गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने गानसम्राज्ञी स्व लतादिदी मंगेशकर यांना न्यासाच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी न्यासाचे पदाधिकारी भक्तगण सेवेकरी कर्मचारी वृंद उपस्थित होते.दरम्यान न्यासाच्या परिसरात स्वर्गीय लतादीदी यांनी दिलेल्या कार गाड्यांच्या प्रथम दर्शनी असलेल्या दालनात प्रतिमेचे पूजन मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. स्वर्गीय लतादीदी यांना मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मजय राजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तर त्यांचे पुत्र अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या स्वामी कार्याबाबत त्यांना सार्थ अभिमान होता .न्यासाने करीत असलेल्या उल्लेखनीय कार्याबाबत स्वर्गीय लता दीदी यांच्याकडून कौतुक व्हायचे; त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मंडळाने विविध उपक्रम राबवले आहेत ,स्वर्गीय लतादीदी यांना मुंबईत भेटायला आलेल्या मान्यवरांसोबत चया चर्चेत तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ या न्यासाच्या कार्याबाबत आवर्जून सांगत असत ,न्यासाच्या जडणघडणीत स्वर्गीय लतादीदीने मोलाचे योगदान दिले. मंगेशकर कुटुंबीय श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वर्धापन दिनाच्या संस्कृती कार्यक्रमाचे पहिले पुष्प गुंफल्या नंतरच कार्यक्रमाची सुरुवात होते. त्या काळात प्रकृतीच्या कारणास्तव यायचे न झाल्याने त्या स्वतः लतादीदी व्हिडिओ कॉल च्या माध्यमातून शुभ संदेश देत होत्या.

या प्रसंगी न्यासाचे सचिव शाम मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष मनोज निकम,शिवसेना उप प्रमुख प्रवीण घाडगे,निखिल पाटील,शिवसेना शहर प्रमुख योगेश पवार,प्रहारचे अमर शिरसाट संजय गोंडाळ, वैभव नवले, अप्पा हांचाटे, प्रवीण देशमुख,अमित थोरात, बाळासाहेब घाडगे,गोविंदराव शिंदे बालाजी कटारे, श्री चव्हाण, प्रशांत भगरे, अमोल फुलारी, आकाश शिंदे,श्रीधर गुरव, काशिनाथ कदम, प्रथमेश पवार, अनिल चव्हाण, सतीश महिंद्रकर, वैभव मोरे , अभिजित सूर्यवंशी, शहाजी बापू यादव, भारत राजेंगावकर, कल्याण देशमुख, विशाल कलबुर्गी, अनंत क्षीरसागर,आशिष हुबे,आकाश सूर्यवंशी, कुमार पाटील,शुभम चव्हाण, विकी जाधव,संकेत शिंदे,शुभम सावंत,युवराज सोनटक्के, निशांत निंबाळकर, विजय उर्फ गोटू माने, विशाल पाटील शरद पवार सिद्धेश विभूते,सुमित कल्याणी, पिंटू साठे, चंद्रकांत कुंभार, एस के स्वामी, महांतेश स्वामी, बाळा पोळ, नामा भोसले, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, यांच्यासह पदाधिकारी सेवेकरी भक्तगण कर्मचारी बहुसंख्य उपस्थित होते.यावेळी कोव्हिड १९ नियमांचे पालन करण्यात आले.


छत्र हरपले

भारतरत्न गानसम्राज्ञी स्व.लतादीदी यांच्या जाण्याने अन्नछत्रचे छत्र हरपले आहे.अन्नछत्रास त्यांचे उदंड योगदान लाभले आहे. त्या मला आपल्या घरातील माणसे असा ग्रंथात उल्लेख करून मोठे स्थान दिले आहे.अन्नछत्राच्या विकास कार्यात त्यांचे सदैव मार्गदर्शन लाभत असे आज जरी स्व स्वर्गीय दिदी आपल्यात नसल्या तरी त्यांचे सदैव आशीर्वाद व कृपाक्षेत्र अन्नछत्र परिवारावर असणार आहे. संगीताच्या क्षितिजा वरील स्वराच्या धृवतारा आज निखळला आहे.त्यांच्या आत्म्यास चिर शांती लाभो.ही स्वामी समर्थ चरणी प्रार्थना.

  • जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले
    संस्थापक अध्यक्ष श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट

बहुमोल योगदान

गेल्या आठ दशकाहून अधिक काळ जगभरातील अगणित संगीत प्रेमींचे भावविश्व समृद्ध करणारे दैवी स्वर अखेर शांत झाले श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या कार्यासाठी त्यांचे बहुमोल योगदान लाभले त्यांच्या जाण्याने कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.स्व लतादीदीच्या आत्म्यास चिर शांती लाभो हीच स्वामी समर्थ चरणी प्रार्थना.!

– अमोल राजे भोसले प्रमुख कार्यकारी विश्वस्त श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट

स्वामी भक्तांकडून ही श्रद्धांजली

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने न्यासाचे मार्गदर्शक गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना अन्नछत्र मंडळात आलेल्या स्वामी भक्तांकडून श्रद्धांजली वाहण्यात आली.दिवसभर स्व दिदीच्या प्रतिमा दर्शनासाठी भक्तांची गर्दी होती.