श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आणि महाराष्ट्र बहुजन मध्यवर्ती शिवजन्मोत्सव युवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शिव छत्रपतींच्या भव्य मिरवणूकीने जय भवानी…! जय शिवराय…!! च्या जयघोषात शिवजन्मोत्सवाची सांगता करण्यात आली

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आणि महाराष्ट्र बहुजन मध्यवर्ती शिवजन्मोत्सव युवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आधारस्तंभ जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानाचे अध्यक्ष महेश इंगळे व मंडळाचे सुरेशचंद्र सूर्यवंशी, शामराव मोरे, बाबासाहेब निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व संयोजक अमोलराजे भोसले मित्र मंडळ यांच्या वतीने मंगळवारी शिव छत्रपतींच्या भव्य मिरवणूकीने जय भवानी…! जय शिवराय…!! च्या जयघोषात शिवजन्मोत्सवाची सांगता करण्यात आली. या मिरवणुकीत अमोलराजे भोसले मित्र मंडळाचे हजारो युवकांच्या लेझीम पथकाचा खेळ लक्षवेधी ठरले..!

मंगळावरी सायंकाळी ६ वा. शिव छत्रपतींची भव्य मिरवणूक माजी गृह राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी, सो.म.पा.माजी उप महापौर दिलीप भाऊ कोल्हे, मारवाडी समाजाचे अध्यक्ष जवाहर जाजू, तहसीलदार बाळासाहेब सिरसट, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर, न.प.मुख्याधिकारी सचिन पाटील, शिंदे गटाचे सोलापूर जिल्हा प्रमुख अमोल (बापू) शिंदे, उत्तर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी, दक्षिण पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक महेश स्वामी, सकल मराठा राज्य समन्वयक माऊलीभाऊ पवार, माजी शिक्षण सभापती संकेत पिसे, शैलेश पिसे, सागर पिसे, दिनेश जाधव, संजय शिंदे, सो.म.पा. माजी परिवहन सभापती राजनभाऊ जाधव, समीर लोंढे यांच्या शुभहस्ते मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला.

सदराची मिरवणूक जुना राजवाडा, नेहरू गल्ली, श्री कमलाराजे चौक, ए-वन चौक, नवीन राजवाडा मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक (बस स्थानक), विजय चौक, तारामाता चौक, कारंजा चौक, मेन रोड, वीर सावरकर चौक, सेन्ट्रल चौक मार्गे समर्थ चौक ते राजे फत्तेसिंह चौक येथे मिरवणुकीची सांगता करण्यात आली.

याप्रसंगी शिवजन्मोत्सव अध्यक्ष निखील पाटील, उपाध्यक्ष बालाजी पाटील, सचिव अनिकेत (सन्नी) सोनटक्के, खजिनदार शितलबापू फुटाणे, कार्याध्यक्ष अतिश पवार, फहीम पिरजादे, मिरवणूक प्रमुख प्रवीण घाडगे, गोटू माने, लेझीम संघ व्यवस्थापक वैभव मोरे, प्रथमेश पवार, समर्थ घाडगे, योगेश पवार, शिवजयंती स्टेज व मिरवणूक ट्रॉली सजावट प्रमुख राहुल मोरे, वैभव कामनुरकर, व्यवस्थापक मनोज निकम, राजाभाऊ नवले, सौरभ मोरे, रोहित खोबरे, सत्कार प्रमुख आकाश शिंदे, प्रशांत कडबगावकर यांच्यासह आदिजन उपस्थित होते.

या शिवजन्मोत्सव मिरवणुकीस जि.प.माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील, माजी पक्ष नेता महेश हिंडोळे, शिंदे गटाचे शिवसेना तालुका प्रमुख संजय देशमुख, माजी नगराध्यक्ष बसलिंगप्पा खेडगी, भाजपा तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड, माजी उपनगराध्यक्ष यशवंत धोंगडे, अन्नछत्र मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, संपादक प्रवीण देशमुख, जेष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ.मनोहर मोरे, माजी जि.प.सदस्य आनंद तानवडे, गोकुळ शुगरचे अध्यक्ष दत्ता शिंदे, श्री फत्तेसिंह शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ माने, प्रल्हाद जाधव, विश्वस्त तानाजी चव्हाण, सुधाकर गोंडाळ, सोपान काका गोंडाळ, संतोष जाधव, जेष्ठ विधिज्ञ अॅड.शरद फुटाणे, पंचरत्न फायनान्सचे अध्यक्ष लाला राठोड, माजी नगरसेवक उत्तम गायकवाड, रासप पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुनिल बंडगर, आरपीआय तालुकाध्यक्ष अविनाश मडीखांबे, चेतन साखरे, अमर शिंदे, माजी प.स.सदस्य बाळासाहेब मोरे, प्रसिद्ध उद्योगपती अभिनंदन गांधी, अरविंद शिंदे, प्रसिद्ध उद्योगपती विलासराव कोरे, डॉ.आर.व्ही.पाटील, लेखापरीक्षक ओंकारेश्वर उटगे, हॉटेल व्यवसायीक सिद्धेश्वर मोरे, सुनील गोरे, दिनेश पटेल, अनुलोमचे राजकुमार झिंगाडे, अक्कलकोट बाजार समितीचे माजी उप सभापती अप्पासाहेब पाटील, समाजसेवक शिवराज स्वामी, युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब पाटील, समाजसेवक सुभाष पुजारी , माजी नगरसेवक सद्दाम शेरीकर, उद्योगपती अप्पू पराणे, बसवराज माशाळे, सामाजिक कार्यकर्ते मैनुद्दीन कोरबू, माजी नगरसेवक राम समाणे, सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर पाटील, नन्नु कोरबू, आनंद पवार, भाजपा शहर अध्यक्ष शिवशरण जोजन, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समितीचे अध्यक्ष तम्मा (मामा) शेळके, सामाजिक कार्यकर्ते शबाब कोरबू, दीपक जरीपटके, प्रा.शिवशरण अचलेर, अलीबाशा अत्तार, मातंग समाज सुनिल खवळे, दयानंद रोडगे, नागराज कुंभार, वडार समाजाचे तालुका अध्यक्ष अंकुश चौगुले, सामाजिक कार्यकर्ते अकिल बागवान, सामाजिक कार्यकर्ते पिंटू सोनटक्के, भाजपा शहर सरचिटणीस बाळासाहेब शिंदे, लोकमान्य चे सिध्दाराम टाके, प्रहारचे अमर सिरसट, माजी सरपंच प्रदीप जगताप, भाजपा युवा मोर्चाचे ऋषी लोणारी, सामाजिक कार्यकर्ते सतीश सिरसट, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे, रविराज सिद्धे, सोनू बळोरगी, फारुख बबरची, शिंदे गटाचे शहर प्रमुख योगेश पवार, भारिप तालुकाध्यक्ष संदिप मडीखांबे, चुंगी माजी सरपंच दिलीप काजळे, सांगावी सरपंच बाळासाहेब भोसले, संजय गांधी निराधार समितीचे सदस्य सिद्धाराम माळी, अरुण विभूते, लहूजी सेना अध्यक्ष वसंतराव देडे, माजी सरपंच अमर पाटील, सरपंच उमेश पाटील, छत्रपती प्रतिष्ठानचे गणेश गोब्बुर, माजी सरपंच सतीश पवार, पोलीस पाटील संघटनेचे रहिमान शेख, सामाजिक कार्यकर्ते लखन झंपले, इरण्णा कणमुसे, सर्फराज शेख यांच्यासह हजारो शिवप्रेमींच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील प्रमुख मार्गावरून नयनरम्य व उत्साहात मिरवणूक संपन्न झाली.

दरम्यान सोलापूर शहर व जिल्ह्यातुन, आणि अक्कलकोट तालुक्यातून आलेल्या शिव प्रेमींनी अमोलराजे भोसले व महेश इंगळे यांच्या सत्कार करण्यात आला. आरास केलेले वैभव कामनुरकर, समर्थ घाडगे यांचा सत्कार करण्यात आला. न्यासाचे पुरोहित अप्पू पुजारी यांनी मंत्रांच्या जयघोषात विधीवत्त छत्रपतींच्या पुतळ्याचे पूजन व आरतीकरण्यात आले. मेघडंबरिस विविध आकर्षक फुलांनी सजविण्यात आले होते. प्रा.प्रकाश सुरवसे यांनी सूत्रसंचालन केले.