हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा मातोश्री सौ.आलकाताई (आईसाहेब) जन्मेजयराजे भोसले यांचा वाढदिवस साजरा

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या पत्नी व न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या मातोश्री मंडळाचे विश्वस्त व हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा मातोश्री सौ.आलकाताई (आईसाहेब) जन्मेजयराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त न्यासाच्या वतीने सत्कार करण्यात आले.

श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात मातोश्री सौ.आलकाताई (आईसाहेब) जन्मेजयराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त न्यासाचे सचिव शामराव मोरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, विश्वस्त संतोष भोसले, संगीता भोसले, एस.के.स्वामी, सिध्दाराम कल्याणी, बाळासाहेब पोळ, सतीश महिंद्रकर, शहाजीबापू यादव, नामा भोसले, अभियंता अमित थोरात, पिंटू साठे, दत्ता माने, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे व हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या पदाधिकारी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.