महाराष्ट्र व कर्नाटक सीमावर्ती भागातील कन्नड भाषिक रसिकांना आपल्या खास शैलीत कर्नाटकचे प्रसिद्ध हास्य सम्राट गंगावती प्राणेश यांनी ‘हास्य संजे’ या मनोरंजनात्मक कार्यक्रमात श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाच्या ३५ वा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सव न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहेत. सोमवारी सायंकाळी ७ वाजता ‘हास्य संजे’ कन्नड विनोदी कार्यक्रम सादरकर्ते -गंगावती प्रणेश आणि सहकारी कर्नाटक यांचा कार्यक्रमाचे दुसरे पुष्प संपन्न झाला. या कार्यक्रमास अक्कलकोट, मैंदर्गी, दुधनी या शहर व तालुक्यासह कर्नाटक सीमाभागातील आळंद, अफझलपूर, ईंडी, जत, दक्षिण सोलापूर व शहरातील हजारोंच्या संख्येने श्रोत्येगण उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन विरक्त मठाचे प.पू.बसवलिंग महास्वामीजी, माजी राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी जिल्हा परिषद सदस्य मल्लिकार्जुन पाटील, डॉ.शरणबसप्पा दामा सोलापूर, बँक ऑफ महाराष्ट्राचे सहाय्यक सरव्यवस्थापक व विभागीय व्यवस्थापक दत्तात्रेय कावेरी, न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, महेश इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान श्रींची प्रतिमा व स्वर्गीय लतादीदी मंगेशकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचा सत्कार न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा कृपावस्त्र देवून करण्यात आला. न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी यांच्या हस्ते यथसांग मंत्र पठणाने श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन पाटील, राजकीय कार्यकर्ते शिवराज स्वामी, प्रगतशील शेतकरी सुरेश उमराणीकर यांना विशेष गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याबरोबरच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यासह हास्य कलाकार गंगावती प्राणेश, बसवराज महामनी व अजय संकेश्वर, कन्नड साहित्य परिषद महाराष्ट्र घटकाचे अध्यक्ष व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे जनसंपर्क अधिकारी सोमशेखर जमशेट्टी हे निवडून आल्याबद्दल व कन्नड भाषा प्रसाराच्या कार्याची नोंद घेऊन न्यासाच्या वतीने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी न्यासाचे विश्वस्त अलकताई भोसले, अर्पिताराजे भोसले, माजी नगराध्यक्ष महानंदा स्वामी, मल्लम्मा पसरे, उपाध्यक्ष अभय खोबरे, विश्वस्त संतोष भोसले, प्रा. शरणप्पा आचलेर, राजशेखर उमराणीकर, शरणप्पा फुलारी, विद्याधर गुरव, ओंकारेश्वर उटगे, अरविंद शिंदे, प्रवीण देशमुख, योगेश पवार, अंकुश चौगुले, राजु नवले, सनी सोनटक्के, सागर गोंडाळ, पिटू शिंदे, निखील पाटील, प्रवीण घाडगे, गोटू माने, अमित थोरात, किरण पाटील, राजेंद्र पवार, महांतेश स्वामी, धनंजय निंबाळकर, समर्थ घाडगे, रमेश हेगडे, प्रसाद हुल्ले, बाळासाहेब घाटगे, बाळासाहेब पोळ, अप्पा हंचाटे, अमोल पोतदार, नितीन शिंदे, आकाश शिंदे, केदार तोडकर, गोविंदराव शिंदे, प्रा. प्रकाश सुरवसे, मनोज जगताप, प्रा.मल्लिकार्जुन कडबगांवकर, सौरभ मोरे, वैभव मोरे, संदीप कोकळगी, अँड.संतोष खोबरे, अशोकराव म्हेत्रे, मल्लिनाथ करपे, धर्मराज भासगी, पाहिम पिरजादे, महेश स्वामी, विशाल कलबुर्गी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन श्वेता हुल्ले यांनी केले. तर न्यासाचे सचिव शामराव मोरे यांनी आभार मानले.
प्रसिद्ध विनोदी कलाकार : बीची साहित्याने प्रभावित झालेल्या, प्रणेशने १९९४ पासून त्या साहित्यातील विनोद अंतर्भूत करण्यासाठी आणि इतरांना शेअर करण्यासाठी कार्यक्रम सुरू केले. उत्तर कर्नाटकात ‘हास्य संजे’ नावाचा अभिनव विनोदी कार्यक्रम सुरू करण्याचे श्रेय गंगावती प्राणेश यांना जाते.
गुलबर्गा आकाशवाणी पासून सुरू झालेला त्यांचा विनोदी संध्याकाळचा कार्यक्रम आता विविध दूरचित्रवाणी वाहिन्यांवर पसरला आहे. जगातील विविध भागांतील सुमारे ४०० शहरांमध्ये प्रणेशने ३ हजारा पेक्षा जास्त कार्यक्रम केले आहे. केवळ भाषणातच नाही तर प्रणेशाचे प्राविण्य तबला, बासरी आणि संगीतातही आहे.
उत्तर कर्नाटकातील खास शैलीत कन्नडमध्ये प्रणेशाचे वक्तृत्व फुलण्यासारखे आहे. त्यांचे भाषण जगभरातील सर्व कन्नडिगांना प्रिय आहे. त्यांचे कार्यक्रम मध्य पूर्व देश, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, थायलंड, मलेशिया, हाँगकाँग, अमेरिका इत्यादी शहरांमध्ये लोकप्रिय आहेत.
‘पेन्स ऑफ अ लाफ्टर’ हे पुस्तक लिहिणाऱ्या प्रणेशने अनेक कॅसेट आणि सीडीही आणल्या आहेत. त्याच्या अनेक शोच्या क्लिप्स यूट्यूब सारख्या इंटरनेट मीडियावर सातत्याने लोकप्रिय होत आहेत. दूरचित्रवाणीवरील विविध विनोदी प्रवचने, चॅटरूम्स, चॅटरूम्स, नवीन सांस्कृतिक व्यासपीठे इ. प्रणेशाच्या विनोदी रसायनशास्त्राला स्थिरता न ठेवता आनंदाच्या स्वरात ठेवण्यासाठी अनोखी भूमिका बजावत आहेत.
तिसरे पुष्प -‘स्वर संध्या’
मंगळावर दि. ५ जुलै रोजी सांयकाळी ७ ते रात्रौ ९.३० पर्यंत स्वामीकृपा मुंबई प्रस्तुत ‘स्वर संध्या’ सादरकर्ते – महेश काळे आणि सहकारी पुणे यांचा कार्यक्रम सादर होणार आहे.