हॉटेल कांचनचे प्रमुख कांचन बंधू यांची सदिच्छा भेट

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांचे पुत्र प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली स्वामी भक्तांना विविध सोयी-सुविधा उपलब्द करून देण्यामध्ये न्यासाचे नांव आज राज्यातील धार्मिक स्थळामध्ये आघाडीवर असून येथील नम्र सेवा, स्वच्छता, व्यवस्थापन व समर्थ महाप्रसाद सेवा हे उपक्रम उत्तमरीत्या राबाविलेजात आहे. यंत्र-मंत्र-तंत्र, सर्वत्र मंडळाच्या परिसरात पाहायला मिळाल्याचे मनोगत सोलापूर ते पुणे याराष्ट्रीय महामार्गावरील नामवंत हॉटेल कांचनचे प्रमुख प्रसाद कांचन व विवेक कांचन यांनी व्यक्त केले.
ते श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र (ट्रस्ट) मंडळात सहकुटुंब आले असता न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, मूर्ती, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी कांचन बंधू बोलत होते. त्यांच्या समवेत कांचन कुटुंबातील प्रवीणा प्रसाद कांचन, जयश्री विवेक कांचन, कु.शौनक प्रसाद कांचन, कु.ऋचा विवेक कांचन उपस्थित होते