श्री स्वामी चरणी वंदन, गणेश वंदना, देशभक्तीपर गीते, भक्तीगीते, भावगीते व नृत्याने ‘भक्तीरंग’ या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा उत्सपुर्त प्रतिसाद मिळाला.

श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाचा ३५ वा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सव न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून, सोमवारी सायंकाळी ७ वा. ‘भक्तीरंग’ सादरकर्ते संस्कृती बालगुडे आणि सहकलाकार पुणे यांच्या कार्यक्रमाचे ९ वा. पुष्प संपन्न झाले.


या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन माजी नगरसेवक अशपाक बळोरगी, चप्पळगावचे सरपंच उमेश पाटील, रा.स.प. पक्षिम महाराष्ट्राचे अध्यक्ष सुनील बंडगर, आर.पी.आय. आठवले गटाचे तालुकाध्यक्ष अविनाश मडीखांबे, करमाळा पंचायत समितीचे माजी सभापती व श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे विश्वस्त भारत शिंदे, न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान श्रींची प्रतिमा व स्वर्गीय लतादीदी मंगेशकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.


कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचा सत्कार न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा कृपावस्त्र देऊन करण्यात आला. न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी यांच्या हस्ते यथसांग मंत्र पठणाने श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.


महाराष्ट्राचे प्रसिध्द मराठी अभिनेत्री संस्कृती बालगुडे आणि सहकलाकार कीर्ती खलाटे, आशुतोष पाटील, बालाजी गौडगिरी, रोहित भडके, कुणाल सिंग, बाळकृष्ण नेहरकर, समर्थ बालगुडे, संजीविनी बालगुडे यांनी गणेश वंदना, जोगवा, पुष्पा, आई यासह कोरोना, देशभक्तीपर गीते, भक्तीगीते, भावगीते व नृत्याने ‘भक्तीरंग’ या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
याप्रसंगी हॉटेल व्यावसायिक सिध्देश्वर मोरे, कला शिक्षक मयूर दंतकाळे, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे सेवेकरी लेखापाल मल्लिकार्जुन बिराजदार, शासकीय निवासी शाळा अक्कलकोटच्या श्रीमती अंजना जयप्रभू बासुतकर, के.एल.ई मंगरुळे प्रशालेचे शिक्षक अभिजित लोके यांनी ९४ वे रक्तदान केल्याबद्दल व दहिटणेवाडीचे कु.जय लक्ष्मणराव जाधव याने १४ वर्षे गट मुलामध्ये राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्ध्येमध्ये वसमत जिल्हा नांदेड येथे ब्रांज मेडल पुरस्कार मिळाल्याबद्दल, तसेच संस्थेचे IT सल्लागार वैभव पोतदार यांना विशेष गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याबरोबरच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यासह ‘भक्तीरंग’ सादरकर्ते संस्कृती बालगुडे आणि सहकलाकार पुणे यांचा न्यासाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी सो.म.पा.माजी नगरसेवक अमोलबापू शिंदे व परिवार, न्यासाचे विश्वस्त अलकाताई भोसले, अर्पिताराजे भोसले, रोहिणी उमेश पाटील, विश्वस्त संतोष भोसले, अँड.संतोष खोबरे, ओंकारेश्वर उटगे, लक्ष्मण पाटील, रोहित खोबरे, अरविंद शिंदे, प्रवीण देशमुख, योगेश पवार, राजु नवले, सनी सोनटक्के, सागर गोंडाळ, पिटू साठे, निखील पाटील, प्रवीण घाडगे, गोटू माने, अमित थोरात, किरण पाटील, राजेंद्र पवार, महांतेश स्वामी, धनंजय निंबाळकर, समर्थ घाडगे, रमेश हेगडे, प्रसाद हुल्ले, बाळासाहेब घाटगे, अप्पा हंचाटे, आकाश शिंदे, गोविंदराव शिंदे, सौरभ मोरे, वैभव मोरे, पिंटू दोडमनी, अँड.रोहिदास राठोड, विशाल कलबुर्गी, मनोज जगताप, तात्या समाणे, तात्या धोंगडे, पै.महेश कुलकर्णी, रवी बंकापुरे, दत्ता माडकर, प्रसाद माने, विक्रम पाटील, लक्ष्मीपुत्र तेल्लूणगी, प्रफुल्ल कुलकर्णी, बसवराज म्हेत्रे, सकाराम माने, राहुल माने, दत्ता माने, धानप्पा उमदी, पिंटू हिंडोळे, स्वामीराव गुरव, मनोज हिंगोले, ज्ञानेश्वर कदम, सुरेश सुरवसे, बाळासाहेब मोरे, सागर गोंडाळ, संतोष जाधव, आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन श्वेता हुल्ले यांनी केले. तर न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे यांनी रसिकप्रेक्षकांचे स्वागत व आभार मानले.

मंगळावर दि.१२ जुलै रोजी सायंकाळी ७ ते रात्रौ ९.३० वाजेपर्यंत स्वामिनी प्रस्तुत ‘भक्तीसुधा’ सादरकर्ते –संदीप पाटील आणि सहकलाकार पुणे यांचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर रात्री १० ते १२ वा. श्री स्वामी समर्थ भक्त मंडळ, निपाणी प्रस्तुत ‘सूर भक्तीचे उमटले’ भक्ती संगीत कार्यक्रम होणार आहे.