संभाजीनगर (औरंगाबाद) शिवसेनाचे खासदार चंद्रकांत यांची सदिच्छा भेट

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले व त्यांचे पुत्र प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले हे स्वामी सेवेला वाहून घेतले असून न्यासाच्या माध्यमातून महान कार्य घडत असल्याचे मनोगत संभाजीनगर (औरंगाबाद) शिवसेनाचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केले.

ते तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र (ट्रस्ट) मंडळात आले असता न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.

त्यांच्या समवेत शिवसेना सोलापूर जिल्हा उपप्रमुख संतोष पाटील, आनंद बुक्कानुरे, भीमाशंकर म्हेत्रे, राजू बिराजदार, संतोष बुक्कानुरे यांच्यासह आदिजन उपस्थित होते.

यावेळी न्यासाचे सचिव शामराव मोरे, एस.के.स्वामी, सिध्दाराम कल्याणी, सतीश महिंद्रकर, शहाजीबापू यादव, नामा भोसले, अभियंता अमित थोरात, प्रवीण घाडगे, निखील पाटील, दत्ता माने, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.