राज्यसभा सदस्य धनंजय महाडिक यांची सदिच्छा भेट


श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाची उत्तरोत्तर प्रगती होत आहे. अन्नछत्रमध्ये होत असलेली सेवा पाहून मन प्रसन्न झाले. रोज १० ते १५ हजार लोकांना प्रसाद व्यवस्था करणे, त्या सर्व लोकांची व्यवस्था करणे हे अद्वितीय कार्य पाहून थक्क झालो असल्याचे मनोगत कोल्हापूरचे राज्यसभा सदस्य धनंजय महाडिक यांनी व्यक्त केले.

ते श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात सहकुटुंब आले असता न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वतस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

यावेळी न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त संतोष भोसले, एस.के.स्वामी, सिध्दाराम कल्याणी, बाळासाहेब पोळ, सतीश महिंद्रकर, शहाजीबापू यादव, नामा भोसले, धानप्पा उमदी, अभियंता अमित थोरात, दत्ता माने, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, प्रवीण घाडगे, निखील पाटील, यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.