८ वे पुष्प – आदेश बांदेकर यांच्या ‘खेळ मांडियेला’ कार्यक्रमाला महिलांची उत्स्फूर्त गर्दी

अक्कलकोट : (प्रतिनिधी)
श्रीक्षेत्र अक्कलकोटला श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या मुळे सांस्कृतिक वारसा लाभला असून, गेल्या २७ वर्षापासून धर्मसंकीर्तन व सांस्कृतिक कार्यक्रम होत असल्याने कलाकारांना प्रोत्साहन व व्यासपीठ मिळवून देण्याचे कार्य घडत आहे, उपस्थित माता भगिनींच्या चेहर्‍यावरील आनंद पाहून भारावलो अशी प्रतिक्रीया ख्यातनाम अभिनेते आदेश बांदेकर यांचा “खेळ मांडियेला” कार्यक्रमाच्या वेळी मनोगतातून व्यक्त केले. महाराष्ट्रभर गाजलेले लाडके भाऊजी म्हणजेच आदेश बांदेकर यांच्या कार्यक्रमासाठी महिलांची अक्षरशः झुंबड पडली होती. दैनंदिन जीवनात व्यस्त असलेल्या महिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याच्या हेतुने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

ते श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाचा ३९ वा. वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सव न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली होत असून, रविवार दि. २६ जुलै रोजी सायंकाळी ७.१५ वा. अभिनेते आदेश बांदेकर प्रस्तुत ‘खेळ मांडीयेला’ (खेळ, किस्से, गप्पा, साऱ्या कुटुंबासाठी) ह्या कार्यक्रमाने ८ वे पुष्प संपन्न झाले. याप्रसंगी आदेश बांदेकर बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात श्री स्वामी समर्थांच्या नामाने करण्यात आली.

या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन जि. प. सदस्या शांभवीताई कल्याणशेट्टी, गिरीजाताई राजीमवाले, भगिनी समाज अध्यक्ष- विशाला अभय दिवाणजी सोलापूर, मल्लमाताई पसारे, डॉ.आसावरीताई पेडगावकर, डॉ.सौ.वेळापूरकर, डॉ. मेंथे, सुचित्रा बांदेकर, सोहम बांदेकर, पूजा बांदेकर, नगरसेविका – अपर्णाताई किशोर सिद्धे, स्नेहाताई संतोष खवळे, सुनंदाताई श्रीशैल स्वामी, श्रीमती कस्तुराबाई चौगुले, अमृताताई खंडेराया शिंदे, भागुबाई नागराज कुंभार, सोनालीताई विक्रम शिंदे, रेणुकाताई शैलेश राठोड, अंजलीताई नानद सोलापूर, डॉ.सायलीताई बंदीछोडे, शांती हॉस्पिटल, वीरशैव महिला मंडळ अध्यक्षा – लक्ष्मी शरणप्पा अचलेर, वैशाली राजेंद्र लिंबीतोटे यांच्या हस्ते व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ विश्वस्त, हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्था अध्यक्षा- अलकाताई जनमेजयराजे भोसले, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ विश्वस्त, हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्था सचिव- अर्पिताराजे अमोलराजे भोसले, अनुयाताई संदीप फुगे, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ क्रियाशील सदस्य- सरोजिनीताई मोरे काकू, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ विश्वस्त- अनिताताई अभय खोबरे, दिव्या मोरे, हिरकणी महिला बहुउद्धेशीय संस्था उपाध्यक्षा- रत्नमालाताई अरुण मचाले यांच्या उपस्थितीत करण्यात आले. दरम्यान श्रींची प्रतिमा, नटराज व स्वर्गीय लतादीदी मंगेशकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी लकी ड्रॉचे कुपन देण्यात येत होते. मंचावर महिलांसह विविध खेळ, गप्पा, चर्चा करत कार्यक्रम मोठ्या उत्साहात मंगलमय वातावरणात पार पडला. विजेत्या महिलांना मानाच्या ५ पैठणी, २५० घड्याळ पारितोषिक म्हणून देण्यात आले. दरम्यान पुणे येथील ज्ञान प्रबोधनकार या अपंग व अंध संस्थेच्या कलाकारांनी भजनाचा कार्यक्रम उत्तम रित्या सादर केले.

महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांनाही आनंदाचे क्षण वेचता यावेत या अनुषंगाने महाराष्ट्रभर गाजत असलेले लाडके भाऊजी म्हणजेच आदेश बांदेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत खेळ मांडियेला संपन्न झाला. शेकडो माता-भगिनींनी या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. सुप्रसिध्द अभिनेते आदेश बांदेकर व कलाकार यांच्यासह मान्यवरांचा न्यासाच्या वतीने सत्कार करण्यात आला. न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, संजय व सोमकांत कुलकर्णी यांच्या हस्ते मंत्र पठणाने पूजन संपन्न झाले.

चौकट:
संदेश –
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट या आपल्या संस्थेमार्फत दि. १९ ते २८ जुलै, २०२६ या कालावधीत धर्मसंकीर्तन व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे समजते. तसेच गुणीजनांचा व गुणवंत विद्यार्थ्यांचा पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात येणार असल्याचे दिसते. हा उपक्रम समाजास निश्चितच स्तुत्य व प्रेरणादायी आहे.
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने संस्थेचे धर्मप्रसार, अन्नदान, समाजसेवा आणि संस्कार जपणारे कार्य उत्तरोत्तर वृद्धिंगत होत राहो तसेच सर्व भक्तांना उत्तम आरोग्य, सुख, समृद्धी आणि आध्यात्मिक उन्नती लाभो, हीच सदिच्छा!
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट यांच्या ३९ व्या वर्धापन दिनानिमित्त तसेच श्री गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त सर्व पदाधिकारी, सेवेकरी आणि भाविक भक्तांना मनःपूर्वक शुभेच्छा!
(अॅड. राहुल सुरेश नार्वेकर)
अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा

यावेळी स्वाती निकम, कु. तेजस्विनीराजे अमोलराजे भोसले, कु. स्वामिनीराजे अमोलराजे भोसले, स्मिता कदम, पल्लवी कदम, उज्वला भोसले, संगीता भोसले, रूपा पवार, स्वप्ना माने, कविता वाकडे, सुवर्णा घाडगे, राजश्री माने, क्रांती वाकडे, अनिता गडदे, धनश्री पाटील, कल्पना मोरे, अक्षता मोरे, कोमल क्षीरसागर, शितल क्षीरसागर, अक्षता खोबरे, रुपाली भोसले, व न्यासाचे उपाध्यक्ष- अभय खोबरे, सचिव- शामराव मोरे, राजेराय मठाचे अध्यक्ष अॅड. शरदराव फुटाणे-जाधव, संदीपदाजी फुगे, कु. हर्षवर्धनराजे अमोलराजे भोसले, समर्थ संदीप फुगे, विश्वस्त- लक्ष्मण पाटील, संतोष भोसले, राजेंद्र लिंबीतोटे, मनोज निकम, रमेश केत, मल्लिनाथ स्वामी, रोहित खोबरे, अरविंद शिंदे, अप्पा हंचाटे, सौरभ मोरे, प्रवीण देशमुख, निखील पाटील, अतिश पवार, प्रवीण घाडगे, गोटू माने, बाळासाहेब घाटगे, अश्पाक काझी, मैनुद्दीन कोरबू, बाळासाहेब पोळ, कुमार सलबत्ते, सर्फराज शेख, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, दत्ता माने, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, महांतेश स्वामी, संजय गोंडाळ, सत्तारभाई शेख, प्रसाद मोरे, वैभव मोरे, फहीम पिरजादे, केदार तोडकर, योगेश पवार, आकाश सूर्यवंशी, विनायक भोसले, भरत राजेगावकर, मल्लिकार्जुन बिराजदार, प्रा. शरणप्पा आचलेर, प्रशांत साठे, गोविंदराव शिंदे, ज्ञानेश्वर भोसले, समर्थ चव्हाण, सुमित कल्याणी, राहुल इंडे, उमेश येळसंगी, मुन्ना फडतरे, अमर पोतदार, अमर मसरे, पिंटू दोडमनी, शंभूलिंग अकतनाळ, मारुतीराव बावडे, दयानंद दणुरे, चाचा कडगंची, महेश लोकापुरे, सुनिल खवळे, खंडेराया शिंदे, प्रीतीश किलजे, शैलेश राठोड, प्रा.शरणप्पा अचलेर, विराज माणिकशेट्टी, बाबुराव कुलकर्णी, शिवा मंगरुळे, श्रीधर गुरव, रमेश हळसंगी, असद फुलारी, संतोष माने, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, विठ्ठलराव रेड्डी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण, श्रोते बहुसंख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन श्वेता हुल्ले यांनी केले तर न्यासाचे सचिव शामराव मोरे यांनी रसिकप्रेक्षकांचे स्वागत व आभार मानले. उत्कृष्ठ लाईट व्यवस्था शंभूराजे इलेक्ट्रिकल यांनी केले.

