अक्कलकोट : (प्रतिनिधी)
*अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त, सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय..! श्री अन्नपूर्णा देवी, श्री लक्ष्मी नारायण नामाच्या जयघोषात, संपूर्ण देशात अन्न हे पूर्णब्रह्माची साक्ष देणारे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ या धर्मादाय न्यास संस्थेचा ३९ वा. वर्धापन दिन व श्री गुरुपौर्णिमा उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमा न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रमुख उपस्थितीत व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी मोठ्या थाटात व उत्साहात संपन्न झाले. अन्नछत्र मंडळात लाखो स्वामी भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतले. राज्यसह, परराज्य, परदेशातून स्वामी भक्तांनी प्रचंड गर्दी केलेली होतील. अन्नछत्र परिसरात विविध ठिकाणी आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली होती.
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या असीमकृपेने, न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रमुख उपस्थितीत व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली अन्नछत्र मंडळ हे ३९ व्या वर्षात यशस्वी पदार्पण करुन नेत्रदीपक वाटचाल करीत आहे.
दरम्यान गुरूपौर्णिमे निमित्त सकाळी ७ ते ९ श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत ग्रंथाचे पारायण, सकाळी ९ ते १० नामस्मरण, जप व श्री गुरूपूजा संपन्न झाले. राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री ना. भरतशेठ गोगावले, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार शेखर निकम, आमदार शिवाजीराव पाटील, माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे, नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी, पुणे, अखिल मंडई मंडळ पुणेचे अध्यक्ष व न्यासाचे विश्वस्त जनार्दन उर्फ अण्णा थोरात, भरत मित्र मंडळ पुणे संस्थापक अध्यक्ष- बाळासाहेब दाभेकर, सचिन सांबरेकर पालखी परिक्रमा संयोजक बेळगावी, ललिताताई वीर आगासखिंड नाशिक देणगीदार आदि मान्यवरांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचा सत्कार न्यासाच्या वतीने करण्यात आला.
या विविध कार्यक्रमास न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त भाऊ कापसे, कु. हर्षवर्धनराजे अमोलराजे भोसले, कु. समर्थ संदीप फुगे, राजेंद्र लिंबीतोटे, ताराबाई हांडे, आरतीताई लिंगायत, रविना राठोड, लक्ष्मण पाटील, संतोष भोसले, लाला राठोड, डॉ.प्रसाद प्रधान, संदीप फुगे, अमर पाटील, रमेश बारसकर, रामचंद्रराव घाटगे, आनंद तानवडे, गणेश मोरे, मनीष काळजे, रमेश केत, योगेश गोविल, धनंजय गाढवे, नागनाथ कुंभार, सिद्धाराम टाके, ओंकारेश्वर उटगे, मनोज निकम, अरविंद शिंदे, किशोर सिद्धे, अभियंता किरण पाटील, नागेश कलशेट्टी, रमेश केत, श्रीशैल कुंभार,यश विभुते,नितीन मोरे, रोहित मोरे, प्रवीण देशमुख, नन्नु कोरबू, सिध्देश्वर माळी, शिवराज स्वामी, मैनुद्दीन कोरबू, सर्फराज शेख, प्रशांत साठे, अप्पा हंचाटे, अश्पाक काझी, शुभम नागरे, अभिषेक लोकापुरे, रोहित खोबरे, पुणे येथील चंदन बकरे, मयूर कडू, बाळासाहेब जाधव, दिलीप ठोंबरे, मनोज पाटील, अनिल येणकुरे, वैभव मोरे, सौरभ मोरे, संजय गोंडाळ, निखिल पाटील, प्रवीण घाटगे, रामचंद्रराव घाटगे, गणेश भोसले, रमेश हलसंगी, संतोष माने, गोटू माने, सिद्धाराम माळी, रामचंद्र समाने, धनंजय गडदे, अभिजित लोकापुरे, सिद्धेश्वर मोरे, रोहन शिर्के, अतिश पवार, योगेश पवार, अप्पा हंचाटे, शुभम चव्हाण, केदार तोडकर, गोविंद शिंदे, योगेश कटारे, कुणाल भालेकर, पद्माकर डीग्गे, प्रशांत विभूते, शिवशरण इचगे, प्रा. प्रकाश सुरवसे, सुनिल कटारे, योगेश वाघमारे, नुर खासबागदार, राजू म्हेत्रे, पै. महेश कुलकर्णी, मौला शेख, ऋषी लोणारी, भारत पाटील, महेश