महाराष्ट्राचे प्रसिद्ध हास्य सम्राट प्रसाद खांडेकर व सहकलाकार यांच्या ‘हास्यकल्लोळ’ धम्माल विनोदी कार्यक्रमाने प्रेक्षकगण धुंद झाली होती

महाराष्ट्राचे प्रसिद्ध हास्य सम्राट प्रसाद खांडेकर व सहकलाकार यांच्या ‘हास्यकल्लोळ’ धम्माल विनोदी कार्यक्रमाने प्रेक्षकगण धुंद झाली होती. हा कार्यक्रम हाऊस फुल्ल होऊन मंडपाच्या बाहेर एलईडीव्दारे प्रेक्षक पाहत होते. यास भरभरुन प्रतिसाद मिळाला.


श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाच्या ३५ वा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सव न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहेत. बुधवार सायंकाळी ७ वा ‘हास्यकल्लोळ’ सादरकर्ते – प्रसाद खांडेकर, समीर चौगुले, विशाखा सुभेदार, नम्रता संभेराव, अभीर हडकर, जयंत भालेकर आणि सहकारी मुंबई यांच्या कार्यक्रमाचे चौथे पुष्प संपन्न झाले.
या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन उपनगराध्यक्ष यशवंत धोंगडे, नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी, विधीज्ञ अँड. विजय हर्डीकर, उद्योजक एजाज मुतवल्ली, न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, प्रथमेश इंगळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे, भाऊ कापसे, दत्ता जाधव, दुय्यम निबंधक डी. डी. ताटे यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान श्रींची प्रतिमा व स्वर्गीय लतादीदी मंगेशकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचा सत्कार न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा कृपावस्त्र देऊन करण्यात आला. न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी यांच्या हस्ते यथसांग मंत्र पठणाने श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

याप्रसंगी दक्षिण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप काळे, पोलीस हवालदार सुनील माने, महिला पोलीस आर.सी.राजमाने व उत्तर पोलीस ठाण्याचे महिला पोलीस निता बिराजदार, पो.कॉ.संतोष वाघमारे, बँक ऑफ बडोदा शाखा अक्कलकोटचे कर्मचारी बालाजी खरटमल यांना विशेष गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याबरोबरच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यासह कलाकारांचा न्यासाच्या वतीने सत्कार करण्यात आला. या कलाकारांनी सामाजिक व राजकीय घडामोडीवर विनोद सादर करून ‘हास्यकल्लोळ’ या मनोरंजनात्मक कार्यक्रमातून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले

यावेळी न्यासाचे विश्वस्त अलकताई भोसले, अर्पिताराजे भोसले, माजी नगराध्यक्षा अनिता ताई खोबरे, विश्वस्त संतोष भोसले, लक्ष्मण पाटील, अक्कलकोट तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकुमार जगदाळे, मुंबई मराठी पत्रकार परिषद शाखा अक्कलकोटचे अध्यक्ष अरविंद पाटील, सत्तारभाई शेख, अँड.संतोष खोबरे, ओंकारेश्वर उटगे, अरविंद शिंदे, प्रवीण देशमुख, योगेश पवार, राजु नवले, सनी सोनटक्के, पिटू शिंदे, निखील पाटील, प्रवीण घाडगे, गोटू माने, बाळासाहेब घाटगे, अप्पा हंचाटे, सत्यजित जाधव, सिद्धाराम टाके, बालाजी पाटील, श्रीकांत झिपरे, बाळासाहेब मोरे, विलास कोरे, उत्तम गायकवाड, मल्लिनाथ मसुती, अनिल बनजगोळ, सैदप्पा इंगळे, मारुती बावडे, दयानंद दणुरे, गोपी पाटील, अभिजित लोके, प्रसाद बाग, दत्ता माने आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन श्वेता हुल्ले यांनी केले. तर न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे यांनी रसिकप्रेक्षकांचे स्वागत व आभार मानले.


युको पर्यावरण पूरक गणेशयुगचे विकास गोसावी यांच्याकडून कलाकारांना युको प्रे्ंडली गणेश मूर्तींची भेट देण्यात आली. याप्रसंगी डॉ.सतीश बिराजदार, आशावरी गांधी, सोनाली वाघमोडे उपस्थित होते.

गुरुवार दि. ७ जुलै रोजी सायंकाळी ७ ते रात्रौ ९.३० पर्यंत ख्यातनाम गायिका वैशाली सामंत यांचा हिंदी –मराठी भावगीते व भक्तिगीते संगित रजनी यांचा कार्यक्रम सादर होणार आहे.