चौकट :
अन्नछत्र हे सुंदर व पवित्र ठिकाण :
श्रीक्षेत्र अक्कलकोटला श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या मुळे सांस्कृतिक वारसा लाभला आहे. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ हे सुंदर व पवित्र ठिकाण असून, सेवा करण्याची संधी मला लाभत आहे.
-अभिनेते आदेश बांदेकर

चौकट :
गुणीजन गौरव : वैशालीताई पांडगळे, कु.शिलवंती गंगाधर राजमाने, जयश्री दत्तात्रय गवंडी, विजयालक्ष्मी रामचंद्र शिऊर, अंबिका बसप्पा लिगाडे यांचा न्यासाच्या वतीने गुणीजन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

चौकट :
गुणवंत विद्यार्थी गौरव :
तालुक्यातील इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेत उत्तम गुण मिळवलेल्या १० गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव न्यासाच्या वतीने करण्यात आला.

चौकट :
दि. २७ जुलै रोजी सोमवार सायंकाळी ७.१५ ते रात्रौ ९.३० पर्यंत नृत्य अविष्कार “ संभवामि युगे युगे” संकल्पना, नृत्य व दिग्दर्शन – संस्कृती बालगुडे, पुणे यांचा कार्यक्रम सादर होणार आहे.

चपळगांव-बावकरवाडी ग्रामपंचायतीकडुन चांगुलपणाचा सन्मान..!

भोसले परिवाराचा मानपत्र देत नागरी सत्कार
==================

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ,अक्कलकोट यांच्या ३९ व्या वर्धापन दिनानिमित्त व श्री गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त समाजहिताचे विविध उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून सातत्यपूर्ण व यशस्वीरित्या राबविल्याबद्दल चपळगाव व बावकरवाडी ग्रामस्थ-ग्रामपंचायत परिवाराच्यावतीने अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले व कार्यकारी अध्यक्ष श्री अमोलराजे जनमेजयराजे भोसले या पिता-पुत्रांचा मानपत्र प्रदान करून गौरवपूर्ण सन्मान करण्यात आला.

यावेळी गावच्या प्रशासक सरपंच सौ.वर्षा सिद्धाराम भंडारकवठे, सामाजिक कार्यकर्ते सिद्धाराम भंडारकवठे,गणेश कोळी,ग्रामपंचायत अधिकारी श्री विनोद डावरे,गावचे सुपुत्र सीए ओंकारेश्वर उटगे,
ग्रामपंचायत सदस्य परमेश्वर वाले,लिपीक उमेश सोनार,
विजय कोरे,धर्मेंद्र दुलंगे, प्रकाश बुगडे,रतन कोरे, विष्णुवर्धन कांबळे,
बसवराज हन्नुरे,रविकांत कोरे,पत्रकार शंभुलिंग अकतनाळ यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या कार्यामुळे अक्कलकोटचे नाव सबंध जगभरात पोहोचले आहे.इथे चालणारे प्रत्येक कार्य वर्तमानकाळ,भूतकाळ आणि भविष्यकाळ यांची सांगड घालून करण्यात येते. गुरुपौर्णिमेनिमित्त चालणारे कार्यक्रम हे आजच्या तरुणांसाठी दिशादर्शक आहेत.आणि हे कार्य सातत्याने सुरू असल्यामुळे सामाजिक बांधिलकीतून भोसले पिता-पुत्रांचा सन्मान आम्ही ग्रामस्थ करीत असल्याचे उद्गार प्रशासक सरपंच वर्षा भंडारकवठे यांनी व्यक्त केले.

दरम्यान,समाजसेवेच्या या कार्याला लाभलेला चपळगांवकरांचा हा सन्मान संपूर्ण अन्नछत्र मंडळ परिवारासाठी प्रेरणादायी आहे.भविष्यातही सेवा, संस्कार आणि समाजहिताचे उपक्रम अधिक जोमाने सुरू राहतील.अशा भाषेत संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांनी गौरवोद्गार व्यक्त केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *