श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने राष्ट्रध्वजाचे वाटप
स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सवात न्यासाचा उत्स्फूर्तेने सहभाग
‘स्वराज्य महोत्सव’ व हर घर तिरंगा या राष्ट्रीय उपक्रमांना उत्साहाने प्रतिसाद
येत्या १५ ऑगस्ट रोजी भारत स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव दिन, यानिमित्त आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत स्वराज्य महोत्सव व हर घर तिरंगा उपक्रम संपूर्ण देशभर राबविण्याचे आवाहन राज्य व केंद्र शासनाने देशातील जनतेला केले असून सदरचा उपक्रम स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दिनांक १७ ऑगस्ट अखेर राबविण्यात येणार आहे. दरम्यान श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली स्वराज्य महोत्सव व हर घर तिरंगा उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती न्यासाचे सचिव शामराव मोरे यांनी दिली आहे.
याप्रसंगी १ हजार राष्ट्रध्वजाचे वाटप न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास अक्कलकोट नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन पाटील, नगरसेवक सद्दाम शेरीकर, न.प. बांधकाम विभागाचे विठ्ठलराव तेली, अभियंता किरण पाटील, अप्पा हंचाटे, यांच्यासह स्वामीभक्त उपस्थित होते. यावेळी न्यासाचे सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण यांना राष्ट्रध्वजाचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास सिध्दाराम कल्याणी, एस.के.स्वामी, न्यासाचे पुरोहित संजय कुलकर्णी, निखील पाटील, प्रवीण घाडगे, अभियंता अमित थोरात, बाळा पोळ, शहाजीबापू यादव, वैभव मोरे, महांतेश स्वामी, सतीश महिंद्रकर, समर्थ घाडगे, विनायक तोडकर, धनंजय निंबाळकर, दत्ता माने, राजेंद्र पवार, प्रसाद हुल्ले, मल्लिकार्जुन बिराजदार, समीर शेख, शानुर मुल्ला, हसन शेख, रशीद बेपारी, शाकीर पटेल, मुस्ताफा तांबोळी, रफिक किस्तके, गोविंदराव शिंदे, संकेताराव शिंदे, विशाल कलबुर्गी, अतिश पवार, विनायक भोसले, गोरक माळी, श्रीनिवास गवंडी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.