राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ ग्राफीच्या माध्यमातून अन्नछत्र मंडळाच्या नियोजित महाप्रसादगृह इमारतीचा भूमिपूजन कार्याला शुभेच्छा दिल्या

*अन्नछत्र मंडळाचा गुरुपौर्णिमा उत्सव यंदा वैशिष्ट्यपूर्ण*

अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त, सद्‌गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय..! श्री अन्नपूर्णा देवी, श्री लक्ष्मी नारायण नामाच्या जयघोषात, संपूर्ण देशात अन्न हे पूर्णब्रह्माची साक्ष देणारे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या ३७ वा. वर्धापनदिन व श्री गुरुपौर्णिमा उत्सवनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमा बरोबरच रु. ६० कोटीच्या नियोजित ५ मजली भव्य अशा महाप्रसादगृह इमारतीचा भूमिपूजन सोहळा रविवारी मोठ्या थाटात व उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ ग्राफीच्या माध्यमातून अन्नछत्र मंडळाच्या नियोजित ५ मजली भव्य अशा महाप्रसादगृह इमारतीचा भूमिपूजन कार्याला शुभेच्छा दिल्या