श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांचे पुत्र प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली भक्तांच्या सेवेर्थ कार्यरत असलेली ‘टीम अन्नछत्र’ हे आलेल्या स्वामी भक्तांची उत्तम व्यवस्था करीत असून, न्यासाने कोविड १९ च्या काळात केलेल्या विविध उपयोजना ह्या उल्लेखनीय असल्याचे मनोगत मराठी चित्रपट कोयता संघर्ष, साली फेम आणि बेस्ट खलनायिका पुरस्कार प्राप्त व छावा संघटनेच्या महिला प्रदेशाध्यक्षा श्री मेसवाल यांनी व्यक्त केले.
ते श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आले असता न्यासाचे पुरोहित अप्पु पुजारी यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा,कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी मंडळाचे सचिव शामराव मोरे, विश्वस्त संतोष भोसले, व्यायम शाळेचे प्रशिक्षक राजकुमार ढेपे, सिद्धाराम कल्याणी, एस.के.स्वामी, शहाजी यादव, कल्याण देशमुख, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, सतीश महिंद्रकर, दत्ता माने, राजू पवार, प्रसाद हुल्ले यांच्यासह सेवेकरी, भक्तगण उपस्थित होते.