाड, धनंजय गाढवे, नाविद डांगे, मोसीन बागवान, आसिफ बेग व न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त भाऊ कापसे, संतोष भोसले, मनोज निकम, अरविंद शिंदे, वैभव नवले, सौरभ मोरे, वैभव मोरे, स्वराज्य घाटगे, न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, एस.के.स्वामी, सिद्धाराम कल्याणी, बाळासाहेब पोळ, बाळासाहेब घाटगे, कल्याण देशमुख, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, नामा भोसले, दत्ता माने, राजू पवार, प्रसाद हुल्ले, निखिल पाटील, प्रवीण घाटगे, विराज माणिकशेट्टी, अतिष पवार, महांतेश स्वामी, समर्थ घाटगे, शरद भोसले, कल्याणी छकडे प्रतिक पोळ यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते