श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ या धर्मादाय न्यास संस्थेचा श्री गुरुपौर्णिमा व ३५ वा. वर्धापन दिन विविध धार्मिक कार्यक्रमाने बुधवारी संपन्न झाला.

पावसाच्या सरी झेलत..! श्री स्वामी समर्थ महाराज की… जयच्या जय घोषात श्री स्वामी समर्थांच्या पादुका पालखी आणि न्यासाच्या सुशोभित रथाच्या भव्य मिरवणुकीच्या दिंड्या, वाद्यांच्या गजरात, नादब्रह्म पुणे यांच्या ढोल पथकाच्या तालात व अमोलराजे भोसले लेझीम संघाच्या शानदार खेळाने, केरळ येथील ढोल पथक व कोल्हापूर येथील हलगी पथक यांच्या निनादात मान्यवरांच्या हस्ते व सन्मानीयांच्या उपस्थितीत गुरुपौर्णिमा उत्सव व मंडळाचा ३५ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने विविध धार्मिक कार्यक्रमाने संपन्न झाला.

दरम्यान मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली दु. ४ वाजता श्री स्वामी समर्थांच्या पादुका पालखी, आणि न्यासाच्या सुशोभित केलेल्या रथाच्या मिरवणूकीचा दिंड्या व वाद्यांचा गजरात अतुल बेहरे पुणे यांच्या नांदब्रम्ह या ढोलपथकाच्या तालात आणि अमोलराजे लेझिम संघाच्या शानदार खेळाने शुभारंभ मराठी सिनेअभिनेता मुंबई स्वप्निल जोशी, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य शहाजीराजे पवार, सो.म.पा. नगरसेवक अमोलबापू शिंदे, सो.म.पा. नगरसेवक चेतन नरोटे, सो.म.पा. माजी उपमहापौर दिलीप (भाऊ) कोल्हे, सो.म.पा.मा.शिक्षण सभापती संकेत पिसे यांच्या हस्ते करण्यात आला.

दरम्यान गुरूपौर्णिमे निमित्त या कार्यक्रमात सकाळी ७ ते ९ श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत ग्रंथाचे पारायण, सकाळी ९ ते १० नामस्मरण, जप व श्री गुरूपूजा, सकाळी १० वाजता महानवैद्य आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे, माजी मंत्री यशोमती ठाकूर, अधिकराव रामाराव खुडे –पाटील (पालखी संयोजक कराड), गोरख दिवेकर (देणगीदार पुणे) यांच्या शुभहस्ते दाखविण्यात आले व मान्यवरांचा सत्कार सोहळा संपन्न झाला

रथाची व पालखी मिरवणूक श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या प्रांगणातून निघून नवी विहीर, राजे फत्तेसिंह चौक, सर्जेराव जाधव पथ मार्गे, समर्थ चौक, सेंट्रल चौक, सोन्या मारुती, वीर सावरकर चौक, कापड लाईन मार्गे कारंजा चौक, बुधवार पेठेतील समाधी मठ, तेथील आरतीनंतर कारंजा चौक, सुभाष गल्ली, जय जवान गल्ली, मधला मारुती, राम गल्ली, गुरु मंदिर, भारत गल्ली, देशमुख गल्ली मार्गे अन्नछत्र मंडळात आरतीने सांगता करण्यात आली.

या भव्य-दिव्य पालखी सोहळ्याचे नेटके व अचूक नियोजन अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख कार्यकारी विश्वस्त व संयोजक अमोलराजे भोसले अचूक नियोजन केल्याने सदरचे विविध कार्यक्रम भारदार संपन्न झाले. मिरवणूक प्रसंगी विविध सामाजिक संघटनेकडून महाप्रसाद, पिण्याच्या पाण्याचे पाऊचचे पालखी मार्गावर वाटप करण्यात आले.

याप्रसंगी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे पुरोहित मंदार पुजारी, जेष्ठ नेते सुरेशचंद्र सूर्यवंशी, मिलन कल्याणशेट्टी, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, उद्योगपती संदीप फुगे-पाटील, नादब्रम्ह ढोल पथक प्रमुख अतुल बेहरे, दिलीप सिद्धे, संजय शिंदे, अनिल पानसे, ज्ञानेश्वर शिंदे, उत्तम गायकवाड, अविनाश मडीखांबे, सुनील बंडगर, राजेंद्र हजारे, अनिकेत पिसे, सुभम पिसे, गौरव पिसे, कपिल पिसे, सागर पिसे, पृथ्वीराज नरोटे, अँड.संतोष खोबरे, अँड.श्रीरंग सापटणेकर, अँड.सुजय सापटणेकर, अँड.श्रेया सापटणेकर, आबा बालगुडे, न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त राजेंद्र लिंबीतोटे, लक्ष्मण पाटील, संतोष भोसले, लाला राठोड, ओंकारेश्वर उटगे, अरविंद शिंदे, सुनील खवळे, गणेश गोब्बुर, योगेश फुलारी, अशोकराव उटगे, राजू पंजाबी, गणेश भोसले, नरसिंग क्षीरसागर, स्वामिनाथ गुरव, उद्योगपती नागेश हेळवे, नितीन शिंदे, गोरक माळी, ओंकार भिमपुरे, प्रा.शरणप्पा अचलेर, अभियंता किरण पाटील, अमित थोरात, श्रीकांत झिपरे, प्रविण देशमुख, वैभव मोरे, सौरभ मोरे, संजय गोंडाळ, राजाभाऊ नवले, निखिल पाटील, प्रवीण घाडगे, पिंटू सोनटक्के, सनी सोनटक्के, पिंटू दोडमनी, महेश मुळे, गोटू माने, किरण जाधव, रोहन शिर्के, योगेश पवार, अप्पा हंचाटे, मैनुद्दीन कोरबु, दत्ता माने, मुन्ना कोल्हे, बाळू पोळ, सतीश महिंद्रकर, नामा भोसले, शहाजीबापू यादव, कल्याण देशमुख, चंद्रकांत हिबारे, धानप्पा उमदी, सिध्दाराम कल्याणी, एस.के.स्वामी, राजेंद्र पवार, बाळासाहेब घाडगे, कैलास माडकर, सिद्धेश्वर हत्तुरे, योगेश पवार, सागर शिंदे, रोहन शिर्के, केदार तोडकर, विशाल कलबुर्गी, अमोल पोतदार, गोविंदराव शिंदे, वैभव नवगिरे, पिंटू साठे, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, राहुल इंडे, सुमित कल्याणी, महेश दणके, टिनू पाटील, प्रा.चंद्रकांत पाटील, अतुल कोकाटे, प्रकाश टाके, शिवयोग शिंदे, बालाजी पाटील, विकास मोरे, मनोज इंगोले, अशोकराव किणीकर, दत्ता कदम, आकाश गडकरी, आबा सूर्यवंशी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे विधिवत पूजा न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पु पुजारी, विश्वसंभर पुजारी व संजय कुलकर्णी, सोमकांत कुलकर्णी, यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचलन व आभार श्वेता हुल्ले यांनी मानले