१० वे पुष्प – ‘सुर भक्तीचे उमटले’ कार्यक्रमाने धर्मसंकीर्तन व सांस्कृतिक कार्यक्रमाचा समारोप

अक्कलकोट : (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाचा ३९ वा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा उत्सवनिमित्त धर्मसंकिर्तन व सांस्कृतिक कार्यक्रम न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली होत असून, सांस्कृतिक कार्यक्रमाचा अखेरचा दिवस मंगळवार सायंकाळी श्री स्वामी समर्थ भक्त मंडळ, निपाणी प्रस्तुत ‘सुर भक्तीचे उमटले’ भक्ती संगीत ह्या कार्यक्रमाने १० वे पुष्प संपन्न झाले. देशभक्तीपर, भक्ती व भावगीतासह मराठी-हिंदी गीतांच्या या कार्यक्रमास प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. धर्मसंकिर्तन व सांस्कृतिक कार्यक्रम सन २०२६ चा समारोप करण्यात आला. गेल्या १० दिवसापासून उस्पुर्त प्रतिसाद मिळाला आहे.

दरम्यान या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन न्यासाचे विश्वस्त- जनार्दन उर्फ अण्णा थोरात, भरत मित्र मंडळ अध्यक्ष- बाळासाहेब दाभेकर, पुणे, आबा बालगुडे, बाबासाहेब पाटील, लक्ष्मण झंपले, नगरसेविका सारिका कुर्ले, अक्षय चौगुले, अमर सिरसाट, गणेश गोब्बुर, लखन झंपले, धर्मराज गुंजले, गायक किशोर गायकवाड, वैभव काळे, मल्लिनाथ स्वामी, राजेंद्र लवटे, चंदन बकरे, पप्पू पवार, हर्षद शेलार, उमेश मेस्त्री, अनिल ऐनापुरे, संदीप खर्डीकर, प्रमोद घाडगे, सुधीर शिंदे, दिपक खेडेकर, सिद्धेश सुर्वे, बसवराज तिकोणे, सुरेश गायकवाड, सुबोध गायकवाड, सौरभ गायकवाड, प्रतिक वांजळे, राजेंद्र पंडित यांच्या हस्ते मंत्र पठणाने पूजन संपन्न झाले.

कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचा व कलाकारांचा सत्कार न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले व मंडळाच्या पदाधिकारी यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा कृपावस्त्र देऊन करण्यात आला. न्यासाचे पुरोहित संजय व सोमकांत कुलकर्णी यांच्या हस्ते मंत्र पठणाने पूजन संपन्न झाले. सादरकर्ते अशोक जाधव, रितेश शहा, अमृत परीट, प्रतिक शहा, मंगेश सारंग यांचा देखील न्यासाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

चौकट :
गुणीजन गौरव :
मिडिया नियोजन –प्रशांत भगरे, सोमशेखर जमशेट्टी, सृष्टी मसुती, प्लॅनिंगो, अरविंद शिंदे, उत्कृष नियोजन –आतिश पवार, शुभम सावंत, स्टेज नियोजन – राजेंद्रकुमार पवार, तानाजी पाटील, रमेश हेगडे, प्रवीण घाटगे, निखील पाटील, विजय गोटू माने, संगणक ऑपरेटर- प्रसाद हुल्ले, संगणक ऑपरेटर- शरद भोसले, दत्त प्रिंटिंग प्रेस- स्वामीनाथ बाबर, सूत्रसंचालन व निवेदिका- श्वेता हुल्ले, मुख्य सुरक्षा रक्षक – महादेव अनगले, सह.मुख्य सुरक्षा रक्षक – अनिल गवळी, मंडप कॉनट्रक्टर – राऊत, स्क्रिन ऑपरेटर – गोविंद केकेडे, साउंड ऑपरेटर – संदीप सरवदे, लाईट ऑपरेटर – जोगदंड, फोटोग्राफी – ज्ञानेश्वर भोसले, मंडप नियोजन – कल्लप्पा छकडे, केरळ वाद्यवृंद प्रमुख- गणेश देवडिंग (मोर्डेश्वर) यांचा न्यासाच्या वतीने गुणीजन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

चौकट:
विशेष गौरव :
महेश भोसले, अजिंक्य श्रीमान यांना विशेष गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

चौकट :
गुणवंत विद्यार्थी गौरव :
तालुक्यातील इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेत उत्तम गुण मिळवलेल्या १० गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव न्यासाच्या वतीने करण्यात आला.

