*श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले व त्यांचे पुत्र प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांनी सुरु केलेल्या महाप्रसादाच्या सेवेबरोबरच विविध उपक्रम हे धाडशी नेतृत्व व प्रबळ इच्छाशक्तीमुळेच न्यासाचा प्रचंड विस्तार होत आहे. हे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात लौकिक, धार्मिक व सांस्कृतीकतेचे प्रतिक असल्याचे मनोगत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना.नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.*
ते श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील स्वामी समर्थ अन्नछत्र (ट्रस्ट) मंडळात सहपरिवार आले असता मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना ना.नितीन गडकरी यांनी म्हणाले की, गडकरी कुटुंबीय आम्ही श्रीक्षेत्र अक्कलकोट निवासी स्वामी भक्तच, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, हे स्वामींची अनुभूतीच आहे, व आमचे श्रध्देय स्थळ आहे. न्यासाच्या वतीने पर्यावरण पूर्वक वसुंधरेची जपणूक केली जात असल्याचे समाधान व्यक्त करून मंडळाकडून समर्थ महाप्रसाद सेवेची माहिती घेऊन न्यासाच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. तर ना.गडकरी यांच्या पत्नी कांचन गडकरी यांनी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ या न्यासाची महाराष्ट्र पालखी परिक्रमा नागपूर शहरात येत असते त्यावेळी आम्ही आवर्जून श्रींचे दर्शन घेतो. पालखी परीक्रामाचे नियोजन व व्यवस्थापनाचे त्यांनी कौतुक केले.
याप्रसंगी त्यांच्या समवेत दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष (बापू)देशमुख, पत्नी सौ.स्मिता सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, पत्नी सौ.शांभवी कल्याणशेट्टी, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार व न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, अँड.संतोष खोबरे, लेखापरीक्षक ओंकारेश्वर उटगे, अभिनंदन गांधी, इंजी.किरण पाटील, अमित थोरात, बालाजी कटारे, मनोज निकम, प्रविण देशमुख, अरविंद शिंदे, महेश हिंडोळे, कांतु धनशेट्टी, दयानंद बिडवे, अविनाश मडीखांबे, ऋषी लोणारी, राजकुमार झिंगाडे, धनंजय गाढवे, अक्कलकोट तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकुमार जगदाळे, मुंबई मराठी पत्रकार परिषद शाखा अक्कलकोटचे अध्यक्ष अरविंद पाटील हे उपस्थित होते.
यावेळी न्यासाचे पुरोहित अप्पू पुजारी, संजय कुलकर्णी, विश्वस्त संतोष भोसले, बाळासाहेब पोळ, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, एस.के.स्वामी, सिद्धराम कल्याणी, बाळासाहेब घाडगे, अप्पा हंचाटे, कल्याण देशमुख, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, पिंटू साठे, दत्ता माने, विनायक तोडकर, श्रीकांत झिपरे, अतिश पवार, शिरीष पाटील, सागर पवार, कुणाल भालेकर मुंबई व कन्नड साहित्य परिषद महाराष्ट्र घटकाचे अध्यक्ष सोमशेखर जमशेट्टी, सचिव शरणप्पा फुलारी, प्रकाश पाटील, निखील पाटील, प्रविण घाडगे, रुद्रय्या स्वामी, गोविंदराव शिंदे, सत्तारभाई शेख यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.