श्री शमी विघ्नेश गणेश मंदिरात सोमवारी रोजी सायंकाळी अक्कलकोटचे तहसीलदार विनायक मगर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत न्यासाच्या श्री शमी विघ्नेश गणेश मंदिरात सोमवारी रोजी सायंकाळी अक्कलकोटचे तहसीलदार विनायक मगर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

सालाबादाप्रमाणे यंदाही श्रींचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येत आहे. सदरील पुजा ही सोमवार दि. १६ सप्टेंबर पर्यंत आयोजित करण्यात आली असून, शमीवृक्षाखाली गेल्या ३४ वर्षा पूर्वी श्री गणेशाची स्थापना करून सुंदर असे मंदिर बांधण्यात आले आहे. श्री स्वामी समर्थांच्या पावन भूमीवर श्री शमी विघ्नेश गणेश मंदिर असल्याने त्याचे स्थान व महात्म्य अलौकिक आहे.

याप्रसंगी अक्कलकोटचे तहसीलदार विनायक मगर यांचा न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. विविध धार्मिक विधिवत पूजा न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी व संजय कुलकर्णी यांच्याकडून करण्यात आली.