श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांचे पुत्र प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून स्वामी भक्तांकरिता राबविण्यात आलेले उपक्रम हे उल्लेखनीय असल्याचे मनोगत आमदार अॅड.शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केले.
ते श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र (ट्रस्ट) मंडळात आले असता मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.
यावेळी त्यांच्यासमवेत दिग्विजय पाटील, प्रमोद हुबाले, संजय मेटकरी, विजय पाटील, चंद्रशेखर ताटे यांच्यासह न्यासाचे न्यासाचे सचिव शामराव मोरे, रोहित खोबरे, प्रविण देशमुख, अरविंद पाटील, सनी सोनटक्के, प्रविण घाटगे, गोटु माने, यश जाधव, निखिल पाटील, सिद्धाराम कल्याणी, महेश लोकापुरे, रोहन शिर्के, एस.के.स्वामी, अभियंता अमित थोरात, इंजि.किरण पाटील, सहदेव पवार, प्रदिप बणजगोळ, बाळू पोळ, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, धानू उमदी, बाळासाहेब घाडगे, गोविंद शिंदे, ज्योतिबा पवार, राजू पवार, दत्ता माने, प्रसाद हुल्ले, महांतेश स्वामी, विशाल घाडगे, धनंजय निबांळकर यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते