सातारा संस्थानाचे छत्रपती शिवाजीराजे भोसले यांची सदिच्छा भेट

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेले धार्मिक या कार्याबरोबरच सामाजिक उपक्रम हे उल्लेखनीय आहेत, यामुळेच श्रीक्षेत्र अक्कलकोटच्या वैभवात भर पडली आहे, न्यासाच्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचे गडकिल्ले शिवस्मारक-शिवसृष्टी, शिवरायांच्या इतिहासाचे दर्शन घडवणारे धातू शिल्प शिवचरित्र हे राज्यातील एकमेव दालन असल्याचे मनोगत सातारा संस्थानाचे छत्रपती शिवाजीराजे भोसले यांनी व्यक्त केले.

   ते श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आले असता न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. 

  पुढे बोलताना सातारा संस्थानाचे छत्रपती शिवाजीराजे भोसले म्हणाले की, न्यासाने सुरु केलेल्या महाप्रसादाच्या सेवेबरोबरच विविध उपक्रम हे मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या धाडशी नेतृत्व व प्रबळ इच्छाशक्तीमुळेच न्यासाचा प्रचंड विस्तार होताना दिसत आहे, अन्नदान बरोबरच नयनरम्य स्वामी समर्थ वाटिका (उद्यान), शिवसृष्टी, शिवरायांच्या इतिहासाचे दर्शन घडवणारे धातू शिल्प प्रदर्शन, सर्वत्र लक्ष वेधणारी स्वच्छता पाहवून मन प्रसन्न झाले असल्याचे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी अन्नछत्र परिसरात पाणी टाकीचे भूमिपूजन सातारा संस्थानाचे छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. 

    यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त संतोष भोसले, लाला राठोड, पुरोहित अप्पू पुजारी, प्रविण घाडगे, निखील पाटील, अभियंता किरण पाटील, अमित थोरात, पिंटू साठे, बाळासाहेब घाडगे, सिद्धाराम कल्याणी, एस.के.स्वामी, शहाजी यादव, गोटू माने, दत्ता माने, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, कल्याण देशमुख, सतीश महिंद्रकर, राजू पवार, यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.