राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक महेश काळे यांच्या ‘स्वर-संध्या’ कार्यक्रमाने अक्कलकोटकर मंत्रमुग्ध

राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक महेश काळे यांच्या स्वामीकृपा मुंबई प्रस्तुत ‘स्वर-संध्या’ कार्यक्रमात अक्कलकोट शहरातील हजारो श्रोत्यांनी त्यांच्या गायन कलेने मंत्रमुग्ध होऊन विशेष आनंद घेतला.


श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाच्या ३५ वा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सव न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहेत. मंगळवार सायंकाळी ७ वाजता स्वामीकृपा मुंबई प्रस्तुत ‘स्वर-संध्या’ कार्यक्रम सादरकर्ते महेश काळे आणि सहकारी पुणे यांच्या कार्यक्रमाचे तिसरे पुष्प संपन्न झाले.

या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रथमेश म्हेत्रे, न्यासाचे लेखापाल ओमकारेश्वर उटगे, विधीज्ञ अँड.संतोष खोबरे, न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, मुंबईचे उद्योजक चंद्रकांत पाटील, सुनील पाटील, ललित ठक्कर, दिलीप सिद्धे यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान श्रींची प्रतिमा व स्वर्गीय लतादीदी मंगेशकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचा सत्कार न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा कृपावस्त्र देऊन करण्यात आला. न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी यांच्या हस्ते यथसांग मंत्र पठणाने श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

रसिकप्रेक्षकांशी आपल्या सुमधूर स्वरात संवाद साधत गायक महेश काळे यांनी आधी रचिली पंढरी, दिगंबरा.. दिगंबरा..! धरुनी बोट स्वामींचे, ‘सूर निरागस हो, येई छंद मकरंद’ अशा शास्त्रीय उपशास्त्रीय गीतापासून ते गोमुमाहेरला जाती अशा कोलीगीता पर्यंतसह सूर नवादिवस, प्रसाद गाणी, चंद्रभागे तिरी, आम्हा न कळे ज्ञान, कानडा राजा पंढरीचा, आम्ही विठ्ठलाचे वारकरी, अभंग रंग, नाट्य भक्ती रंग अशा एक ना अनेक आपल्या गीतांनी महेश काळे यांनी रसिकांची विशेष वाहवा मिळवली. या कार्यक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.

याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर, दक्षिण ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.रोहन वायचळ, सब पोस्टमास्तर स्वामीराव धनवे अक्कलकोट व खेडगी महाविद्यालयाचे प्रा. मच्छिंद्र रुपनर यांना विशेष गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याबरोबरच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यासह राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक महेश काळे आणि सहकलाकारांचा न्यासाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी न्यासाचे विश्वस्त अलकताई भोसले, अर्पिताराजे भोसले, उपाध्यक्ष अभय खोबरे, उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी, विश्वस्त संतोष भोसले, लक्ष्मण पाटील, लाला राठोड, रोहित खोबरे, प्रा. शरणप्पा आचलेर, अरविंद शिंदे, प्रवीण देशमुख, योगेश पवार, राजु नवले, सनी सोनटक्के, सागर गोंडाळ, पिटू शिंदे, निखील पाटील, प्रवीण घाडगे, गोटू माने, अमित थोरात, किरण पाटील, राजेंद्र पवार, महांतेश स्वामी, धनंजय निंबाळकर, समर्थ घाडगे, रमेश हेगडे, प्रसाद हुल्ले, बाळासाहेब घाटगे, अप्पा हंचाटे, आकाश शिंदे, गोविंदराव शिंदे, सौरभ मोरे, वैभव मोरे, विशाल कलबुर्गी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन श्वेता हुल्ले यांनी केले. तर न्यासाचे सचिव शामराव मोरे यांनी रसिकप्रेक्षकांचे स्वागत व आभार मानले.

बुधवार दि.६ जुलै रोजी सायंकाळी ७ ते रात्रौ ९.३० पर्यंत ‘हास्यकल्लोळ’ सादरकर्ते – प्रसाद खांडेकर, समीर चौगुले, विशाखा सुभेदार, नम्रता संभेराव, अभीर हडकर, जयंत भालेकर आणि सहकारी मुंबई यांचा कार्यक्रम होणार आहे.