श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ… श्री गणेश उत्सव-२०२२-दिवस 3

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली, न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत न्यासाच्या श्री शमी विघ्नेश गणेश मंदिरात शुक्रवार रोजी सायंकाळी महा वितरण अक्कलकोट शाखेचे सहाय्यक कार्यकारी अभियंता संजय म्हेत्रे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

गेल्या दोन दिवसापासून श्रींचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येत आहे. सदरील पुजा ही गुरुवार दि. ८ सप्टेंबर पर्यंत आयोजित करण्यात आले आहे. शमीवृक्षाखाली गेल्या ३२ वर्षा पूर्वी श्री गणेशाची स्थापना करून सुंदर असे मंदिर व सभामंडप बांधण्यात आले आहे. श्री स्वामी समर्थांच्या पावन भूमीवर श्री शमीविघ्नेश गणेश असल्याने त्याचे स्थान व महात्म्य अलौकिक आहे.

या प्रसंगी महावितरणचे सहाय्यक अभियंता धनराज होसमनी, राजदीप कुलकर्णी व न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, मुख्य पालखी संयोजक संतोष भोसले, मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, संजय कुलकर्णी, सोमकांत कुलकर्णी, मुख्य आचारी बाळासाहेब पोळ, धानप्पा उमदी, मुख्य सुरक्षा रक्षक महादेव अनगले, बाळासाहेब घाडगे, निखील पाटील, प्रवीण घाडगे, अभियंता अमित थोरात, राजू पवार, संभाजीराव पवार, पिंटू साठे, बाबुशा महिंद्रकर, प्रसाद हुल्ले, महांतेश स्वामी, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, रमेश हेगडे, सनी सोनटक्के, मुन्ना कोल्हे, अतिष पवार, गोरख माळी, श्रीनिवास गवंडी, श्रीकांत झिपरे, दत्ता माने, मल्लिकार्जुन बिराजदार यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

चौकट :
शनिवार दि.३ सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वा. अभियंता किरण पाटील यांच्या हस्ते श्रींची पूजा आयोजित करण्यात आली आहे.