प्रसिध्द अभिनेता आदेश बांदेकर यांची सदिच्छा भेट


श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले हे धार्मिक क्षेत्रातील कार्यमग्न नेतृत्व असून, स्वामी सेवेला वाहून घेतल्याने महाप्रसादाची सेवा ही संपूर्ण जगात श्रीक्षेत्र अक्कलकोटचे नांव पोहचले असल्याचे मनोगत महाराष्ट्रातील गृहिणींचे लाडके भाऊजी व मुंबईचे श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराचे अध्यक्ष व प्रसिध्द अभिनेता आदेश बांदेकर यांनी व्यक्त केले.

ते श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात सहपरिवार आले असता मंडळाचे सचिव शामराव मोरे यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना अभिनेता आदेश बांदेकर म्हणाले की, येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ हे जगातील एक प्रमुख अन्नदासोह केंद्र असून कृतीशील, दिशात्मक कार्यामुळे न्यासाची उत्तरोत्तर प्रगती होत असल्याचे मनोगत प्रसिध्द अभिनेता आदेश बांदेकर यांनी व्यक्त केले.

यावेळी मंडळाचे पुरोहित अप्पू पुजारी, एस.के.स्वामी, सिध्दाराम कल्याणी, अभियंता अमित थोरात, बाळासाहेब घाडगे, सतीश महिंद्रकर, शहाजी यादव, नामा भोसले, दत्ता माने, प्रसाद हुल्ले, अनिल बिराजदार, रोहन शिर्के, पिंटू साठे, श्रीनिवास गवंडी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.