श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली, न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत न्यासाच्या श्री शमी विघ्नेश गणेश मंदिरात गुरुवारी सायंकाळी श्री गणेशाचे पूजन श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले.
शमीवृक्षाखाली गेल्या ३२ वर्षा पूर्वी श्री गणेशाची स्थापना करून सुंदर असे मंदिर व सभामंडप बांधण्यात आले आहे. श्री स्वामी समर्थांच्या पावन भूमीवर श्री शमीविघ्नेश गणेश असल्याने त्याचे स्थान व महात्म्य अलौकिक आहे.
न्यासाची सहयोगी संस्था असलेल्या हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांचे सामुदायिक श्रीगणेश अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम मंडळ परिसरातील श्री शमीविघ्नेश् गणेश मंदिर येथे भगिनींचे मंगळवार, दि.६ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता आयोजित करण्यात आले असून नावे नोंदविण्या करिता महिला भगिनीकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
या प्रसंगी न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, मुख्य पालखी संयोजक संतोष भोसले, अँड.संतोष खोबरे, मनोज निकम, मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, संजय कुलकर्णी, सोमकांत कुलकर्णी, मुख्य आचारी बाळासाहेब पोळ, मुख्य सुरक्षा रक्षक महादेव अनगले, प्रा.चंद्रकांत पाटील, अनिल गवळी, महेश मलवे, बाळासाहेब घाडगे, निखील पाटील, प्रवीण घाडगे, अभियंता अमित थोरात, राजू पवार, अप्पा हंचाटे, संभाजीराव पवार, पिंटू साठे, बाबुशा महिंद्रकर, दत्ता माने, प्रसाद हुल्ले, महांतेश स्वामी, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, रमेश हेगडे, काशिनाथ वाले, सनी सोनटक्के, श्रीकांत मलालवे, चंद्रकांत कुंभार यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
शुक्रवार दि.2 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वा. महा वितरण अक्कलकोट शाखेचे सहाय्यक कार्यकारी अभियंता संजय म्हेत्रे यांच्या हस्ते श्रींची पूजा आयोजित करण्यात आली आहे.