केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना.नितीन गडकरी यांची सदिच्छा भेट

*श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरु केलेल्या महाप्रसादाच्या सेवेबरोबरच विविध उपक्रम हे उल्लेखनीय आणि धाडशी नेतृत्व व प्रबळ इच्छाशक्तीमुळेच न्यासाचा प्रचंड विस्तार होत आहे. अन्नछत्र मंडळ हे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात लौकिक, धार्मिक व सांस्कृतीकतेचे प्रतिक असल्याचे मनोगत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना.नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.*

ते श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील स्वामी समर्थ अन्नछत्र (ट्रस्ट) मंडळात आले असता न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत, न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी राजा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देखील ना. गडकरी यांना देण्यात आली. त्यांच्या समवेत खासदार ज्योतीताई वाघमारे, आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोटे, सो.मा.प. महापौर विनायक कोंड्याल, सोलापूर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी सोलापूर ग्रामीण, ना. नितीन गडकरी यांचे स्विय सहायक बाळासाहेब ठेंग, मनोज वाडेकर, दिपक शिंदे, अमोल बिराजदार, एन.एच.ए. पुणे प्रकल्प संचालक संजय कदम, सोलापूर एन.एच.ए.चे स्वप्नील कासार, गुरुशांत धुत्तरगावकर, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, दिपक वाघमारे, भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण, अक्कलकोट भाजपा मध्य मंडल अध्यक्ष प्रदीप पाटील आदिजन उपस्थित होते.

पुढे बोलताना ना.नितीन गडकरी यांनी म्हणाले की, गडकरी कुटुंबीय आम्ही श्रीक्षेत्र अक्कलकोट निवासी स्वामी भक्तच, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, हे स्वामींची अनुभूतीच आहे, व आमचे श्रध्देय स्थळ आहे. न्यासाच्या वतीने पर्यावरण पूर्वक वसुंधरेची जपणूक केली जात असल्याचे समाधान व्यक्त करून मंडळाकडून समर्थ महाप्रसाद सेवेची माहिती घेऊन न्यासाच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.