अक्कलकोट, दि. 22 : (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांचे पुत्र प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली मंडळाचा परिसर अत्यंत स्वच्छ व शिस्तबद्ध अशी व्यवस्था असून ,मोठया प्रमाणात भाविक जरी आले तर कमी वेळेत महाप्रसाद देणयाची व्यवस्था उल्लेखनीय असून,राज्यातील इतर देवस्थान,न्यासाने आदर्श घ्यावा,असे मनोगत राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष व जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
ते तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आले असता त्यांचा श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र, श्रीफळ देऊन न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रंसगी ना.जयंत पाटील हे बोलत होते.
यावेळी ना.जयंत पाटील यांच्यासमवेत पालकमंत्री दत्तात्रय भरणे, राज्य महिला आयोग अध्यक्ष व प्रदेश महिला अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, जिल्हा निरीक्षक सुरेश घुले, जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील उपस्थित होते.
याप्रसंगी राष्ट्रवादीचे ता.अध्यक्ष दिलीप सिध्दे, शहर अध्यक्ष मनोज निकम, अविराज सिध्दे, मुन्ना राठोड, शिवराज स्वामी, सुनंदा राजेगावकर, विक्रांत पिसे, अर्जुन बनसोडे, राजकुमार पाटील, संजय घोडके, राहुल किरनळ्ळी, शंकर पाटील, स्वामीराव चौगुले, माणिकराव बिराजदार, प्रा.प्रकाश सुरवसे, नगरसेवीका नसरीन यळसंगी, शंकर पाटील,शंकर व्हनमाने, महादेव वाले, न्यासाचे सचिव शामराव मोरे, उपाध्यक्ष अभय खोबरे, संतोष भोसले,निखिल पाटील,प्रविण घाटगे,गोटू माने,चिंटू कलशेटटी, ,समथँ घाटगे,धनंजय निंबालकर, चंद्रकांत कुंभार,मंहातेश स्वामी सिद्धराम कल्याणी, एस.के. स्वामी, यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.