श्री शमी विघ्नेश् गणेश मंदिरा समोर शेकडो महिलांच्या मुखातून उमटलेल्या अथर्वशीर्ष पठण सामूहिक स्वरांनी मंगलमय वातावरणात चैतन्य व मोठ्या उत्साह संपन्न झाला.


श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाच्या श्री शमी विघ्नेश गणेश मंदिरात सालाबादप्रमाणे यंदाही रविवारी सायंकाळी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ व न्यासाची सहयोगी संस्था असलेल्या हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांचे सामुदायिक श्रीगणेश अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम मंडळ परिसरातील श्री शमी विघ्नेश् गणेश मंदिरा समोर शेकडो महिलांच्या मुखातून उमटलेल्या अथर्वशीर्ष पठण सामूहिक स्वरांनी मंगलमय वातावरणात चैतन्य व मोठ्या उत्साह संपन्न झाला.

गणेश नामाचा जयघोष करीत महिलांनी सायंकाळच्या मंगल समयी प्रसन्नतेची अनुभूती दिली. अथर्वशीर्ष पठण उपक्रमाचे यंदा पाचव्या वर्षीही महिलांचा उदंड प्रतिसाद मिळाला. पारंपरिक पेहरावातील महिलां सायंकाळी अथर्वशीर्ष पठणासा उत्सव मंडपासमोर गर्दी केली होती. महिलांनी ॐकार जप आणि मुख्य अथर्वशीर्ष पठन करीत गणरायाला नमन केले.

दरम्यान या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन समाधी मठाचे पुरोहित धनंजय पुजारी, कु.ऋषी पुजारी, संस्थापिका अध्यक्षा अलकाताई जनमेजयराजे भोसले, सचिवा अर्पिताराजे अमोलराजे भोसले, मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, सचिव शामराव मोरे, माजी नगराध्यक्ष अनिताताई खोबरे, यांच्या उपस्थितीत करण्यात आला. याप्रसंगी समाधी मठाचे पुरोहित धनंजय पुजारी यांनी मनोगत व्यक्त केले.

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या विश्वस्त व अन्नछत्र मंडळाची सहयोगी संस्था असलेल्या हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापिका अध्यक्षा अलकाताई जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली महिलांचे सामुदायिक श्रीगणेश अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम भक्तिमय व उत्साही वातावरणात संपन्न झाला. दरम्यान श्री गणेश उत्सवानिमित्त आयोजित श्री गणेश अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमाचा प्रारंभ ‘श्रीं’च्या नित्यपूजनाने झाला. श्रींचे पूजन समाधी मठाचे पुरोहित धनंजय पुजारी यांच्या हस्ते करण्यात आले.

अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रमात परिसरातील मुली, महिला आदींसह बहुसंख्य भाविक सहभागी झाले होते. अथर्वशीर्ष पठणानंतर समाधी मठाचे पुरोहित धनंजय पुजारी व जमलेल्या भाविकांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. कार्यक्रमाचे न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, संजय कुलकर्णी, सोमकांत कुलकर्णी यांनी केले. मंत्रोच्चापरात सोहळा पार पडताना भक्तिमय वातावरण बनले होते. नावे नोंदविलेल्या महिलांना अथर्वशीर्ष पोथी मंडळाकडून देण्यात आली. कार्यक्रमास आलेल्या सर्व महिलांना प्रसाद देण्यात आला.

यावेळी हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या सचिवा- अर्पिताराजे अमोलराजे भोसले, कु. तेजस्विनीराजे अमोलराजे भोसले, कु. स्वामिनीराजे अमोलराजे भोसले, स्मिता कदम, स्वाती निकम, संगिता भोसले, पल्लवी कदम, कविता भोसले, सुवर्णा घाटगे, स्वप्ना माने, कविता वाकडे, छाया पवार, रुपाली पवार, श्रुती मोरे, तृप्ती बाबर, वैशाली यादव, कोमल क्षिरसागर, वैशाली क्षिरसागर, रुपाली भोसले, सौ तडकलर , रुपाली गडदे,माधवी धमॅसाले, प्रमिला देशमुख,श्रीमती जंगाले उज्वला निंबाळकर, शकुंतला कटारे, यांच्यासह आदिजन बहुसंखयेने उपस्थित होते.