दणके, आकाश सूर्यवंशी, फहीम पिरजादे, धनंजय गडदे, नारायण गडदे, रणजीत होतकर, बालाजी पाटील, सुमित कल्याणी, सागर याळवर, संजय गोंडाळ, अतिश शिंदे, सागर शिंदे, अण्णा सावंत, रमेश केत, मैनुद्दीन कोरबु, विराज माणिकशेट्टी, दत्ता माने, दत्ता मोरे, विश्वजित पाटील, वासू कडबगांवकर, शिवा मंगरूळे, राजाराम पवार, बाळासाहेब पोळ, सतीश महिंद्रकर, नामा भोसले, शहाजीबापू यादव, विनायक भोसले,कल्याण देशमुख, चंद्रकांत हिबारे, धानप्पा उमदी, सिध्दाराम कल्याणी, मल्लिकार्जुन बिराजदार, लक्ष्मण बिराजदार, श्रीनिवास गवंडी, एस.के.स्वामी, रमेश हेगडे, राजेंद्र पवार, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, अनिल बिराजदार, बाळासाहेब घाडगे, स्वामिनाथ बाबर, योगेश पवार, सागर शिंदे, किरण साठे, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, असद फुलारी, राहुल इंडे, मारुती बोरकर, काशिनाथ वाले, विठ्ठल रेड्डी, समर्थ चव्हाण व त्यांची टीम यांच्यासह अमोलराजे लेझीम संघ व मित्र परिवार व समस्त विश्वस्त, क्रियाशील सभासद, सेवेकरी व कार्यकर्ते आदीजण मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
गुरुपौर्णिमेनिमित्त श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात असलेले यात्रीनिवास, यात्रीभुवन गेल्या दोन दिवसापासून हाऊसफुल्ल झालेले होते. मंडळाने पार्किंगची व्यवस्था चोख केलेली होती. राज्यासह परराज्यातील लाखो भाविकांनी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात महाप्रसादाकरिता गर्दी झालेली होती. गेल्या १० दिवसापासून श्री गुरु पौर्णिमा व ३९ व्या वर्धापन दिनानिमित्त धर्मसंकीर्तन व सांस्कृतिक कार्यक्रम, भजन, किर्तन या कार्यक्रमासह गुरुपौर्णिमेच्या दिवशी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांनी महाप्रसाद भक्तांना वाटप होण्याकरिता नेटके नियोजन केलेले होते. विधिवत पूजा न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पु पुजारी, विश्वंभर पुजारी व संजय कुलकर्णी, सोमकांत कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचलन श्वेता हुल्ले यांनी तर व आभार सचिव शामराव मोरे यांनी मानले.
चौकट :
वर्षभरात ५ हजार भक्तांनी केले रक्तदान :
गेल्या ३६० दिवसात सोलापूर येथील विविध रक्तपेढीने अन्नछत्र मंडळात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये वर्षभरात ५ हजार स्वामी भक्तांनी रक्तदान केले आहे.
चौकट :
चोख बंदोबस्त :
श्री गुरु पौर्णिमा व ३९ व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली व उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र टाकणे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक एकनाथ पवार यांनी चोख पोलीस बंदोबस्त मंदिर व न्यासाच्या परिसरात लावण्यात आला होता.
चौकट :
न्यासाचे नेटके नियोजन :
बाहेर गावामधून आलेल्या वाहनांची मैंदर्गी, बसलेगाव, व शहरातील मुख्य रस्त्यावर वाहनांची दुतर्फा गर्दी होत होती. हे लक्षात घेऊन न्यासाच्या मैंदर्गी रस्त्यावरील गेटने भाविकांना बाहेर जाण्यासाठी रस्ता मोकळा करण्यात आल्याने वाहनांच्या गर्दीवर नियंत्रण आल्यामुळे वाहनांची गर्दी कमी झाली. न्यासाने पार्किंगची व्यवस्था चोख केलेली होती. नेहमीच भक्तांना सुविधा देण्यामध्ये न्यास हे अव्वल असून भक्तांना कोणत्याच अडचणी येता कामा नये आशा उपाययोजना व दक्षता घेत असल्याने भक्तांना सुखकर पद्दतीने महाप्रसादाचा लाभ मिळाला.
चौकट :
लाखो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ :
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात दैनंदिन दोन्ही वेळेस मोफत महाप्रसादाची सोय, भक्तांच्या यथाशक्तीच्या देणगीवर सुरू आहे. दररोज २५ हजार हून अधिक तर सण, वार, उत्सव, दर गुरूवारी, संकष्टी चतुर्थी, एकादशी व गुरुपोर्णिमेच्या दिवशी १ लाखाहून अधिक भाविक महाप्रसादाचा लाभ घेतला.
