मराठी, हिंदी, कन्नड भावगीते व भक्तीगीतांनी वैशाली सामंत यांच्या ‘संगीतरजनी’ या सदाबहार कार्यक्रमाने श्रोते भारावले

श्री गणेश वंदना, स्वामींची पालखी निघाली, दूरच्या रानात… केळीच्या वनात, संत कान्होपात्रा यांची गवळण, नको मारु पिचकारी कान्हा, रेशमाच्या धाग्यांनी, निघालो घेऊनि दत्ताची पालखी, स्वामी समर्थ जय जय श्री, स्वामी की दरबार मे.., सौभाग्यलक्ष्मी बारम्मा…ही गुलाबी हवा….अशा एक ना अनेक मराठी, हिंदी, कन्नड भावगीते व भक्तीगीतांनी वैशाली सामंत यांच्या ‘संगीतरजनी’ या सदाबहार कार्यक्रमाने श्रोते भारावले होते.
श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाच्या ३५ वा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सवानिमित्त न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी सायंकाळी ७ वा ख्यातनाम गायिका वैशाली सामंत यांचा हिंदी –मराठी भावगीते व भक्तिगीते ‘संगितरजनी’ या कार्यक्रमाचे ५ वे पुष्प संपन्न झाले.
या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन नगर परिषदेचे पक्ष नेते महेश हिंडोळे, जिल्हा परिषद सदस्य आनंदराव तानवडे, भाजपा तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड, डॉ.मनोहर मोरे, डॉ.आर.व्ही.पाटील, न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, लाला राठोड, भाऊ कापसे, दिलीप सिद्धे, सिनील कटारे, अँड.टिनवाला, राजेंद्र बंधीछोडे, नागराज कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान श्रींची प्रतिमा व स्वर्गीय लतादीदी मंगेशकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचा सत्कार न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा कृपावस्त्र देऊन करण्यात आला. न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी यांच्या हस्ते यथसांग मंत्र पठणाने श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूरचे अब्दूल राजक शेख उर्फ सोलापुरी लादेन, अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयाच्या ग्रेस दिवाकर काकडे, पत्रकार शंभूलिंग अकतनाळ, विधिज्ञ अँड.खाजूबाई हल्ले यांना विशेष गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याबरोबरच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यासह कलाकारांचा न्यासाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी न्यासाचे विश्वस्त अलकताई भोसले, अर्पिताराजे भोसले, विश्वस्त संतोष भोसले, लक्ष्मण पाटील, अँड.संतोष खोबरे, ओंकारेश्वर उटगे, अरविंद शिंदे, प्रवीण देशमुख, योगेश पवार, राजु नवले, सनी सोनटक्के, पिटू शिंदे, निखील पाटील, प्रवीण घाडगे, गोटू माने, बाळासाहेब घाटगे, अप्पा हंचाटे, वैभव मोरे, सौरभ मोरे, सुरज निंबाळकर, श्रीकांत झिपरे, अजय अत्रे, मानसी दातार, प्रा. भीमराव साठे, दिगंबर ढांगे, मोहन चव्हाण, दत्ता माने, राहुल माने, अमित थोरात, गोविंदराव शिंदे, राजू पवार, विकास गोसावी, डॉ.सतीश बिराजदार, आसावरी गांधी, सोनाली वाघमोडे, आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन श्वेता हुल्ले यांनी केले. तर न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे यांनी रसिकप्रेक्षकांचे स्वागत व आभार मानले.

शुक्रवार दि. ८ जुलै रोजी सायंकाळी ७ ते रात्रौ ९.३० वाजेपर्यंत ‘आयुष्यावर बोलू काही’ सादरकर्ते डॉ.सलील कुलकर्णी आणि संदीप खरे पुणे यांचा कार्यक्रम होणार आहे.