आमदार नितेश राणे यांची सदिच्छा भेट

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांचे पुत्र प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून स्वामी भक्तांची निस्वार्थ भावनेने सेवा करत आहात, तुमच्या अशा महान कार्याला माझा सलाम..! मंडळाने काळाची गरज ओळखून विकास कामे हाती घेतले असल्याचे मनोगत आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केले.

ते श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आले असता मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले की, अन्नछत्र मंडळाने न्यासाच्या वर्धापनदिन व गुरुपोर्णिमा उत्सवाच्या औचित्य साधुन आयोजित धर्मसंकीर्तन व सांस्कृतिक कार्यक्रम सुरु आहेत, त्यास माझ्या शुभेच्छा राणे कुटुंबीयाकडून देत असल्याचे सांगून, न्यासाच्या धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्याचे कौतुक आमदार नितेश राणे यांनी केले.

यावेळी आमदार नितेश राणे यांचे स्वीय सहाय्यक राजेश पाटील, मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, विश्वस्त संतोष भोसले, माजी नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी, सिद्धाराम जाधव, बंटी राठोड, सोलापूरचे सुनील कटके, जगदीश बाबर यांच्यासह सिध्दाराम कल्याणी, एस.के.स्वामी, न्यासाचे पुरोहित अप्पू पुजारी, संजय कुलकर्णी, निखील पाटील, प्रवीण घाडगे, गोटू माने, सनी सोनटक्के, अभियंता अमित थोरात, बाळा पोळ, महांतेश स्वामी, सतीश महिंद्रकर, समर्थ घाडगे, विनायक तोडकर, धनंजय निंबाळकर, दत्ता माने, राजेंद्र पवार, प्रसाद हुल्ले, यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.