श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांचे पुत्र प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाच्या परिसराचा चौफेर विकास शक्य झाले असून, श्रींच्या दर्शनामुळे खूप प्रसन्न वाटले. न्यासाची महाप्रसाद व्यवस्था छान होती. श्रींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविक खूप उर्जा घेऊन या पवित्र ठिकाणाहून जातात..! आत्मविश्वास वाढतो. भिऊ नकोस, मी तूझ्या पाठीशी आहे, व जिथे कमी, तिथे स्वामी’ याची प्रचीती मिळत असल्याचे मनोगत राज्याचे माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले.
ते श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात सहपरिवार आले असता न्यासाचे सचिव शामराव मोरे यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले की, आज अश्या प्रकारच्या कार्याची नितांत गरज आहे. आजवर पुष्कळ कामे भोसले पिता-पुत्रांनी केली आहे. अजून त्यांच्या मनात पुष्कळ काही आहे. भविष्यकाळ वर्तमानापेक्षा आशादायी आहे. उद्याची आशा असणे त्याची अनुभूती होणे हेच तर खरे तीर्थक्षेत्राचे कार्य आहे असे त्यांनी व्यक्त केले.
त्यांच्या समवेत धर्मपत्नी मनीषाताई टोपे, उत्तमराव पवार, तात्यासाहेब उठाण, अशोकराव आधाव, किरण तारख, कैलास जीगे, बाबासाहेब कोल्हे, सुरेश औटे, नरसिंग तात्या मुंडे, पराजी सुळे, त्रिंबकराव बुरबुले, शेषराव जगताप, बापुसाहेव जाधव हे उपस्थित होते.
यावेळी माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे, शीतलताई म्हेत्रे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष दिलीप सिद्धे, अरुण जाधव व न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, विश्वस्त संतोष भोसले, पुरोहित संजय कुलकर्णी, सिद्धाराम कल्याणी, एस.के.स्वामी, बाळू पोळ, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, पिंटू साठे, बाळासाहेब घाडगे, निखील पाटील, प्रवीण घाडगे, गोटू माने, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, दत्ता माने, राजू पवार, प्रसाद हुल्ले यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.