समाज प्रबोधनकार ह.भ.प. तुकाराम महाराज मुंडे (शास्त्री) परळी वैजनाथ, जि.बीड यांनी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या कीर्तनाने उपस्थित हजारो श्रोत्येगण मंत्रमुग्ध झाले.

भागवताचार्य, समाज प्रबोधनकार ह.भ.प. तुकाराम महाराज मुंडे (शास्त्री) परळी वैजनाथ, जि.बीड यांनी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या कीर्तनाने उपस्थित हजारो श्रोत्येगण मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमास न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले उपस्थित होते.
श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाच्या ३५ वा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सवनिमित्त न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून रविवार सायंकाळी ७ वाजता ‘किर्तन’ भागवताचार्य, समाज प्रबोधनकार ह.भ.प. तुकाराम महाराज मुंडे (शास्त्री) परळी वैजनाथ, जि.बीड यांच्या कार्यक्रमाचे ८ वे पुष्प संपन्न झाले.
या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन श्री फत्तेसिंह शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजीव माने, अक्कलकोट तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष दिलीप सिद्धे, तालुका शिवसेना प्रमुख संजय देशमुख, सामाजिक कार्यकर्ते सुनील खवळे, न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान श्रींची प्रतिमा व स्वर्गीय लतादीदी मंगेशकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचा सत्कार न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा कृपावस्त्र देऊन करण्यात आला. न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी यांच्या हस्ते यथसांग मंत्र पठणाने श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
ह.भ.प.तुकाराम महाराज मुंडे (शास्त्री) परळी वैजनाथ, जि.बीड यांनी समाजप्रबोधनपर कीर्तनाच्या माध्यमातून सांगितलेल्या माहितीने संपूर्ण दरबार तल्लीन झालेल्या होता. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची गेल्या ३५ वर्षापासूनच्या सुरु असलेली स्वामी भक्तांची विनम्र सेवा, स्वच्छता यासह भोसले पिता-पुत्रांचे कार्याबद्दल ह.भ.प.तुकाराम महाराज मुंडे यांनी कौतुक केले.

दरम्यान भागवताचार्य, समाज प्रबोधनकार ह.भ.प. तुकाराम महाराज मुंडे (शास्त्री) यांचा सत्कार न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा कृपावस्त्र देऊन करण्यात आला. न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी यांच्या हस्ते यथसांग मंत्र पठणाने श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याबरोबरच अक्कलकोट तालुक्याच्या वतीने उल्लेखनीय कामगीरी करत असल्याबद्दल न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांचा सत्कार संजय देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांच्या समवेत प्रा.सुर्यकांत कडबगांवकर, मल्लिनाथ खुबा, वर्षा चव्हाण, वैशाली हावनुर उपस्थित होते.
याप्रसंगी निसर्ग सेवा फाउंडेशनचे स्वयंसेवक सुनील बिराजदार, विद्याधर गुरव, लक्ष्मण समाणे, नीलकंठ कापसे, प्रमोद लोकापुरे, अभिजित लोके, सिद्धाराम मोगे, सुरेश हिरापुरे तर स्नेहलोक युथ फाउंडेशनचे अध्यक्ष काशिरायकाका पाटील, उपाध्यक्ष धर्मराज भोसगी, सदस्य सागर तेल्लूणगी, संतोष स्वामी, मकरंद देसाई, सिद्धाराम कालीबत्ते, भीमाशंकर वग्गे, श्रीधर गुरव, सागर भडोळे, राहुल तेल्लूणगी तर मैंदर्गी येथील छत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश गोब्बुर, संजयकुमार नाशी, मल्लिनाथ गोब्बुर, रवी पाटील, सुमित फुलारी, समर्थ नागूर, योगेश फुलारी, अनिल जूजगार, अजय जुजगार, अक्षय जुजगार, किरण अपगोंडे, मल्लिकार्जुन सलगर आणि अक्कलकोट तालुक्यातील पहिली महिला रेल्वे पायलट कु.श्रुती मधुकर घोडके (रा.बुधवार पेठ अक्कलकोट) यांना विशेष गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
याबरोबरच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यासह भागवताचार्य, समाज प्रबोधनकार ह.भ.प. तुकाराम महाराज मुंडे आणि सहकलाकारांचा न्यासाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी न्यासाचे विश्वस्त अलकाताई भोसले, अर्पिताराजे भोसले, बिना थोरात, माजी नगराध्यक्षा अनिता खोबरे, स्मिता कदम, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानाचे अध्यक्ष महेश इंगळे, सुधाकर गोंडाळ, रामचंद्र समाणे, प्रथमेश इंगळे, ओमकारेश्वर उटगे, अँड.संतोष खोबरे, विश्वस्त संतोष भोसले, लाला राठोड, राजेंद्र लिंबीतोटे, प्रा.शरणप्पा अचलेर, रोहित खोबरे, अरविंद शिंदे, प्रवीण देशमुख, योगेश पवार, राजु नवले, राजू म्हेत्रे, सनी सोनटक्के, सागर गोंडाळ, पिटू शिंदे, निखील पाटील, प्रवीण घाडगे, गोटू माने, अमित थोरात, किरण पाटील, राजेंद्र पवार, राजू शिंदे, गोपी पाटील, श्रीकांत झिपरे, महांतेश स्वामी, धनंजय निंबाळकर, समर्थ घाडगे, रमेश हेगडे, प्रसाद हुल्ले, बाळासाहेब घाटगे, अप्पा हंचाटे, आकाश शिंदे, गोविंदराव शिंदे, सौरभ मोरे, वैभव मोरे, विशाल कलबुर्गी, शिवराज स्वामी, गणेश भोसले, मल्लिनाथ शिवगुंडे, मोहनराव शिंदे, प्रकाश कोळी, धनंजय गडदे, ज्ञानेश्वर भोसले, अंकुश चौगुले, विष्णू सांगळे, किरण पुजारी, पिंटू दोडमनी, पिंटू सोनटक्के, विकास मोरे, बाळासाहेब मोरे, कोकीळ माडेकर, आकाश सूर्यवंशी, सागर गोंडाळ, सिद्धेश्वर पुजारी, अमित थोरात, मनोज हिंगोले, बाळू पोळ, मुन्ना कोल्हे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन श्वेता हुल्ले यांनी केले. तर न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे यांनी रसिकप्रेक्षकांचे स्वागत व आभार मानले.
सोमवार दि.११ जुलै रोजी सायंकाळी ७ ते रात्रौ ९.३० वाजेपर्यंत ‘भक्तीरंग’ सादरकर्ते संस्कृती बालगुडे आणि सहकलाकार –पुणे यांचा कार्यक्रम होणार आहे.