‘आयुष्यावर बोलू काही’ कार्यक्रमाणे अक्कलकोट ला मंत्रमुग्ध केले

सुप्रसिद्ध गायक, संगीतकार आणि दिग्दर्शक डॉ.सलील कुलकर्णी आणि सुप्रसिद्ध कवी संदीप खरे यांचा ‘आयुष्यावर बोलू काही’ हा कार्यक्रमात अक्कलकोट शहरातील हजारो श्रोत्यांनी त्यांच्या गायन कलेने मंत्रमुग्ध होऊन विशेष आनंद घेतला.

श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाच्या ३५ वा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सवनिमित्त न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून शुक्रवार सायंकाळी ७ वाजाता ‘आयुष्यावर बोलू काही’ सादरकर्ते डॉ.सलील कुलकर्णी आणि संदीप खरे पुणे यांच्या कार्यक्रमाचे ६ वे पुष्प संपन्न झाले.

या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन प्रसिद्ध सराफ अभिनंदन गांधी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शिवानंद पाटील, उद्योजक लाला राठोड, माजी नगरसेवक उत्तम गायकवाड, न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, सुरेश तोरणी यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान श्रींची प्रतिमा व स्वर्गीय लतादीदी मंगेशकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचा सत्कार न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा कृपावस्त्र देऊन करण्यात आला. न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी यांच्या हस्ते यथसांग मंत्र पठणाने श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

“मन नरसोबाच्या वाडीला जाई रे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ..!,जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही, तुझ्या माझ्या सावे गायचा पाऊसही, आग बाई आग बाय जानु विना रंग नांही, चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही, “दूर देशी गेला बाबा, गेली कामावर आई”, यासह पावसाची गाणी अशा एक ना अनेक आपल्या गीतांनी दिग्दर्शक डॉ. सलील कुलकर्णी आणि सुप्रसिद्ध कवी संदीप खरे यांनी रसिकांची विशेष वाहवा मिळवली. या कार्यक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.

याप्रसंगी के.एल.ई संचालित मंगरुळे प्रशालेचे शिक्षक प्राशांत पाटील, राज्य विद्युत वितरण कंपनी अक्कलकोटचे अमित जाधव, एस.टी.महामंडळ अक्कलकोट आगाराचे चालक निंगबसप्पा नडगेरी यांना विशेष गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याबरोबरच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यासह सुप्रसिद्ध गायक, संगीतकार आणि दिग्दर्शक डॉ. सलील कुलकर्णी आणि सुप्रसिद्ध कवी संदीप खरे आणि सहकलाकारांचा न्यासाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी न्यासाचे विश्वस्त अलकताई भोसले, अर्पिताराजे भोसले, माजी नगराध्यक्षा अनिता खोबरे, विश्वस्त संतोष भोसले, लक्ष्मण पाटील, रोहित खोबरे, अरविंद शिंदे, डॉ. राजेंद्र बंदीछोडे, प्रवीण देशमुख, ओंकारेश्वर उटगे, अँड.संतोष खोबरे, योगेश पवार, राजु नवले, सनी सोनटक्के, सागर गोंडाळ, पिटू शिंदे, निखील पाटील, प्रवीण घाडगे, गोटू माने, अमित थोरात, किरण पाटील, राजेंद्र पवार, प्रा.ओमप्रकाश तळेकर, साय्यबण्णा जाधव, बाळासाहेब मोरे, संतोष जिरगे, के.एल.ई संचलित मंगरुळे प्रशाला अक्कलकोटचे मुख्याध्यापक गिरीश पट्टेद, बसवराज कापसे, काशिनाथ मणुरे, जयंत उपासे, नीलकंठ दिंडुरे, प्रशांत पाटणे, सचिन डफळे, मदगोंड धुळगोंड, धानय्या कौंटगी, श्रीशैल कलशेट्टी, दयानंद परिचारक, अमोल कोकाटे, विकास गोसावी, डॉ.सतीश बिराजदार, बाळासाहेब घाटगे, अप्पा हंचाटे, आकाश शिंदे, गोविंदराव शिंदे, सौरभ मोरे, वैभव मोरे, विशाल कलबुर्गी, फहीम पिरजादे, वाशीम मुल्ला, मल्लिकार्जुन सोमेश्वर, संतोष नरुणे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन श्वेता हुल्ले यांनी केले. तर न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे यांनी रसिकप्रेक्षकांचे स्वागत व आभार मानले.