गणेश वंदना, निघाले घेऊन दत्तांची पालखी, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, पहिले मी तुला.., आधीर मन झाले, मेंदीच्या पानावर, देशभक्तीपर, भक्ती व भावगीतासह चित्रपटातील मराठी-हिंदी गीते ‘भक्तीसुधा’ या कार्यक्रमात सादर करण्यात आली. यास प्रेक्षकांचा भर पावसात प्रचंड प्रतिसाद मिळाला.
श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाचा ३५ वा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सव न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून, मंगळावरी सायंकाळी ७ वा. स्वामिनी प्रस्तुत ‘भक्तीसुधा’ सादरकर्ते –संदीप पाटील आणि सहकलाकार पुणे यांच्या कार्यक्रमाचे १० वा. पुष्प संपन्न झाले. त्यानंतर रात्री १० वा. श्री स्वामी समर्थ भक्त मंडळ, निपाणी प्रस्तुत ‘सूर भक्तीचे उमटले’ भक्ती संगीत कार्यक्रम देखील संपन्न झाला. यास देखील प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन तालुका कृषी अधिकारी रामचंद्र माळी, गटविकास अधिकारी सचिन खुड्डे, वंचित बहुजन आघाडीचे चंद्रशेखर मडीखांबे, सामाजिक कार्यकर्ते अंकुश चौगुले, डॉ.बी.आर.आंबेडकर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संदीप मडीखांबे, सामाजिक कार्यकर्ते लखन झंपले, प्रहार संघटनेच्या अध्यक्ष अमर शिरसट, संदीप फुगे पुणे, न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले व श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान श्रींची प्रतिमा व स्वर्गीय लतादीदी मंगेशकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचा सत्कार न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा कृपावस्त्र देऊन करण्यात आला. न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी यांच्या हस्ते यथसांग मंत्र पठणाने श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी गुणवंत विद्यार्थी सत्कार नियोजन -अरविंद शिंदे, मंडप ठेकेदार- राऊत, स्क्रीन ऑपरेटर-कोल्हापुरे, साउंड ऑपरेटर-संदीप सरवदे, लाईट ऑपरेटर-जोगदंड, फोटोग्राफर-ज्ञानेश्वर भोसले, सूत्रसंचालन –श्वेता हुल्ले, स्टेज नियोजन-अमित थोरात, खुर्ची नियोजन -पांडुरंग काटकर, मंडप नियोजन-कल्लप्पा छकडे, मुख्य सुरक्षा रक्षक महादेव अनगले, सहाय्यक अनिल गवळी, संगणक ऑपरेटर-प्रसाद हुल्ले, मिडिया नियोजन –प्रशांत भगरे यांचा विशेष गौरव करण्यात आला. याबरोबरच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला व स्वामिनी प्रस्तुत ‘भक्तीसुधा’ सादरकर्ते –संदीप पाटील आणि सहकलाकार पुणे यांचा देखील न्यासाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
दरम्यान न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांनी गेली १० दिवस उत्कृष्ठरित्या श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाचा ३५ वा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सवनिमित्त धर्मासंकीर्तन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन केल्याबद्दल दिलीप सिद्धे यांच्याकडून सत्कार करण्यात आला. याबरोबरच न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.
यावेळी कृषी उपसंचालक संगीता माने पुणे, न्यासाचे विश्वस्त अलकाताई भोसले, अनुयाताई फुगे, अर्पिताराजे भोसले, रुपाली अमित थोरात, विश्वस्त संतोष भोसले, अँड.संतोष खोबरे, ओंकारेश्वर उटगे, लक्ष्मण पाटील, दिलीप सिद्धे, अरविंद शिंदे, प्रवीण देशमुख, योगेश पवार, राजु नवले, सनी सोनटक्के, सागर गोंडाळ, पिटू साठे, निखील पाटील, प्रवीण घाडगे, गोटू माने, अमित थोरात, राजेंद्र पवार, महांतेश स्वामी, धनंजय निंबाळकर, समर्थ घाडगे, रमेश हेगडे, प्रसाद हुल्ले, बाळासाहेब घाटगे, अप्पा हंचाटे, आकाश शिंदे, गोविंदराव शिंदे, सौरभ मोरे, वैभव मोरे, पिंटू दोडमनी, दत्ता माने, संतोष विभूते, सतीश जाधव, सिध्दाराम जाधव, प्रकाश शिंदे, मैनुद्दीन कोरबू, बाळासाहेब मोरे, आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन श्वेता हुल्ले यांनी केले. तर न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे यांनी रसिकप्रेक्षकांचे स्वागत व आभार मानले.