गोवाचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांची सदिच्छा भेट

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले अन्नदान श्रेष्ठ दान असून सर्वात मोठे नित्य अन्नदान होत आहे. न्यासाकडून होत असलेले स्वामी कार्य हे उल्लेखनीय असून आम्हा गोवेकारांना अन्नछत्र मंडळ हे श्रद्धास्थान असल्याचे मनोगत गोवाचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले.

ते तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आले असता मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.

त्यांच्या समवेत आमदार सचिन कल्याणशेट्टी, डॉ.अभय लोणावत, डॉ. रंजित सावंत, डॉ.नितीन भोसले, मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यधिकारी यशवंतराव कामात, भालचंद्र सावंत यांच्यासह आदीजन उपस्थित होते.

पुढे बोलताना मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत म्हणाले की, तीर्थक्षेत्र अक्कलकोटला येणाऱ्या लाखो स्वामी भक्तांना न्यासाच्या माध्यमातून स्वामींच्या प्रसादरूपी आशीर्वाद दिला जातो. अन्नदान बरोबरचं सामाजिक क्षेत्रात देखील न्यास अग्रेसर असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, मोतीराम राठोड, शिवशरण जोजन, बाळा शिंदे, राजेंद्र बंदीछोडे, राजू झिंगाडे, ऋषी लोणारी, प्रदीप पाटील, बसवराज शेळके, शितल फुटाणे, विराज माणिकशेट्टी, आप्पा हंचाटे, निखिल पाटील, बालाजी कटारे, राहुल वाडे, गोविंदराव शिंदे, कांतू धनशेट्टी, सौरभ मोरे, व मंडळाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, प्रवीण घाडगे, राहुल इंडे, सिद्धाराम कल्याणी, एस.के.स्वामी, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर,धानू उमदी, बाबूशा महिंद्रकर, बाळासाहेब घाडगे, दत्ता माने, पिंटू साठे, राजू पवार, प्रसाद हुल्ले, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.