श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांचे पुत्र अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून घेतलेल्या विकास कामामुळे उत्कर्ष निर्माण झाल्याचे मनोगत मुख्यमंत्री सचिवालयातील माजी उपसचिव प्रशांत मयेकर मुंबई यांनी व्यक्त केले.
ते श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात सह कुटुंब आले असता न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री सचिवालयातील कक्ष अधिकारी वृषाली तवाखे व नवी मुंबई येथील अपोलो रुग्णालयाचे प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ.भूषण चव्हाण यांचा देखील सत्कार न्यासाच्या वतीने करण्यात आला.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री सचिवालयातील कक्ष अधिकारी वृषाली तवाखे म्हणाल्या कि, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले व त्यांचे पुत्र प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या उत्कृष्ठ कार्य प्रणालीमुळे महाप्रसादाची महती जगभरात पोहचली असल्याचे मनोगत व्यक्त केल्या.
यावेळी सिद्धाराम कल्याणी, एस.के.स्वामी, बाळू पोळ, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, पिंटू साठे, बाळासाहेब घाडगे, निखील पाटील, प्रवीण घाडगे, गोटू माने, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, दत्ता माने, राजू पवार, प्रसाद हुल्ले, कल्याण देशमुख यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.