चौकट :
श्री क्षेत्र अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे नांव सातासमुद्रापार :
महाराष्ट्रसह कर्नाटक, आंध्र, तेलंगणा, गोवा, मध्यप्रदेश, केरळ, तमिळनाडू, गुजरात, दिवदमन, उत्तराखंड, काश्मीर पंडित व दिल्ली याबरोबरच राजस्थान, उत्तर प्रदेश व बिहार या राज्यासह विदेशातून लाखो भाविकांनी न्यासाचे ३९ वा. वर्धापनदिन व गुरुपोर्णिमेच्या निमित्त श्रीक्षेत्र अक्कलकोट येथे येऊन श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाबरोबरच अन्नछत्र मंडळात महाप्रसादाचा लाभ घेतेले.
नव्याने बांधण्यात येणाऱ्या महप्रसादगृहाचे काम प्रगतीपथावर:
सण २०२४ ला महाप्रसादगृहाच्या बांधकामास प्रारंभ करण्यात आलेला होता. त्यास दोन वर्षे पूर्ण होत असून, सध्या तिसऱ्या मजल्याचे काम प्रगतीपथावर आहे. नियोजित महाप्रसाद गृहाची इमारत, भव्य आणि मंदिर सदृश्य असणार आहे. ही इमारत पूर्णपणे वातानुकुलित असून या इमारतीचे बांधकाम क्षेत्र १ लाख १९,३९८ चौरस फुट असणार आहे. इमारतीच्या टेरेसवर श्री स्वामी समर्थांची ५१ फुटांची सुंदर, रेखीव आणि भव्य मुर्ती, सर्वांचे लक्ष वेधून घेईल. या नवीन नियोजित महप्रसादगृहात २५०० भाविकांची महाप्रसादाची व्यवस्था असून, या आराखड्याच्या माध्यमातून हे पाहू शकता की, एकूण ५ हजार भाविकांसाठी बसून सर्व सोयी सुविधांनी युक्त अशा प्रतिक्षा कक्षाचे नियोजन करण्यात आले आहे. शिवाय या इमारतीच्या तळघरामधे धान्य- भाजीपाला कोठार, चटणी व पिठाची गिरणी तसेच १ तासामध्ये ८०० चपाती तयार करता येणाऱ्या ७ मशिन्स, आणि भांडे धुण्यासाठी डिश वॉशर यांची देखील सोय आहे. संपूर्ण इमारतीमध्ये अग्निशामन यंत्रणा बसविण्यात येणार आहे. सदर इमारतीचे बांधकाम करण्याची पुर्वतयारी झाली असुन, ही सर्व अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज व प्रशस्त इमारत, स्वामी भक्तांच्या देणगीतून साकार होणार आहे. या बांधकामाचा सर्वसाधारण अंदाजे खर्च रुपये ६० कोटी, इतका अपेक्षित आहे. नुकतेच प्रशासकिय ५ मजली इमारतीचे भूमिपूजन संपन्न झाले आहे.
चौकट:
विविध योजना उल्लेखनीय:
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली समर्थ महाप्रसाद सेवा कुस्तीगिरांसाठी खुराक या सह विविध योजना उल्लेखनीय रित्या राबविले जात आहेत. यंदाच्या पंढरपूर वारीत तंदूरुस्त पोलीस बंदोबस्ता करिता पोलिसांकरिता अन्नधान्य, उपासाचे जिन्नस, आणि पाण्याचे ५०० जार देण्यात आले.
अक्कलकोट : (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून ३९ वर्षामध्ये अनेक उल्लेखनीय उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये आता टर्फ क्रिकेट संस्कृतीची भर पडली आहे, गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून न्यासाने अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले क्रिकेट ट्रेनिंग अॅकॅडमीची उभारणी केली आहे, या मुळे ग्रामीण भागातील खेळाडूना प्रोत्साहन मिळेल आणि उत्कृष्ट खेळाडू निर्माण होतील असे गौरोदगार राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री, ना. भरतशेठ गोगावले, यांनी व्यक्त केले.
ते बुधवारी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट, अक्कलकोट संचलित न्यासाच्या लगत असलेल्या जागेत अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले क्रिकेट ट्रेनिंग अकॅडमी उद्घाटन सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. या प्रसंगी ना. भरतशेठ गोगावले बोलत होते. या कार्यक्रमास भारतीय, रणजी, महाराष्ट्र क्रिकेट संघाचे खेळाडू, प्रशिक्षक, निवडकर्ता हे उपस्थित होते.
दरम्यान अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले क्रिकेट ट्रेनिंग अॅकॅडमी उदघाटन ना. भरतशेठ गोगावले, रोजगार हमी योजना मंत्री, आमदार शेखर निकम, चिपळूण, आमदार, सचिन कल्याणशेट्टी, आमदार शिवाजीराव पाटील, माजी गृहराज्य मंत्री, सिद्धाराम म्हेत्रे, नगराध्यक्ष, मिलन कल्याणशेट्टी, न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले, संदीप फुगे, भरत मित्र मंडळ, बाळासाहेब दाभेकर, पुणे यांच्या हस्ते व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष- जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आणि चंद्रकांत पंडित, माजी भारतीय क्रिकेटपटू व प्रशिक्षक, समीर दिघे, माजी भारतीय क्रिकेटपटू व प्रशिक्षक, संजय पाटील, सिलेक्टर, रणजी ट्रॉफी, मुंबई व मुंबई क्रिकेट असोसिएशन, TRDO चे चेअरमन, धर्मराज गोपाल सिंग, सिंगस स्पोर्ट्स, मुंबई, अॅड. नितीन हबीब, जेष्ठ विधिज्ञ व कायदे विषयक सल्लागार, स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट, ओंकारेश्वर उटगे, चार्टर्ड अकाऊंटंट, अरविंद शिंदे, योगेश अहंकारी, आर्कीटेक्ट, बालाजी सलगर अजिंक्यतारा टेन्साईल रुफ,पुणे, किरण पाटील, इंजिनिअर्स व कॉट्रॅक्टर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
पुढे बोलताना ना.भरतशेठ गोगावले म्हणाले, श्री क्षेत्र अक्कलकोटच्या वैभवात भर पडणारे कार्य श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ करत आहे. गेल्या ३९ वर्षामध्ये धार्मिक क्षेत्राबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आणि क्रीडाक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे. सरकार म्हणून आमदार म्हणून आपल्या प्रभावी सुरु असलेल्या कार्यासाठी आपण लागेल ती मदत करण्या कामी कटीबद्ध असल्याचे सांगून श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या कार्याचे कौतुक केले.
या वेळी त्यांनी रायगडचा इतिहास व राजकारण याबात मनोगतातून विचार व्यक्त केले. या वेळी नामदार गोगावले यांनी श्री स्वामी समर्थांच्या श्री क्षेत्र अक्कलकोट चे प्रतिनिधीत्व करणारे सचिन कल्याणशेट्टी हे खरोखरच भाग्यवान आमदार असल्याचा गौरव करून त्यांच्या कडून सुरु असलेल्या विकास कामाचे कौतक केले.
चौकट:
अॅकॅडमीच्या माध्यमातून ग्रामीण खेळाडूना संधी –
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाने अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले क्रिकेट ट्रेनिंग अॅकॅडमीमुळे अक्कलकोट सह ग्रामीण भागातील खेळाडूंना व्यासपीठ मिळवून देण्याचे महत्वपूर्ण काम केले आहे. या माध्यमातून आय.पी.एल., महाराष्ट्र, भारतासाठी या अॅकॅडमीच्या माध्यमातून खेळाडू मिळो अशी अपेक्षा व्यक्त करतो.
समीर दिघे- भारतीय क्रिकेटपटू व प्रशिक्षक, मुंबई
चौकट :
श्री क्षेत्र शेगाव नंतर श्री क्षेत्र अक्कलकोट येथे क्रिकेट अॅकॅडमी-
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाने ग्रामीण भागातील क्रिकेट खेळाडूंना संधी देण्याचे काम न्यास करीत आहे. या पूर्वी शेगाव येथे अश्याच अॅकॅडमीचे उद्घाटन करण्याचा योग आला होता. आता श्री क्षेत्र अक्कलकोट मध्ये अॅकॅडमीचे उद्घाटन करण्याचा मान आम्हाला मिळाला आहे. पूर्वी अश्या अॅकॅडम्या ह्या मोठ्या महानगरामध्ये पाहायला मिळत होत्या, आता त्या अक्कलकोट शहरापर्यंत पोहचले आहेत. याचा फायदा तरुण खेळाडूने घ्यावेत.
संजय पाटील – सिलेक्टर व रणजी ट्रॉफी, मुंबई
समीर दिघे- भारतीय क्रिकेटपटू व प्रशिक्षक, मुंबई व संजय पाटील – सिलेक्टर व रणजी ट्रॉफी, मुंबई यांनी
अॅकॅडमी व क्रिकेट विश्वाची माहिती यावेळी उपस्थितांना दिली.
न्यासाचे उपाध्यक्ष, अभय गुणधर खोबरे, सचिव, स्वामीराव मोरे, खजिनदार, लाला राठोड, विश्वस्त, राजेंद्र लिंबीतोटे, चंद्रकांत कापसे, लक्ष्मण पाटील, संतोष भोसले, रामचंद्रराव घाटगे, सर्व क्रियाशील सदस्य-सदस्या, सेवेकरी आणि कार्यकर्ते, स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ यांच्या सह चरणराज चौरे, संजय कोकाटे, आनंद तानवडे, रमेश बारसकर, पै. काकासाहेब पवार, पै. धनराज भुजबळ, महेंद्र गायकवाड, अमर पाटील, मनीष काळजे, संदीप खर्डीकर, संतोष बडवे, गिरीष कोल्हापुरे, प्रकाश सोनटक्के, राजू रंगर, उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त भाऊ कापसे, कु. हर्षवर्धनराजे अमोलराजे भोसले, कु. समर्थ संदीप फुगे, राजेंद्र लिंबीतोटे, ताराबाई हांडे, आरतीताई लिंगायत, रविना राठोड, लक्ष्मण पाटील, संतोष भोसले, लाला राठोड, डॉ.प्रसाद प्रधान, संदीप फुगे, अमर पाटील, रमेश बारसकर, रामचंद्रराव घाटगे, आनंद तानवडे, गणेश मोरे, मनीष काळजे, रमेश केत, योगेश गोविल, रमेश केत, धनंजय गाढवे, नागनाथ कुंभार, सिद्धाराम टाके, ओंकारेश्वर उटगे, मनोज निकम, अरविंद शिंदे, किशोर सिद्धे, अभियंता किरण पाटील, नागेश कलशेट्टी, नितीन मोरे, रोहित मोरे, प्रवीण देशमुख, नन्नु कोरबू, सिध्देश्वर माळी, शिवराज स्वामी, मैनुद्दीन कोरबू, सर्फराज शेख, प्रशांत साठे, अप्पा हंचाटे, अश्पाक काझी, शुभम नागरे, अभिषेक लोकापुरे, रोहित खोबरे, पुणे येथील चंदन बकरे, मयूर कडू, बाळासाहेब जाधव, दिलीप ठोंबरे, मनोज पाटील, अनिल येणकुरे, वैभव मोरे, सौरभ मोरे, संजय गोंडाळ, निखिल पाटील, प्रवीण घाटगे, रामचंद्रराव घाटगे, गणेश भोसले, रमेश हलसंगी, संतोष माने, गोटू माने, सिद्धाराम माळी, रामचंद्र समाने, धनंजय गडदे, अभिजित लोकापुरे, सिद्धेश्वर मोरे, रोहन शिर्के, अतिश पवार, योगेश पवार, अप्पा हंचाटे, शुभम चव्हाण, केदार तोडकर, गोविंद शिंदे, योगेश कटारे, कुणाल भालेकर, पद्माकर डीग्गे, प्रशांत विभूते, शिवशरण इचगे, प्रा. प्रकाश सुरवसे, सुनिल कटारे, योगेश वाघमारे, नुर खासबागदार, राजू म्हेत्रे, पै. महेश कुलकर्णी, मौला शेख, ऋषी लोणारी, भारत पाटील, महेश दणके, आकाश सूर्यवंशी, फहीम पिरजादे, धनंजय गडदे, नारायण गडदे, रणजीत होतकर, बालाजी पाटील, सुमित कल्याणी, सागर याळवर, संजय गोंडाळ, अतिश शिंदे, श्रीशैल कुंभार, सागर शिंदे, अण्णा सावंत, रमेश केत, मैनुद्दीन कोरबु, विराज माणिकशेट्टी, दत्ता माने, दत्ता मोरे, विश्वजित पाटील, वासू कडबगांवकर, शिवा मंगरूळे, राजाराम पवार, बाळासाहेब पोळ, सतीश महिंद्रकर, नामा भोसले, विनायक भोसले, शहाजीबापू यादव, कल्याण देशमुख, चंद्रकांत हिबारे, धानप्पा उमदी, सिध्दाराम कल्याणी, मल्लिकार्जुन बिराजदार, लक्ष्मण बिराजदार, श्रीनिवास गवंडी, एस.के.स्वामी, रमेश हेगडे, राजेंद्र पवार, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, अनिल बिराजदार, बाळासाहेब घाडगे, स्वामिनाथ बाबर, योगेश पवार, सागर शिंदे, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, असद फुलारी, राहुल इंडे, मारुती बोरकर, काशिनाथ वाले, किरण साठे, विठ्ठल रेड्डी, समर्थ चव्हाण व त्यांची टीम यांच्यासह अमोलराजे लेझीम संघ व मित्र परिवार व समस्त विश्वस्त, क्रियाशील सभासद, सेवेकरी व कार्यकर्ते आदीजण मोठ्या संख्येने उपस्थितीत होते. हे उपस्थित होते.
या कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा सत्कार, न्यासाचे संस्थापक अध्यक्ष- जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर, सुबक, कोरीव प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांनी पै. महेंद्र गायकवाड यांना रु. १ लाख व पै. काकासाहेब पवार यांना ५१ हजार रुपये तर. पै. धनराज भुजबळ यांना ५१ हजाराची देणगी यांना दिली. यावेळी अॅकॅडमी जवळील रहिवाश्यांच्या वतीने श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांचा सत्कार करण्यात आला. या बरोबरच वेळेच्या आत अॅकॅडमी काम अद्यावत पूर्ण केल्याबद्दल न्यासाचे सचिव शामराव मोरे यांचा सत्कार ना.भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते करण्यात आला. या बरोबरच अॅकॅडमीचे प्रशिक्षक मल्लिकार्जुन कोळी यांचा देखील सत्कार करण्यात आला.
या अॅकॅडमीस क्रिकेटपटू- सुनिल मालप, चंद्रकांत रेंबुर्स, किशोर बोरामणी, उदय डोके, राजेंद्र गोटे, संतोषजी बडवे, अभिजित गुंड, सोलापूर यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
चौकट :
पोर्ट ब्लेअरपासून अक्कलकोट पर्यंत खेळाचा नवा ‘फिजिटल’ अवतार! श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वामुळे शक्य झाले आहे.
महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्राचे विशेषतः क्रिकेटचे स्वरूप आता वेगाने बदलत आहे. एकेकाळी फक्त मुंबई-पुण्यासारख्या मेट्रो शहरांपुरते मर्यादित असलेले ‘टर्फ कल्चर’ आता लातूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि अगदी अक्कलकोट सारख्या तालुका स्तरावरही पोहोचले आहे. विशेष म्हणजे, जिथे जमिनीची कमतरता आहे अशा महानगरांमध्ये आता इमारतींची छते आणि गच्चीवरील हिरव्या जाळीने व्यापल्याचे चित्र दिसत आहे.
‘पूर्वी टर्फ म्हणजे फक्त छंद होता, पण आता तो ‘हेल्थ आणि वेलनेस’चा भाग झाला आहे. लोक आपल्या फिटनेसबाबत कमालीचे सजग झाले आहेत. महाराष्ट्राबरोबरच अगदी जम्मू, नॉर्थईस्ट आणि अगदी पोर्ट ब्लेअरमध्येही टर्फ संस्कृती जोराने फोफावली आहे. कोविडनंतर निर्माण झालेली आरोग्याची जागृती आणि बदललेली जीवनशैली यामुळे ‘टर्फ’ आता केवळ खेळाचे मैदान न राहता एक समृद्ध ‘क्रीडा इकोसिस्टम’ बनले असल्याचे माजी भारतीय क्रिकेटपटू आणि क्लब मेंबर बोलताना सांगितले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व प्रास्ताविक प्रसिद्ध निवेदिका श्वेता हुल्ले तर आभार अरविंद शिंदे सर यांनी मानले.
अक्कलकोट : (प्रतिनिधी)
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, सद्गुरू…! श्री स्वामी समर्थ महाराज की…!, श्री अन्नपूर्णा माता की जय…! च्या जय घोषात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली व मान्यवरांच्या उपस्थितीत श्री स्वामी समर्थांच्या पादुका पालखी आणि न्यासाच्या सुशोभित रथाच्या भव्य मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला. या मिरवणुकीत दिंड्या, वाद्यांच्या गजरात, स्वरांजली बँडपथक लालबाग मुंबई, विजुभाई तांडेल, चुनाभट्टी यांचे आराध्य ढोलपथक, नादब्रह्म, पुणे यांचा ढोल-ताशा ध्वज पथकांच्या तालात व अमोलराजे भोसले लेझीम संघाच्या शानदार खेळाने, केरळ येथील ढोल पथक, संभळ, ब्यांड सह श्री हनुमान देखावा, कोल्हापूर व अक्कलकोट येथील हलगी पथक, पारंपारिक वाद्याला प्राधान्य देत, फटाक्यांची अतिषबाजी व रिमझिम पावसाच्या सरी झेलत पालखी सोहळा संपन्न झाला. गुरुपौर्णिमा उत्सव व मंडळाचा ३९ वा. वर्धापनदिन मोठ्या उत्साहात मिरवणूकीने सांगता बुधवारी करण्यात आली.
दरम्यान भरत मित्र मंडळ पुणे अध्यक्ष व न्यासाचे क्रियाशील सभासद बाळासाहेब दाभेकर, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य शहाजीराजे पवार, सो.म.पा. नगरसेवक व शिवसेना जिल्हाप्रमुख अमोलबापू शिंदे, सो.म.पा. माजी उपमहापौर दिलीप (भाऊ) कोल्हे, सो.म.पा. नगरसेवक, मा.स्थायी समितीचे माजी चेअरमन व शहर-जिल्हाध्यक्ष (कॉंग्रेस) चेतन नरोटे, सो.म.पा. स्थायी समिती सभापती रंजीताताई चाकोते, आराध्य तांडेल चुनाभट्टी मुंबई, सागर पिसे, सोलापूर, पुणे नगरसेवक संदीप खर्डीकर, उद्योजक श्री रेघे मुंबई यांच्या हस्ते पालखी व रथ मिरवणुकीचा शुभारंभ यांच्या हस्ते पालखी व रथ मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात करण्यात आला.
रथाची व पालखी मिरवणूक श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या प्रांगणातून निघून नवी विहीर, राजे फत्तेसिंह चौक, सर्जेराव जाधव पथ मार्गे, समर्थ चौक, सेंट्रल चौक, सोन्या मारुती, वीर सावरकर चौक, कापड लाईन मार्गे कारंजा चौक, बुधवार पेठेतील समाधी मठ, तेथील आरतीनंतर कारंजा चौक, सुभाष गल्ली, जय जवान गल्ली, मधला मारुती, राम गल्ली, गुरु मंदिर, भारत गल्ली, देशमुख गल्ली मार्गे अन्नछत्र मंडळात आरतीने सांगता करण्यात आली.
या भव्य-दिव्य पालखी सोहळ्याचे नेटके व अचूक नियोजन अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अध्यक्ष व संयोजक अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. रथ व पालखीला नयनरम्य फुलांनी सजविण्यात आले होते. मिरवणूक प्रसंगी विविध सामाजिक संघटनेकडून पालखी मार्गावर प्रसाद वाटप करण्यात आले.याबरोबरच स्वागत कमानी, डिजिटल ब्यानर लावण्यात आले होते. मिरवणूक बघण्यासाठी पालखी मार्गावर दुतर्फा प्रचंड गर्दी झालेली होती.
याप्रसंगी न्यासाचे श्री व सौ. श्रीकांत घाटगे, सोलापूर, उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, संदीप फुगे, कु. हर्षवर्धनराजे अमोलराजे भोसले, कु. समर्थ संदीप फुगे, राजेंद्र लिंबीतोटे, लक्ष्मण पाटील, संतोष भोसले, रामचंद्रराव घाटगे, लाला राठोड, सौरभ मोरे, मनोज निकम, सिद्धेश्वर मोरे, समीर लोंढे, प्रविण देशमुख, डॉ.विनायक बुधले, अरविंद शिंदे, गणेश भोसले, प्रा.शरणप्पा अचलेर, अभियंता किरण पाटील, आरतीताई लिंगायत, श्रीकांत झिपरे, शिवराज स्वामी, वैभव मोरे, संजय गोंडाळ, निखिल पाटील, अतिश पवार, प्रवीण घाडगे, गोटू माने, किरण जाधव, रोहन शिर्के, योगेश पवार, सिद्धाराम टाके, सोमशेखर जमशेट्टी, बालाजी पाटील, सिद्धेश्वर माळी, अप्पा हंचाटे, अश्पाक काझी, मैनुद्दीन कोरबु, दत्ता माने, दत्ता मोरे, शुभम सावंत, मुन्ना कोल्हे, बसवराज क्यार, बाळासाहेब पोळ, स्वामिनाथ गुरव, गोरख माळी सतीश महिंद्रकर, नामा भोसले, शहाजीबापू यादव, कल्याण देशमुख, चंद्रकांत हिबारे, प्रा. मनोज जगताप, प्रदीप जाधव, धानप्पा उमदी, सिध्दाराम कल्याणी, एस.के.स्वामी, राजेंद्र पवार, बाळासाहेब घाडगे, योगेश पवार, सागर शिंदे, अजय अडवीतोटे, संतोष पत्तरगे, राम शिंदे, विशाल चांदले, मुकेश ठाकूर, सागर घाटगे, समीर खेर, विकास पवार, विशाल कलबुर्गी, गोविंदराव शिंदे, पिंटू साठे, कुणाल भालेकर, सुमित कल्याणी, महेश देवलकर, महेश कुलकर्णी, विराज माणिकशेट्टी, महादेव अनगले, राजेंद्र पवार, मल्लिकार्जुन बिराजदार, दत्ता माने, श्रीनिवास गवंडी, प्रसाद हुल्ले, रमेश हेगडे, अनिल बिराजदार, शरद भोसले, महांतेश स्वामी, असद फुलारी, रमेश हळसंगी, समर्थ घाटगे, धनंजय निंबाळकर, विठ्ठल रेड्डी, समर्थ चव्हाण, ऋषी लोणारी, काशिनाथ वाले, सुराज्य घाटगे, श्रीशैल कुंभार, ज्ञानेश्वर भोसले, किरण साठे, यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
पालखी व रथाचे विधिवत पूजा न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पु पुजारी, विश्वसंभर पुजारी व संजय कुलकर्णी, सोमकांत कुलकर्णी यांनी केले. सचिव शामराव मोरे यांनी आभार मानले.
लक्षवेधी मिरवणूक :-
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली निघालेली पालखी व रथ मिरवणुकीसाठी न्यासाने उत्कृष्ट नियोजन केलेले होते. या सोहळ्यास परराज्य, परदेशांतून स्वामी भक्त उपस्थित होते. पालखी व रथ मिरवणुकीत वाद्य वृन्दांची लावलेले क्रम व अमोलराजे लेझीम संघाचा बहारदार खेळ, मिरवणुकीची केलेली मांडणी व पालखीचे भक्तगणांतून कौतुक होत होते. इंव्हेट बाबत अन्नछत्र मंडळाचे उत्कृष्ट नियोजन पाहण्यासाठी राज्यातील अन्य तीर्थ क्षेत्रातील आवर्जून तेथील मंडळीनी या अन्नछत्र मंडळाच्या ३९ व्या वर्धापन दिन व गुरुपौर्णिमा उत्सवास भेटी दिल्या.
न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
चौकट :
भ्रमणध्वनी द्वारे शुभ संदेश-
अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या ३९ व्या वर्धापन दिननिमित्त तसेच श्री गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त मंडळातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सेवेकरी आणि भाविकांचे हार्दिक अभिनंदन आणि मंगलमय शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ चरणी कोटी कोटी वंदन!
श्री गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित उत्सव भक्ती, श्रद्धा आणि आध्यात्मिक उन्नतीचा संदेश देणारा आहे. समाजात सद्भावना आणि संस्कारांची जोपासना करणारा हा सोहळा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. या बरोबरच अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले क्रिकेट ट्रेनिंग अॅकॅडमीचे उद्घाटन सोहळा देखील संपन्न झाला आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातील खेळाडूंना उत्तम संधी निश्चितच मिळेल.
श्री गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त आयोजित या पवित्र सोहळ्याच्या निमित्ताने सर्व भाविक भक्तांना मन:पूर्वक मंगलमय शुभेच्छा!
ना.मुरलीधर मोहोळ,
राज्य मंत्री, केंद्रीय हवाई उड्डाण व सहकार, नई दिल्ली, भारत सरकार
चौकट :
श्रींच्या पालखी मिरवणुकीला लालबाग राजा च्या बँन्ड ची सलामी-
गुरुपौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी हजारो भाविकांच्या साक्षीने, श्री स्वामी समर्थ महाराजांना अखंड गरज आणि भक्तीभावाच्या अविस्मरणीय वातावरणात राज वैभवी, निघणाऱ्या श्रींच्या पालखीला लालबागचा राजा, लालबाग मुंबई येथील ख्यातनाम स्वरांजली बँन्ड पथकाच्या सलामीने मार्गस्थ करण्यात आले. सदरचे बँन्ड हे दरवर्षी लालबाग राजाच्या गणेश उत्सवाच्या काळात प्रतिष्ठापणा पासून ते विसर्जन पर्यंत श्रींच्या सेवेत असतो, यंदाच्या गुरुपौर्णिमेला विशेष आमंत्रित बँन्ड पाथक हे अन्नछत्र मंडळाच्या पालखी व रथोत्सवाच्या सेवेत आले होते.
चौकट :
भर पावसात खेळ सादर –
आराध्य ढोल पथक चुनाभट्टी मुंबई यांनी भर पावसात पथकावर प्लास्टिक अछादन धरून खेळ सादर केला. यास अनेक स्वामी भक्तांनी अछादन धरण्यासाठी मदत केली.
भक्तीच्या जयघोषात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या ३९ व्या वर्धापनदिनाची भव्य पालखी व रथ मिरवणुकीने सांगता
https://gaongatha.com/?p=16201

