महिलांचे सामुदायिक श्रीगणेश अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम

ओम नमस्ते गणपतये.. त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसि.. त्वमेव केवलं कर्तासि परिवर्तिनी स्मार्त एकादशी निमित्त मंगळवारी सकाळी ८ वा. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ व न्यासाची सहयोगी संस्था असलेल्या हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांचे सामुदायिक श्रीगणेश अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम मंडळ परिसरातील श्री शमीविघ्नेश् गणेश मंदिरा समोर शेकडो महिलांच्या मुखातून उमटलेल्या अथर्वशीर्ष पठणाच्या या सामूहिक स्वरांनी वातावरणात चैतन्य निर्माण झाले होते.

कोविड संकटानंतर दोन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर यंदाच्या गणेशोत्सवात हा सोहळा गणेशभक्तांनी मंगळवारी अनुभविला. मंगळवारी मंगलमय अनुभूतीचा प्रत्येय आला. आदिशाक्तीला गणरायाची सेवा करण्याची संधी लाभली.

गणेश नामाचा जयघोष करीत महिलांनी सकाळच्या मंगल समयी प्रसन्नतेची अनुभूती दिली. अथर्वशीर्ष पठण उपक्रमाचे यंदा पहिल्याच वर्षी महिलांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. पारंपरिक पेहरावातील महिलां सकाळपासूनच अथर्वशीर्ष पठणासा उत्सव मंडपासमोर गर्दी केली होती. महिलांनी ॐकार जप आणि मुख्य अथर्वशीर्ष ११ आवर्तने पठन करीत गणरायाला नमन केले.

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेंजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या उपस्थितीत व न्यासाची सहयोगी संस्था असलेल्या हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापिका अध्यक्षा अलकाताई भोसले यांच्या नेतृत्वाखाली महिलांचे सामुदायिक श्रीगणेश अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम भक्तिमय व उत्साही वातावरणात संपन्न झाला. दरम्यान श्री गणेश उत्सवानिमित्त आयोजित श्री गणेश अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमाचा प्रारंभ समाधी मठाचे पुरोहित धनंजय पुजारी यांच्या हस्ते दीपप्रज्वलाने करण्यात आले. समाधी मठाचे पुरोहित धनंजय पुजारी यांचा सत्कार प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आला.

अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रमात विविध महिला संघाचे पदाधिकारी व सदस्य आदींसह शेकडो भाविक सहभागी झाले होते. श्रींचे पूजन समाधी मठाचे पुरोहित धनंजय पुजारी यांच्या हस्ते करण्यात आले. अथर्वशीर्ष पठणानंतर महाआरती संपन्न झाली. कार्यक्रम न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, संजय कुलकर्णी, सोमकांत कुलकर्णी यांनी मंत्रोपचार केले. मंत्रोच्चापरात सोहळा पार पडताना भक्तिमय वातावरण बनले होते. नावे नोंदविलेल्या महिलांना अथर्वशीर्ष पोथी मंडळाकडून देण्यात आले. उपस्थित महिलांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. मंडळाचे सचिव शामराव मोरे यांच्या नियोजनाखाली कार्यक्रम संपन्न झाला.

दरम्यान उपस्थित महिलांचे स्वागत करून हळदी-कुंकू, पान-सुपारी, अथर्वशीर्ष पुस्तकाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापिका अध्यक्षा अलकाताई भोसले व सचिवा अर्पिताराजे भोसले यांच्या हस्ते जनकल्याण संस्थेच्या मल्लम्मा पसरे, वीरशैव महिला संघाच्या सुवर्णा साखरे, सखी महिला संघाच्या सोनल जाजू,मीनल तोरस्कर, गुरुमाई भजन मंडळाचे दिपाली रामदासी, एकमुखी दत्त मंदिर भजन मंडळाचे सुखदा ग्रामोपादय, श्रीराम महिला संघाच्या सुनंदा अष्टगी, उषा नकाते, वैष्णवी पुजारी, अश्विनी शिंपी, मनीषा पत्की, नीलिमा खजुर्गीकर, रूपा स्वामी यांचा श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेचे रत्नमाला मचाले आशा पाटील, स्मिता कदम, अंजना पवार, पल्लवी कदम, पल्लवी नवले, क्रांती वाकडे, कविता वाकडे, राजश्री माने, छाया पवार, आशा कदम, रूपा पवार, सुवर्णा घाडगे, तृप्ती बाबर, सोनाली मोरे, मंगला पाटील, वनिता पाटील, नंदा पाटील, स्वाती निकम, ज्योती कदम, स्वपना माने, उज्वला भोसले, संगीता भोसले यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे स्वागत, प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले तर आभार रत्नमाला मचाले यांनी मानले.

नेटके नियोजन :
श्री स्वामी समर्थ समाधी मठाचे पुरोहित धनंजय पुजारी व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांची भेट गेल्या ८ दिवसापूर्वी झालेली होती. या भेटी दरम्यान धनंजय पुजारी यांनी श्री गणेशोत्सवाचे दिवस आहेत, तरी अन्नछत्र मंडळाच्या परिसरात असलेल्या श्री शमी विघ्नेश गणेश मंदिरासमोर अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम घेण्याबाबत सुचविले असता, तात्काळ अमोलराजे भोसले यांनी अमलात आणून त्या क्षणी तारीख देखील जाहीर करण्यात आली. या पठण कार्यक्रमास कमी कालावधी असताना देखील नेटके नियोजन करण्यात आले.

अथर्वशीर्षचे महत्व :
थर्व म्हणजे चंचल आणि अथर्व म्हणजे स्थिर. शीर्ष म्हणजे मस्तक. ज्याच्या पठणामुळे बुद्धीला स्थिरता येते, असे उपनिषद म्हणजे अथर्वशीर्ष होय, असा याचा अर्थ लावला जातो. यात प्रथम गणपतीच्या सगुणब्रह्माची उपासना सांगून शेवटी गणपती म्हणजेच परब्रह्म होय, असे म्हटले आहे, तोच महामंत्रही आहे. गणपती हा विश्वाचा आधार असून, तो ज्ञान आणि विज्ञानमय आहे. जनकल्याण करिता फलश्रुती आहे. -धनंजय पुजारी पुरोहित, श्री स्वामी समर्थ समाधी मठ, श्रीक्षेत्र अक्कलकोट

या कार्यक्रमास न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, विश्वस्त संतोष भोसले, अप्पा हंचाटे, मनोज निकम, राजाभाऊ नवले, अरविंद शिंदे, आनंद खजुर्गीकर, पिंटू साठे, बाळासाहेब घाडगे, बाळासाहेब पोळ, धानप्पा उमदी, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, नामा भोसले, दत्ता माने, संभाजीराव पवार, बाबुशा महिंद्रकर, शिवराज कुंभार, सौरभ मोरे, विजयकुमार हौदे, अभियंता अमित थोरात, विशाल घाडगे, निखील पाटील, प्रवीण घाडगे, सनी सोनटक्के, अतिष पवार, विराज मानशेट्टी, बसवराज क्यार, राजू पवार, रमेश हेगडे, प्रसाद हुल्ले, महांतेश स्वामी, धनंजय निंबाळकर, किरण साठे, गणेश लांडगे, महादेव मिनगले, किरण जाधव, राजू विभूते, काशिनाथ वाले यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.