यावेळी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ विश्वस्त, हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्था अध्यक्षा- अलकाताई जनमेजयराजे भोसले, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ विश्वस्त, हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्था सचिव- अर्पिताराजे अमोलराजे भोसले, अनुयाताई संदीप फुगे, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ क्रियाशील सदस्य- सरोजिनीताई मोरे काकू, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ विश्वस्त- अनिताताई अभय खोबरे, स्वाती निकम, कु. तेजस्विनीराजे अमोलराजे भोसले, कु. स्वामिनीराजे अमोलराजे भोसले, दिव्या मोरे, स्मिता कदम, पल्लवी कदम, संगीता भोसले, रूपा पवार, स्वप्ना माने, प्रिया निकम, कविता वाकडे, सुवर्णा घाडगे, राजश्री माने, अनिता गडदे, धनश्री पाटील, कविता भोसले, छाया पवार, कल्पना मोरे, अक्षता मोरे, तृप्ती बाबर, कोमल क्षीरसागर, शितल क्षीरसागर, अक्षता खोबरे, रुपाली भोसले, व न्यासाचे उपाध्यक्ष- अभय खोबरे, सचिव- शामराव मोरे, संदीप फुगे, कु. हर्षवर्धनराजे अमोलराजे भोसले, विश्वस्त- लक्ष्मण पाटील, संतोष भोसले, राजेंद्र लिंबीतोटे, राजाभाऊ निकम, मनोज निकम, बाळासाहेब कुलकर्णी बबलादकर, अश्पाक काझी, रोहित खोबरे, प्रवीण देशमुख, अप्पा हंचाटे, सौरभ मोरे, गणेश सोनटक्के, विजय इंगळे, बाबुराव कुलकर्णी, बालाजी पाटील, आकाश शिंदे, रोहन शिर्के, सागर गोंडाळ, डॉ. किरण पाटील, शिवराज स्वामी, रुद्रय्या स्वामी, प्रा. सायबण्णा जाधव, किरण जाधव, बाळासाहेब घाटगे, बाळासाहेब पोळ, आकाश गडकरी, कुमार सलबत्ते, लक्ष्मण विभूते, अक्षय मोरे, गणेश पाटील, शहाजीबापू यादव, कुमार पाटील, प्रशांत साठे, सतीश महिंद्रकर, मल्लिकार्जुन बिराजदार, दत्ता माने, दत्ता मोरे, आकाश शिंदे, यश विभूते, श्रीनिवास गवंडी, लक्ष्मण बिराजदार, महांतेश स्वामी, संजय गोंडाळ, सिद्धेश्वर मसुती, प्रसाद मोरे, वैभव मोरे, फहीम पिरजादे, केदार तोडकर, योगेश पवार, आकाश सूर्यवंशी, सागर पवार, सागर जाधव, चंद्रकांत कुंभार, अभिषेक चव्हाण, लक्ष्मण शिंदे, अमित कोळी, निखील शिंदे, विनायक भोसले, भरत राजेगावकर, प्रा. शरणप्पा आचलेर, ज्ञानेश्वर भोसले, किरण साठे, असद फुलारी, रमेश हळसंगी, मुन्ना वाकडे, पप्पू कोल्हे, संतोष माने, श्रीशैल कुंभार, मारुतीराव बोरकर, दिलीप कदम, रोहित कदम, समर्थ चव्हाण, सुमित कल्याणी, राहुल इंडे, सागर सुतार, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, विठ्ठलराव रेड्डी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण, श्रोते बहुसंख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन श्वेता हुल्ले यांनी केले तर न्यासाचे सचिव शामराव मोरे यांनी रसिकप्रेक्षकांचे स्वागत व आभार मानले. उत्कृष्ठ लाईट व्यवस्था शंभूराजे इलेक्ट्रिकल व मंडप सजावट कल्लप्पा छकडे यांनी केले.

चौकट :
शुभ संदेश –
गुरुपौर्णिमा हा भारतीय संस्कृतीतील गुरु-शिष्य परंपरेचा गौरव करणारी आणि ज्ञान, संस्कार तसेच मूल्याधिष्ठित जीवनाची प्रेरणा देणारा उत्सव आहे.
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट यांच्या ३९ व्या वर्धापन दिनानिमित्त तसेच श्री गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त आयोजित धर्मसंकीर्तन व सांस्कृतिक कार्यक्रमास माझ्या अनेक शुभेच्छा.
श्री स्वामी समर्थ महाराजांनी दिलेला सेवा, श्रद्धा आणि लोककल्याणाचा संदेश समाजासाठी प्रेरणादायी राहिला आहे. या पवित्र सोहळ्यानिमित्त समाजात एकता, बंधुभाव, सद्भावना आणि सेवाभाव दृढ व्हावा तसेच प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि समाधान लाभो, ही सदिच्छा व्यक्त करते.
या कार्यक्रमास सुयश लाभो आणि कार्यक्रम समाजप्रबोधन आणि आध्यात्मिक मूल्यांच्या जाणीवेसाठी प्रेरणादायी ठरो. या शुभेच्छांसह,
(रितू राजेश तावडे)
महापौर, मुंबई

चौकट :
दि. २९ जुलै रोजी गुरूपौर्णिमे निमित्त बुधवार सकाळी ७ ते ९ पर्यंत महाप्रसादगृह येथे श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत ग्रंथाचे पारायण, सकाळी ९ ते १० पर्यंत नामस्मरण, जप व श्री गुरूपूजा, सकाळी १० वा. खालील मान्यवरांच्या हस्ते श्रींची महाआरती व महानवैद्य दाखविण्यात येणार आहे.

यांच्या हस्ते-खासदार- केंद्रीय सहकार व नागरी उड्डाण राज्य मंत्री ना. मुरलीधर अण्णा मोहळ, राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालक मंत्री ना. जयकुमार गोरे, राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री ना. भरतशेठ गोगावले, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे, सी.ए. महेश गावस्कर, पुणे, अखिल मंडई मंडळ पुणेचे अध्यक्ष व न्यासाचे विश्वस्त जनार्दन उर्फ अण्णा थोरात, सचिन सांबरेकर पालखी परिक्रमा संयोजक बेळगावी, ललिताताई वीर आगासखिंड नाशिक देणगीदार यांच्या हस्ते आणि अतिथींच्या उपस्थितीत संपन्न होत आहे.

चौकट :
दि. २९ जुलै रोजी बुधवार सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सर्व स्वामी भक्तांना महाप्रसाद, सायं ४ वाजता श्री स्वामी समर्थांच्या पादुका पालखी, आणि न्यासाच्या सुशोभित केलेल्या रथाच्या भव्य मिरवणूकीचा दिंड्या व वाद्यांचा गजरात आणि अतुल बेहरे पुणे यांच्या ‘नांदब्रम्ह’ या ढोलपथकाच्या तालात आणि अमोलराजे लेझिम संघाच्या शानदार खेळाने शुभारंभ आमदार शेखर निकम, चिपळूण, भरत मित्र मंडळ पुणे अध्यक्ष व न्यासाचे क्रियाशील सभासद बाळासाहेब दाभेकर, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य शहाजीराजे पवार, सो.म.पा. नगरसेवक व शिवसेना जिल्हाप्रमुख अमोलबापू शिंदे, सो.म.पा. माजी उपमहापौर दिलीप (भाऊ) कोल्हे, अॅड. नितीन हबीब- कायदेशीर सल्लगार, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ व जेष्ठ विधिज्ञ, सो.म.पा. नगरसेवक, मा.स्थायी समितीचे माजी चेअरमन व शहर-जिल्हाध्यक्ष (कॉंग्रेस) चेतन नरोटे, सो.म.पा.मा.शिक्षण सभापती संकेत पिसे, सोलापूर, चुनाभट्टी मुंबईचे माजी नगरसेवक विजुभाऊ तांडेल, देणगीदार संतोष नाईक, सायन मुंबई यांच्या हस्ते पालखी व रथ मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *