स्वामी भक्तांच्या सोयीसाठी ऑनलाईन देणगी UPI क्यू आर कोड या प्रणालीचा शुभारंभ

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांचे पुत्र प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली स्वामी भक्तांच्या सोयीसाठी ऑनलाईन देणगी UPI क्यू आर कोड या प्रणालीचा शुभारंभ रविवारी बँक ऑफ इंडियाचे बांद्रा येथील मुख्य कार्यालयाचे माहिती व तंत्रज्ञान विभागाचे सरव्यवस्थापक कमलेश मंथा, बँक ऑफ इंडियाचे बांद्रा येथील मुख्य कार्यालयाचे डिजिटल बँकिंग विभागाचे सहाय्यक सरव्यवस्थापक सुबिमान रॉय व प्रभादेवी शाखेचे मुख्य व्यवस्थापक पन्ना मोंडल, लोकमान्य मल्टी स्टेट को-ऑ. सोसायटीचे विभागीय व्यवस्थापक सुशील जाधव आणि न्यासाचे मुख्य लेखापरीक्षक ओंकारेश्वर उटगे, सचिव शामराव मोरे, स्वामी भक्तांचा उपस्थितीत संपन्न झाला. डिजिटल बँकिंग कार्यप्रणालीत राज्यातच न्यासाचे पाऊल पडते पुढे..!

स्वामी भक्तांच्या सोयीसाठी आणि ऑनलाईन देणगी देणे सहज व सुलभ व्हावे यासाठी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट या धर्मादाय न्यासाने अधिकृत ‘UPI क्यू आर कोड प्रणाली’ विकसित केलेली आहे. ज्या स्वामी भक्तांना अन्नदानाच्या कार्यास यथाशक्ती देणगी द्यायची असल्यास त्यांनी क्यु आर कोडवर स्कॅन करून अन्नदानासाठी देणगी देऊ शकतात.

भक्तांनी दिलेल्या देणगीचा अधिकृत एसएमएस येईल. त्या एसएमएस मधील लिंक वरून डाऊनलोड केल्यास त्वरीत देणगी पावती उपलब्ध होईल. जर एखाद्या भक्तास तिथी किंवा तारखेनुसार अन्नदान नोंदवायचे असल्यास मोबाईल नंबरसह http://bit.ly/donationlogin वर लॉग इन करावेत असे आवाहान न्यासाचे सचिव शामराव मोरे यांनी केले आहेत. आयकराच्या ८०-जी कलमान्वये देणगीस आयकरात सवलत आहे.

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून नेहमीच स्वामी भक्तांच्या सेवे करिता नाविन्यपूर्ण योजना आखल्या जातात. हे ‘UPI क्यू आर कोड प्रणाली’ देखील आता भक्तांच्या सेवेत रुजू झाली आहे. या प्रणाली मुळे स्वामी भक्तातून स्वागत व समाधानी व्यक्त होत आहे.

ज्या स्वामी भक्तांना अन्नदानाच्या कार्यास यथा शक्ती देणगी द्यायची असल्यास त्यांनी क्यु आर कोडवर स्कॅन करून अन्नदानासाठी देणगी देऊ शकतात. दिलेल्या देणगीचा अधिकृत SMS येईल, त्या SMS मधील लिंक वरून डाऊनलोड केल्यास त्वरित देणगी पावती उपलब्द होणार आहे. अन्नदान हे श्रेष्ठ दान असून यामध्ये सहभागी होण्याकरिता आता न्यासाने सुरु केलेल्या ‘UPI क्यू आर कोड प्रणाली उपयोगात आणावी असे न्यासाने कळविले आहे.

याप्रसंगी न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने बँक ऑफ इंडियाचे बांद्रा येथील मुख्य कार्यालयाचे माहिती व तंत्रज्ञान विभागाचे सरव्यवस्थापक कमलेश मंथा, बँक ऑफ इंडियाचे बांद्रा येथील मुख्य कार्यालयाचे डिजिटल बँकिंग विभागाचे सहाय्यक सरव्यवस्थापक सुबिमान रॉय व प्रभादेवी शाखेचे मुख्य व्यवस्थापक पन्ना मोंडल, लोकमान्य मल्टी स्टेट को-ऑ. सोसायटीचे विभागीय व्यवस्थापक सुशील जाधव यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी न्यासाचे लेखा विभागाचे मल्लिकार्जुन बिराजदार, श्रीनिवास गवंडी, दत्ता माने, प्रसन्न बिराजदार, रमेश हेगडे, राजेंद्र पवार, प्रसाद हुल्ले, न्यासाचे पुरोहित अप्पू पुजारी व संजय कुलकर्णी, सिध्दाराम कल्याणी, एस.के.स्वामी, निखील पाटील, प्रवीण घाडगे, अभियंता अमित थोरात, बाळा पोळ, शहाजीबापू यादव, महांतेश स्वामी, सतीश महिंद्रकर, समर्थ घाडगे, विनायक तोडकर, धनंजय निंबाळकर, गोरख माळी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते