श्री स्वामी समर्थ महाराज की…!, जयच्या जय घोषात.. श्री स्वामी समर्थांच्या पादुका पालखी आणि न्यासाच्या सुशोभित रथाच्या भव्य मिरवणुकीच्या दिंड्या, वाद्यांच्या गजरात, नादब्रह्म पुणे यांच्या ढोल पथकाच्या तालात व अमोलराजे भोसले लेझीम संघाच्या शानदार खेळाने, केरळ येथील ढोल पथक, संभळ , ब्यांड व छत्रपती शिवाजी महाराजांचा व श्री स्वामी समर्थ महाराजांचा सजीव देखावा, श्री हनुमान देखावा व कोल्हापूर येथील हलगी पथक यांच्या निनादात मान्यवरांच्या हस्ते गुरुपौर्णिमा उत्सव व मंडळाचा ३७ वा. वर्धापनदिन मोठ्या उत्साहात मिरवणूकीने सांगता करण्यात आली.
दरम्यान या पालखी व रथ मिरवणुकीत मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सायं ४ वाजता श्री स्वामी समर्थांच्या पादुका पालखी, आणि न्यासाच्या सुशोभित केलेल्या रथाच्या भव्य मिरवणूकीचा दिंड्या व वाद्यांचा गजरात आणि अतुल बेहरे पुणे यांच्या ‘नांदब्रम्ह’ या ढोलपथकाच्या तालात आणि अमोलराजे लेझिम संघाच्या शानदार खेळाने शुभारंभ बाळासाहेब दाभेकर –अध्यक्ष भरत मित्र मंडळ पुणे, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य शहाजीराजे पवार, सो.म.पा. नगरसेवक व शिवसेना जिल्हाप्रमुख अमोलबापू शिंदे, शैलेश पिसे, पुणेचे देणगीदार संतोष कोंडे, उद्योजक चिदंबर रेगे पुणे यांच्या हस्ते पालखी व रथ मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात करण्यात आला.
रथाची व पालखी मिरवणूक श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या प्रांगणातून निघून नवी विहीर, राजे फत्तेसिंह चौक, सर्जेराव जाधव पथ मार्गे, समर्थ चौक, सेंट्रल चौक, सोन्या मारुती, वीर सावरकर चौक, कापड लाईन मार्गे कारंजा चौक, बुधवार पेठेतील समाधी मठ, तेथील आरतीनंतर कारंजा चौक, सुभाष गल्ली, जय जवान गल्ली, मधला मारुती, राम गल्ली, गुरु मंदिर, भारत गल्ली, देशमुख गल्ली मार्गे अन्नछत्र मंडळात आरतीने सांगता करण्यात आली.
या भव्य-दिव्य पालखी सोहळ्याचे नेटके व अचूक नियोजन अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख कार्यकारी विश्वस्त व संयोजक अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. रथ व पालखीला नयनरम्य फुलांनी सजविण्यात आले होते. मिरवणूक प्रसंगी विविध सामाजिक संघटनेकडून पालखी मार्गावर प्रसाद वाटप करण्यात आले.याबरोबरच स्वागत कमानी, डिजिटल ब्याणार लावण्यात आले होते. मिरवणूक बघण्यासाठी पालखी मार्गावर दुतर्फा प्रचंड गर्दी झालेली होती.
याप्रसंगी न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त अण्णा थोरात पुणे, राजेंद्र लिंबीतोटे, लक्ष्मण पाटील, संतोष भोसले, लाला राठोड, सौरभ मोरे, कु.बालाजी म्हेत्रे, ओंकारेश्वर उटगे, मनोज निकम,सिद्धेश्वर मोरे, डॉ.प्रसाद प्रधान, अविनाश मडीखांबे, प्रविण देशमुख, अँड.संतोष खोबरे, डॉ.विनायक बुधले, अरविंद शिंदे, गणेश भोसले, प्रा.शरणप्पा अचलेर, अभियंता किरण पाटील, आरतीताई लिंगायत, अमित थोरात, काशिनाथ गोळ्ळे, पुष्कराज काटकर, श्रीकांत झिपरे, शिवराज स्वामी, वैभव मोरे, दिनेश हळगोदे, संजय गोंडाळ, राजाभाऊ नवले, निखिल पाटील, प्रवीण घाडगे, पिंटू सोनटक्के, सनी सोनटक्के, शितल जाधव, पिंटू दोडमनी, गोटू माने, किरण जाधव, रोहन शिर्के, योगेश पवार, अप्पा हंचाटे, मैनुद्दीन कोरबु, किशोर सिद्धे, दत्ता माने, मुन्ना कोल्हे, बसवराज क्यार, बाळू पोळ, स्वामिनाथ गुरव, गोरख माळी सतीश महिंद्रकर, नामा भोसले, शहाजीबापू यादव, कल्याण देशमुख, चंद्रकांत हिबारे, धानप्पा उमदी, सिध्दाराम कल्याणी, एस.के.स्वामी, राजेंद्र पवार, बाळासाहेब घाडगे, योगेश पवार, सागर शिंदे, विशाल कलबुर्गी, गोविंदराव शिंदे, पिंटू साठे, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, सुमित कल्याणी, महेश कुलकर्णी, महादेव अनगले व राजेंद्र पवार, मल्लिकार्जुन बिराजदार, दत्ता माने, श्रीनिवास गवंडी, प्रसन्न बिराजदार, प्रसाद हुल्ले, रमेश हेगडे, अनिल बिराजदार, शरद भोसले, महांतेश स्वामी, समर्थ घाटगे, धनंजय निंबाळकर, विठ्ठल रेड्डी, ऋषी लोणारी, काशिनाथ वाले, सुराज्य घाटगे, राजू पंजाबी, श्रीशैल कुंभार, ज्ञानेश्वर भोसले, किरण साठे, यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
पालखी व रथाचे विधिवत पूजा न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पु पुजारी, विश्वसंभर पुजारी व संजय कुलकर्णी, सोमकांत कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचलन श्वेता हुल्ले यांनी केले तर सचिव शामराव मोरे यांनी आभार मानले.