अक्कलकोट भक्ति रन – २०२६

🏃‍♂️रजिस्ट्रेशन लिंक : https://www.runsolapur.com/…/akkalkot-10k-bhakti-run…🏃‍♂️

🙏 “अक्कलकोट 10K भक्ती रन 2026” 🙏

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट, अक्कलकोट तसेच चॅलेंजर स्पोर्ट्स फाउंडेशन, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या भव्य “अक्कलकोट 10K भक्ती रन” या आगळ्यावेगळ्या मॅरेथॉन स्पर्धेच्या ऑनलाईन रजिस्ट्रेशन लिंकचे उद्घाटन आज सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री. एस. कार्तिकेयन यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाले. ✨

🌿 “आरोग्य ते अध्यात्म” हा प्रेरणादायी संदेश देणारी ही “भक्ती रन” स्पर्धा येत्या दि. 26 जुलै 2026, रविवार रोजी अक्कलकोटच्या पावन भूमीत आयोजित करण्यात आली असून, शारीरिक तंदुरुस्ती, अध्यात्मिक उन्नती आणि भक्तीमय वातावरणाचा सुंदर संगम या उपक्रमातून अनुभवायला मिळणार आहे.

🔗 यावेळी मॅरेथॉनच्या अधिकृत ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेला प्रारंभ करत रजिस्ट्रेशन लिंकचे लोकार्पण करण्यात आले. आता राज्यभरातील धावपटूंना या भव्य “भक्ती रन” मध्ये सहभागी होण्यासाठी अधिकृतपणे नोंदणी करता येणार आहे.

🏅 3 KM, 5 KM आणि 10 KM अशा विविध गटांमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत सहभागी धावपटूंना बिब, टी-शर्ट, मेडल, प्रमाणपत्र, आकर्षक बक्षिसे, मेडिकल सपोर्ट, पौष्टिक नाश्ता तसेच उत्साहपूर्ण वातावरणाचा अनुभव मिळणार आहे.

🎶 भक्ती, फिटनेस आणि पारंपरिक संस्कृतीचा संगम घडवणारा हा उपक्रम राज्यभरातील धावपटू, क्रीडाप्रेमी आणि स्वामी भक्तांसाठी एक विशेष पर्वणी ठरणार आहे.

✨ यावेळी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट, अक्कलकोटचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले, चॅलेंजर स्पोर्ट्स फाउंडेशन, सोलापूरचे अध्यक्ष अतिश शहा, तसेच मनोज निकम साहेब, प्रवीणजी देशमुख, अभिषेक लोकापुरे, सिद्धेश्वर मोरे, किरण पाटील, निखिल पाटील, वैभव मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.