धार्मिक स्थळांचा आदर्श श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ हे न्यास आहे, मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली स्वामी भक्तांना उत्तम सुविधा दिल्या जात आहेत, एक उत्कृष्ठ व्यवस्थापन असल्याचे मनोगत सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी व्यक्त केले.
ते श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आले असता न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याबरोबरच भरत सरकारचे क्षेत्रीय प्रसिद्धी अधिकारी अंकुशराव चव्हाण सोलापूर, यांचा देखील सत्कार न्यासाच्या वतीने करण्यात आला. यावेळी क्षेत्रीय प्रचार सहाय्यक अंबादास यादव भरत सरकार सोलापूर, नायब तहसीलदार विकास पवार, जिल्हा महिति कार्यालयाचे अमित खडतरे हे उपस्थित होते.
याप्रसंगी वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानाचे अध्यक्ष महेश इंगळे, न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, मनोज निकम, सनी सोनटक्के, प्रवीण घाडगे, पिंटू दोडमनी, पिंटू साठे, निखील पाटील, पुरोहित अप्पू पुजारी, संजय कुलकर्णी, एस.के.स्वामी, सिध्दाराम कल्याणी, बाळासाहेब पोळ, सतीश महिंद्रकर, अप्पा हंचाटे, शहाजी यादव, नामा भोसले, दत्ता माने, मंडल अधिकारी ओंकार माने, तलाठी पंचप्पा म्हेत्रे, सुनील नंदिकोले, वाहिद नाईकवाडी, दीपक सोनकांबळे, सौरभ मोरे, विराज माणिकशेट्टी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.