दहीहंडी उत्सव 2022

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांचे पुत्र प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाच्या वतीने शुक्रवारी दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

दरम्यान सकाळी श्रीमंत विजयसिंहराजे भोसले चौक, हन्नूर रस्ता येथील वडार गल्लीत श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्री हनुमान मंदिरात श्रीकृष्ण पालखीचे पूजन, दहीहंडी बांधण्याचा व शहरातील दहीहंडी फोडण्याचा शुभारंभ करण्यात आला. ढोल ताश्याच्या निनादात गोविंदा पथक शहरात विविध ठिकाणी आयोजित केलेल्या दहीहंडी फोडण्यासाठी रवाना झाले.

दोन वर्षांच्या कोरोना निर्बंधानंतर यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच धुमधडाक्यात दहीहंडी उत्सव न्यासाच्या वतीने साजरा करण्यात आला. संस्थान काळापासून शहरातील श्रीमंत विजयसिंहराजे भोसले चौक, हन्नूर रस्ता येथील वडार समाजातील गोविंदा पथकास श्रीक्षेत्र अक्कलकोटातील दहीहंड्या फोडण्याचा मान आहे. संपूर्ण गोविंद पथकास न्यासाच्या वतीने टी-शर्टस् देण्यात आले होते.

न्यासाच्या वतीने आयोजित केलेल्या दहीहंडी फोडण्याकरिता आलेल्या गोविंदा पथकाची स्वागत मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांनी केले. त्यानंतर न्यासाच्या मुख्य प्रवेश द्वारासमोर बांधण्यात आलेल्या दहीहंडी गोविंदा पथकाने फोडली. दोन वर्षानंतर दहिहंडी उत्सव पार पडत असल्याने गोविंदा पथकांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्साह पाहायाला मिळाला.

याप्रसंगी न्यासाचे सचिव शामराव मोरे, विश्वस्त संतोष भोसले, मनोज निकम, सनी सोनटक्के, बाळासाहेब घाडगे, निखील पाटील, प्रवीण घाडगे, शेखर चौगुले सोलापूर, सिध्दाराम कल्याणी, एस.के.स्वामी, अभियंता अमित थोरात, शहाजीबापू यादव, सौरभ मोरे, वैभव मोरे, महांतेश स्वामी, ओंकार देशमुख, सतीश महिंद्रकर, समर्थ घाडगे, विनायक तोडकर, धनंजय निंबाळकर, दत्ता माने, राजेंद्र पवार, प्रसाद हुल्ले, मल्लिकार्जुन बिराजदार, गोविंदराव शिंदे, अतिश पवार, योगेश पवार, अंकुश चौगुले, स्वामिनाथ चौगुले, विनायक भोसले, गोरख माळी, श्रीनिवास गवंडी, संभाजीराव पवार, पप्पू कोल्हे यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते