राष्ट्रीय किर्तनकार व समाज प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख, इंदोरीकर यांच्या सानिध्यात ७ वे पुष्प पार पाडले

राष्ट्रीय किर्तनकार व समाज प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख, इंदोरीकर (संगमनेर, अकोलेकर) यांनी भक्ती, शक्ती, संस्कार समाजप्रबोधन या त्रिवेणी संगमात लाख भक्तजनांना आनंदाचे डोही आनंद तरंग अशी अनभुती दिली. सध्याच्या विविध घडामोडीवर वृत्ती, वल्ली व कृती बाबत सडेतोड विचार मांडले. त्यांच्या कीर्तन कार्यक्रमास पावसात देखील हजारो श्रोत्यांच्या गर्दीने संपूर्ण परिसर व्यापुन गेलेला होता.
श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाच्या ३५ वा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सवनिमित्त न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून शनिवार सायंकाळी ७ वाजता ‘किर्तन’ राष्ट्रीय किर्तनकार व समाज प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख, इंदोरीकर (संगमनेर, अकोलेकर) यांच्या कार्यक्रमाचे ७ वे पुष्प संपन्न झाले.
या कार्यक्रमाचे राष्ट्रीय किर्तनकार व समाज प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख, इंदोरीकर व त्यांचे टीम, न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान श्रींची प्रतिमा व स्वर्गीय लतादीदी मंगेशकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
दरम्यान राष्ट्रीय किर्तनकार व समाज प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख, इंदोरीकर यांचा सत्कार न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा कृपावस्त्र देऊन करण्यात आला. न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी यांच्या हस्ते यथसांग मंत्र पठणाने श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
श्रीक्षेत्र अक्कलकोट हे गुरु पीठ आहे. या गुरु पिठात अन्नछत्राच्या माध्यमातून न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखील व त्यांचे पुत्र प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेले महाप्रसाद या कार्याबरोबरच अन्य उपक्रमाचे कार्याचे कौतुक ह.भ.प. निवृत्त महाराजानी केले.
राष्ट्रीय किर्तनकार व समाज प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्त महाराजानी संत तुकाराम, एकनाथ, निवृत्ती महाराज, ज्ञानदेव, मुक्ताबाई, सोपान यांच्या अभंगाचा दाखला देत हशा आणि टाळ्या यांच्या कल्लोळात समाज प्रबोधन केले. समाजातील ८० टक्के लोक मोबाईलमुळे भ्रमिष्ठ झाले असे सांगत, पैशाने मिळते ते सुख, अध्यात्मिक ज्ञानाने मिळते समाधान याबाबत त्यांनी कीर्तनाचे माध्यमातून प्रबोधन केले.
यावेळी न्यासाचे विश्वस्त अलकताई भोसले, अर्पिताराजे भोसले, दिना थोरात, माजी नगराध्यक्षा अनिता खोबरे, स्मिता कदम, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानाचे अध्यक्ष महेश इंगळे, प्रथमेश इंगळे, ओमकारेश्वर उटगे, अविनाश मडीखांबे, भाऊ कापसे, विश्वस्त संतोष भोसले, श्री तुळजाभवानी देवस्थानाचे मुख्य पुजारी शशिकाका पाटील, समीर लोंढे, लक्ष्मण पाटील, लाला राठोड, आबासाहेब कापसे, अजय परमेश्वर, रोहित खोबरे, अरविंद शिंदे, प्रवीण देशमुख, योगेश पवार, राजु नवले, राजू म्हेत्रे, सनी सोनटक्के, सागर गोंडाळ, पिटू शिंदे, निखील पाटील, प्रवीण घाडगे, गोटू माने, अमित थोरात, किरण पाटील, राजेंद्र पवार, प्रदीप जगताप, पै.महेश कुलकर्णी, नारायण कदम, गणेश गोब्बुर, राजू शिंदे, प्रथमेश पवार, लक्ष्मण विभूते, गोपी पाटील, श्रीकांत झिपरे, महांतेश स्वामी, धनंजय निंबाळकर, समर्थ घाडगे, रमेश हेगडे, प्रसाद हुल्ले, बाळासाहेब घाटगे, अप्पा हंचाटे, आकाश शिंदे, गोविंदराव शिंदे, सौरभ मोरे, वैभव मोरे, विशाल कलबुर्गी, शिवराज स्वामी, श्रीशैल रब्बा, शरणप्पा फुलारी, आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन श्वेता हुल्ले यांनी केले. तर न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे यांनी रसिकप्रेक्षकांचे स्वागत व आभार मानले.
रविवार दि. १० जुलै रोजी सायंकाळी ७ ते रात्रौ ९.३० वाजेपर्यंत ‘किर्तन’ भागवताचार्य, समाज प्रबोधनकार ह.भ.प. तुकाराम महाराज मुंडे (शास्त्री) परळी वैजनाथ, जि.बीड यांचा कार्यक्रम होणार आहे.
आमदार नितेश राणे यांच्याकडून शुभेच्छा..!
आमदार नितेश राणे यांनी म्हणाले कि, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांचे पुत्र प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून स्वामी भक्तांची निस्वार्थ भावनेने सेवा करत आहात, तुमच्या अशा महान कार्याला माझा सलाम..! मंडळाने काळाची गरज ओळखून विकास कामे हाती घेतले असून, न्यासाच्या वर्धापनदिन व गुरुपोर्णिमा उत्सवाच्या औचित्य साधुन आयोजित धर्मसंकीर्तन व सांस्कृतिक कार्यक्रम सुरु आहेत, त्यास माझ्या शुभेच्छा राणे कुटुंबीयाकडून देत असल्याचे सांगून, न्यासाच्या धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्याचे कौतुकास्पद असल्याचे शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले.
दरम्यान राज्याचे उप लोक आयुक्त संजय भाटिया पुणे लोकसभा मतदार संघाचे खासदार व लोकसभा अंदाज समितीचे अध्यक्ष गिरीश बापट यांनी देखील न्यासाच्या वर्धापनदिन व गुरुपोर्णिमा उत्सवाच्या औचित्य साधुन आयोजित धर्मसंकीर्तन व सांस्कृतिक कार्यक्रमास पत्राद्वारे शुभेच्छ्या दिले आहेत.